Thursday, 8 July 2021

म्हातारपणी व्यक्त करावे लागणारे काही प्रश्चाताप

म्हातारपणी व्यक्त करावे लागणारे काही प्रश्चाताप आजच व्यक्त करुयात.स्वताला काही प्रश्न विचारुया.

१) आपल्याला हे जीवन अत्यंत #योगायोगाने मिळाले होते ही संधी आपल्याला परत कधीच मिळनार नाही.प्रश्न आहे काय केले आपन या अमूल्य जीवनाचे ? 

२) आपन #जीवनात परिपूर्ण फुललात का ? बहरलात का ? आपन कमावलेल्या ज्ञानाचा आजूबाजूच्याना काही फायदा झाला का ? समाजाला देशाला तुम्ही असण्याचा काही फायदा झाला का ? बालपण ते वृध्दत्व हा प्रवास कसा केलात ? 

३) तुम्ही जीवनात जे कमावलं ते लोकांत वाटलं का ? शेअर केलं का ? कधी लोकांत माणसांत मिसळलात का ? 

४) तुम्ही कधी स्वसुखापलिकडे दुसऱ्याच्या सुखाचा आणि स्वदुखापलीकडे दुसऱ्याच्या दुखाचा विचार केला आहे का ? 

५) आयुष्यात माणसे जोडली की माया ? रस्त्यात फुले टाकली काटे ? प्रबोधन केले की दंगली ? 

६) आपल्यातही काही चांगले गुण आहेत याची जानीव तुम्हाला होती का ? जीभ बोलण्यासाठी होती आणि आयुष्य जगण्यासाठी ती जीभ मौनात आणि आयुष्य कोषात तर नाही जगलात ना ? 

७) परंपरागत तेच तेच बोरींग जगलात की खुलके चाकोरी मोडुन मुक्त जगलात ? 

८) चांगल्या संध्या उचलल्या का ? फायदा घेतला का ? का घाबरलात रिस्क घ्यायला ? 

९)मदत,सहकार्य,शेजारधर्म,चौकशी,विचारपूस,माणुसकी या शब्दांना जगलात का ? ही शब्दे माहिती आहेत का ? 

१०) घरात कुत्रे नसतानाही गेटवर मात्र *कुत्र्यापासुन सावधान* ही पाटी लावलीत का ? कधी कुनाला कपभर चहा पाजलात का ? 

हे काहीही केले नसेल तर जीवन व्यर्थ गेले .. 
वेळ गेलेली नाही नव्याने सुरुवात करा ...

नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

No comments:

Post a Comment