मी लहानग्यांपासुन ते अगदी ९२ वर्षाच्या वृद्धांसोबत पुरोगामी चळवळीच्या अंगाने वावरत आलो आहे.आशांसोबत काम करणे असो नाहीत तर वैचारिक चर्चा.फिल्डवर्क असो नाहीतर एखादी मिटिंग,सर्वांसोबत वावरण्याचा योग माझ्या आयुष्यात येवुन गेला आहे.
महत्वाचा विषय माझ्यासाठी वृद्ध वयस्क वैचारिक व्यक्तिंचा आहे.मी जेवढ्या वृद्ध वयस्क व्यक्तिंसोबत वावरलो त्यांची सर्वांची एक आग्रही भूमिका " कर्मठता " ही राहिलेली आहे.
ते इतक्या कर्मठतेने बोलतात की त्यांना वाटते लवकरात लवकर लोक बदलावेत,जग बदलावे क्रांती अगदी आपल्या डोळ्यासमोरच व्हावी.एक पुरोगामी वैचारिक ग्रहस्थ खुप वृध्द होते. ते अंथरुणाला खिळून वारले.त्यांचा शेवटपर्यंत अत्यंत कर्मठपणात वावर राहिला.टोकाच्या भूमिका घेत ते मेले.जाताना एकही कार्यकर्ता घडवून गेले नाहीत.आज त्यांचा एकही आनुयाई नाही.
आत्ता लॉकडाऊनच्या आधी एका ६५ वर्षाच्या वृद्ध पुरोगामी व्यक्तींनी, एका ब्राम्हणी छावणीच्या भटाळलेल्या नामांकित चोंग्याला विडिओ बनवून शिव्या घातल्या.त्याच्या महाराष्ट्रभरातील चेल्यांनी कॉल करुन शिव्यांची परतफेड करायला सुरुवात केली.धमक्या सुरु केल्या.या आज्जोबांचे कॉल माझ्या मोबाईलवर डायव्हर्ट करुन सर्व प्रकरण युक्तिवाद करुन माफी न मागता मी निस्तरले.
नंतर या मार्गाने लोक जोडले जानार नाहीत,उलट तुम्ही नुकसान करत आहात असे म्हणून अज्जोबांना रामराम केला.
आत्ता एक वयस्क पुरोगामी नकारात्मक नास्तिक ग्रहस्थ संपर्कात आहेत. ते एका छोट्याशा खेड्यात रहातात.पुर्वी ते औरंगाबादला नोकरी करायचे.एक दोन महिण्याला आमची भेट होते, चर्चा होतात.त्यांच्या आजूबाजूच्या गावकीतल्या लोकांच्यात त्यांच्या मांडणीबद्दल नकारात्मक भावना आहेत.मी मात्र गेली तिनचार वर्षे झाले त्यांना सांगत आहे, इतकी टोकाची मांडणी करु नका,या टोकाच्या मार्गाने लोक जवळ सुद्धा येत नाहीत.सोडा हा हेका. महाशय ऐकायला तयार नाहीत. समाज किती बावळट आहे,मुर्ख आहे, नालायक आहे, हे ते दिवसरात्र सिद्ध करत असतात.
पण उपयोग काय ?
आशा लोकांना माझे काही प्रश्न आहेत.
आख्खे आयुष्यभर काय करत होतात ? किती लोक जोडले , किती आनुयाई तयार केले ? तुम्ही बदल केलेले कार्यक्षेत्र कुठेय ? ही वेगाने प्रबोधनाची हाव म्हातारपनी उपयोगात आणून काय फायदा ?
आत्ता मसनवाट्यात गवऱ्या गेल्यानंतर काय फायदा ?
तुम्हाला लोकांचा मुक्तिदाता बनायचे आहे की दुश्मन ?
देवपुजा करत असताना पाण्यात टाकलेले देव तसेच बुडत ठेवून आमची आई , माय , आज्जी आंगणात आलेल्याला वाढायला जाते.तिला इतकेही गबाळी समजु नका.
तुकोबारायांचा अभंगच आहे तसा ...
करिता देवार्चन l घरी आले संतजन ll
देव सारावे परत्वे l संत पुजावे आरते ll
यडेचोट तुम्ही आहात , प्रबोधनाची टर्मिनोलॉजी तुम्हाला कळली नाही.ग्रामसंस्कृती यडी नाही ती अनुभवावरून चालते.तुम्ही अनुभवात शुन्य पुस्तकी कोटेशन तोंडावर फेकुन मारनारे..
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment