माहुर हे मनुष्यवस्तीखाली आलेले अत्यंत प्राचीन ठिकाण आहे.सपाट मैदानी प्रदेश हे पुर्वीला दलदलीखाली किंवा बहुतांश जलमय असताना,त्या काळात मनुष्य वस्ती ह्या उंचावर , डोंगर माथ्यावर झालेल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील वनी येथे सप्तशृंगीने सात डोंगररांगांच्या उंचभागावर शेती करून आपला गण जगवला होता.तुळजापूरही उंचावर आहे.तेथील तुळजा घाटाच्या खाली शेती करत असे.वस्ती मात्र घाटावर होती .
आगदी त्याप्रमाणेच माहुर उंच डोंगरमाथ्यावर वसलेले सर्वात प्राचीन मनुष्यवस्तीचे ठिकाण आहे.सौंदत्तीची राज्ञी रेणुका आपल्या गणासह माहुर भागात येवून टेरेस फार्मिंग म्हणजे डोंगरावरची टप्याटप्याची शेती करुन आपला गण वाढवत होती.माहुर हा उंच डोंगर आणि त्यावर सपाट भूभाग असलेले ठिकाण आहे.खाली जवळच पैनगंगा वहाते.ही पैनगंगा याच डोंगर रांगांना धडकुन पात्र वळवून पुढे निघून गेलेली आहे.हा भाग कितीही जलमय असला तरी वर लोकजीवन सुरळीतपणे चालेल अशी नैसर्गिक व्यवस्था माहुरची आहे. माहुर हा शब्द मा उर असा बनला आहे.माउर म्हणजे आईचे हृदय.जिने आपल्याला जगवले वाढवले तिच्याप्रती उतराई म्हणून तिच्या वस्तीला माउर हे नाव तिच्या वंशजांनी दिलेले आहे.देवीचे भोपी हे मुख्य पुजारी तर गोंधळी हे प्रचारक मानले जातात.
माहुरच्या भूमीवर पुढील काळात अनेक स्थित्यंतरे झाली.अनेक राजवटीखालुन हा भूप्रदेश गेलेला आहे.व्यापाराचे , अनेक संस्कृतीचे हे केंद्र बनले होते.
याव्यतिरिक्त माहूरवर मातृतिर्थ आर्थात रेणुकेची पुष्करणी देखील आहे.शिवाय येथे अनेक एतिहासीक संदर्भ असलेले ठिकाणे , वास्तू देखील आहेत.माहूरचा किल्ला गौंड राजापांसून ते नंतर देशमुख घराण्यापर्यंत शौर्य पराक्रम गाजवत गडाचे सौंदर्य जपत होता.माहुरच्या अत्यंत पराक्रमी स्त्री असणाऱ्या रायबागण देशमुख यांच्यावर दत्ता जाधव यांची पीएचडी देखील आहे.त्यावर त्यांचे पुस्तकही आलेले आहे.
************-**********************************
♦️पांडवलेणी नव्हे बुद्धलेणी
माहूर हे इतके मोठे सांस्कृतिक केंद्र होते की येथे पुढील काळात बोद्ध धम्मप्रचारक येवून राहिले होते. वावरले होते.किंवा या मार्गे व्यापर चालत होता.त्यामुळे याच माहुरच्या डोंगर कपारीत बुद्धलेणी आसल्याचे आपल्याला पहायला मिळते.माहुरमधेच शहराला लागून दोन किमी अंतरावर ही बुद्धलेणी आहे. ह्या बुद्धलेणीत बुद्धकालीन मुर्तीशास्त्रातील द्वारावरील मुर्ती आणि स्तूपाच्या आधारे स्पष्ट निर्देशित करता येते की ही लेणी बुद्धलेणीच होय.परंतू आलिकडील काळात या लेणीला शेंदूर फासुन मुळ वारस्यापासून लपवने चालू आहे.या लेनीचे नामकरणही पांडव लेणीच केले गेले आहे.पांडव लेणी हा शब्द पांडू लेणी या शब्दापासून वाढवत नेलेला आहे.पांडूलेणी म्हणजे प्राचीन लेणी.जसे पांडू लिपी म्हणजे प्राचीन लिपी होय.त्याचप्रमाणे पांडू ( प्राचीन ) या शब्दाला पांडवांशी जोडून ती लेणी ऐतिहासिक वारस्यापासून तोडली गेली आहे. ती पांडव लेनी नव्हे.म्हणून या लेणीला बुद्ध लेणीच संबोधून तिला तिचा पुर्वीचा दर्जा तिला मिळवून दिला पाहिजे.लेनीचे विकृतीकरण थांबवले पाहिजे.
