आणि या सर्व पंथांच्या गुरुशिष्यपरंपरेचा उदय होतो तो श्रीपर्वतावरुन.म्हणजेच श्रीशैल्यमवरुन.(पहा श्रीपर्वताच्या छायेत - रा.ची.ढेरे )
आमच्या वारकरी परंपरेत गळ्यात जी तुळशीची माळ असते त्या माळेच्या दोनही टोकांना जोडनारा गुरुमणीच असतो. म्हणजे माळीतील एकशे सात मणी शिष्य आणि एकशे आठावा मणी गुरु.
गुरु शिष्यपरंपरा काही वाईट नाही.काही ठिकाणी,काही काळ त्या नावे चाललेला आनाचार मात्र निषिद्ध मानला पाहिजे.परंतू आपल्याला काही गोस्टी वाचून , बघून , ऐकून समजत नसतील तर त्यासाठी सहवासात जावे लागते . आचरणाने ते शिकावे लागते.हे सर्व कुणाचे तरी मार्गदर्शन घेवूनच शिकावे लागते .आर्थात गुरु करावा लागतो.
नेहमीपेक्षा स्वभावात बदल झाला की
लोक म्हणतात याला कोणीतरी गुरु भेटलाय.
गुरु म्हणजे तरी काय ??
जिथून प्रेरणा मिळते,उर्जा मिळते तो गुरु.ज्याच्याकडुन काहीतरी शिकायला मिळते तो गुरु.
वारकरी परंपरेत संत तुकोबाराय यांनी आनाचारी साधुंच्यावर टिका केलेली आहे.त्यासाठी त्यांच्या गुरु शिष्यांना कुत्र्याची उपमा दिली आहे.म्हणून काही त्यांना समग्र गुरुशिष्यपरंपरा अमान्य होती असे होत नाही.
ते म्हणतात
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे l
सवे पांडुरंग येवूनिया ll
ते संत नामदेवांची प्रेरणा घेतात.त्यांचा आदेश शिरसवंद्य मानतात.
तुकोबारायांना गुरुशिष्य परंपरा मान्य होती.वरिल संत नामदेव यांच्याच उल्लेखिलेल्या अभंगाला अनुसरून ते म्हणतात...
गुरुकृपे मज बोलविले देवे l होइल हे घ्यावे हित काही ll
त्यांना गुरुशिष्य परंपरेबाहेर काढून ,तुकोबाराय एकटे पाडून ते काही स्वतंत्र उंचीवर जानार नाहीत.परंपरेची उंचीच त्यांना मोठेपण देते.संत तुकोबाराय वारकरी परंपरेने आधिक उंचीवर जातात.
आजही गुरुशिष्य परंपरेचे अवशेष खेड्यात आहेत. खेड्यातील सार्वजनिक जेवनाची पंगत गुरुनी (गोसावी) आगारी भरल्याशिवाय सुरुच होत नाही.गुरु पहिला घास घेनार मग सर्वजन.
कबिर आणि सर्व सुफी संतांचे गुरु शिष्यपरंपरेतील खुप मजेशीर किस्से आहेत.एकदा दक्षिण भारतातील एका मठातिल गुरुने उत्तर भारतात निरोप पाठवला आमच्या आश्रमात एक शिष्य पाठवा.
त्यांनी १०० पाठवले.दोन तिन महिण्यानी निरोप आला. तुमचा पाठवलेला एक शिष्य सुखरुप पोहंचला.
पाठवनार्या आश्रमातील इतर शिष्य म्हनाले.१ मागितला शंभर का पाठवले ? आणि १०० पाठवले एकच कसा पोहंचला ?
मठाचे गुरु म्हनाले जगातील लोभ मोह विषय लालसा यात काहीजन अडकतील.यातून तरुन निघेल तो खरा शिष्य.तो खरा पोहंचला आश्रमात
बाकी ९९ रस्त्यात मोह मायात अटकले.
म्हणून कोणाकडून काही शिकायला मिळत असेल तर ते काही वाइट नव्हे.
चांगल्या माणसाचे अंगण झाडीन आसे तुकोबाराय म्हनालेत.
नितीन सावंत परभणी
No comments:
Post a Comment