भयाण शांतात पसरलीत खेड्यात.माणसे मरताहेत.गाव सुन्न झाला आहे.गावात पाण्याचा थेंब नाही.पारधी कैकाड्याची घरे उठून गेली कुठतरी.गावाला आवकळा आलीय.पुर्वी 72 च्या दुष्काळात म्हने गावच्या चौकातल्या जमीणीतल्या पेवा मधे आनेक खंड्या धन्या साठ्वलेले होते ते गावच्या पाटलाने फुकट वाटले होते.सध्या कोण्याही पाटलाच्या घरात कणगीभर सुद्धा धान्य नाही...ओट्यावर आकाशाकडे तोंड करुन बसलेले म्हातारे म्हनाहेत.तुमच्या आच्छे दिना पेक्षा आमची रझाकारी बरी होती...
मालीपाटल्याचे पेरलेले धान्य उगवलेच नाही .म्हनत होता आवंदा दोनी लेकींची लग्ने एकाच मांडवात लावतो.पोरींचे लग्नाचे वय निघून जात आहे हे पाहून खालच्या आळीतल्या महादूने गळफास घेतलाय.विठ्ठबापूचा तुकाराम पैश्यापाई इंजिनिअरींग दुसरे वर्षे सोडून गावी आलाय.नुसते पारावरच्या वट्ट्यावर शुन्यात बघत बसलेला आसतो.
शांताबाईची लेक कोनीच दवाखाण्यात नेले नाही म्हनून घरातच पोटात बाळ आडकून मेली.शांतबाई मड्यावर हात बडवून रडताना म्हनतहोती
"मह्या लेकराला दयाखाण्यात न्यायला मला पैसा भेटला नाही ,मह्या मरु दिली आसती का तिला."
कपड्यांच्या उधारीचे पैसे का देत नाही म्हनून तालुक्याच्या मारवाड्याने मानसे पाठवून संपतनाना रस्त्यात मारले त्यांच्या कनातून रक्त येत होते. ते रुमालाने कान पुसत तसेच घरी आले.गळ्यातला सोन्याच्या समजून बेंटेक्सचा ओम काढून नेला म्हने...
गावसारा आडलाय पैशापाई.कोणीबी नेता भेटायला येइना.पिपळाच्या झाडाखाली बसलेले शीरपतीचे वेडे पोर म्हंते मेल्यावर लोक फुटू काढायला येतात.आता तर तसे बी कोणी येइना. बाजुच्या गवचा मेलेला मानुस टिव्हीत दाखवला होता.पन या गावचा काही नंबरच आला नाही.50 वर माणसे गेली तरी.
गावसारा सुन्न झाला आहे.येथे टि व्हीची रेंज येते.येथे रेडिओची रेंज येते.येथे मोबाइलची बी रेंज येते.कोनाला मदतीची आरोळी दिली तर ते म्हंतात रेंजच नाही.येथे फक्त मानुसकीची रेंज येत नाही.
भयाण शांतत पसरलीय...
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
No comments:
Post a Comment