***************************************
♦️सोनपीर दर्गा - माहुर
सुफीं संतांना निसर्गरम्य ठिकाणे खुप आवडायची.सुफींचे सर्व दर्गे अत्यंत निसर्गरम्य ठिकाणीच आपल्याला पहायला मिळतील. हे दर्गे उंच डोंगरावर , डोंगर कपारीत , तळ्याच्या काठावर , दाट जंगलात , आशा ठिकाणीच आहेत. माहुर एकेकाळीचे जन्नतच.अत्यंत निसर्गरम्य ठिकाण.या माहूरच्या या निसर्गसौंदर्याने नटलेल्या भुमीवर सुफी संतांचे लक्ष न जाता राहिल तर आश्चर्यच.
महुरच्या इतिहासात आधी मातृसत्ताक स्त्रीसत्ताक कालखंडात मनुष्यवस्ती वास्तव्यास आली.नंतर अनेकांना ही भुमी आपलीशी वाटाली.त्यात बोद्ध परंपरेने सुद्धा या भागावर आपली छाप टाकलेली होती. बोद्धांच्या नंतर पुढील काळात या भूमीवर सुफींनी प्रेम केले होते.
अरबस्तानातून ख्वाजा नवाज शरिफ यांच्या सोबत आलेल्या सुफी पालख्यांपैकी सय्यद सनाउल्लह ( रहे. ) हे खुलताबाद मार्गे माहुरला आले होते.खुल्ताबादला दोन वेळा ७ शे म्हणजे एकूण १४ शे सुफी संतांच्या पालख्या आल्या होत्या.त्यातील सय्यद सनाउल्लह ( रहे. ) हे कादरी परंपरेतील होते.ते माहुरच्या भूमीवर शहराजवळील डोंगराच्या एका टोकाला स्थाईक झाले होते.याच भागात त्यांचा दर्गा आज घडीला सोनपीर दर्गा म्हणून ओळखला जातो.
त्याकाळी त्यांनी अगदी माहुरच्या डोंगराच्या एका बाजुला निसर्गरम्य ठिकाणी आपली वस्ती केली होती. हा सोनापिर दर्गा सय्यद सनाउल्लह ( रहे. ) यांची मजार स्वरूपात आहे.या दर्गाचे बांधकाम मोगल राजवटीत झालेले आहे.हा भाग निजाम राजवटीत असूनही या दर्ग्याला मोगलांनी जमीन आणि गावे दान दिल्याचे सांगितले जाते.
उंच आणि भव्य दगडी बांधकाम अत्यंत जुने असल्याचे पहाताक्षणी लक्षात येते.येथे 5 मार्चला दरवर्षी मोठा उरूस भरतो.ज्यांना अस्पृश्यता जातीव्यवस्थेचा अत्यंत त्रास सहन करावा लागत होता, त्यांचे समुपदेशन करुन ,आपल्या मार्गात,पंथात,धर्मात या सुफींनी घेतल्यामुळे ,ज्यांना साथीचे रोग , चर्मरोग होते आशांना रोगराईतून मुक्त करण्यासाठी औषध उपचार करुन अनेक लोक बरे केल्यामुळे ,अनेक लोक अनेक कारणांनी सुफींच्या द्वारे इस्लामात दाखल झाले होते.म्हणून हे दर्गे हिंदू मुस्लिमांना दोघांनाही प्रिय आहेत.ह्या सोनपीर दर्ग्याला एकदा आवश्य भेट द्या.. हा भाग नक्कीच तुम्हाला हवाहवासा वाटेल ..
नितीन सावंत , परभणी
9970744142
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*****************************
No comments:
Post a Comment