Friday, 2 July 2021

दास्यविमोचन विधी

दास्यविमोचन विधी - 

 वंशसमाजात कुलांच्या रचनेत कुलप्रमुख हा स्वतंत्र असे तर त्या कुलातील सर्वजन दास. म्हणजे सर्व निर्णय घेनाऱा कुलप्रमुख असे. सध्याला ग्रामीण भागात त्याला कारभारी म्हणतात. घरातील कारभारीच शेतीचे सर्व निर्णय घेतो. बाकी घरातील भाऊबंद फक्त राबतात. हे भाऊबंद स्वतंत्र नसतात. ते दासा सारखेच असतात. त्यांना सेवक म्हटले गेले आहे. त्यांचे कर्म सेवकत्व.

खेड्यामधे वेगळे निघताना प्रत्येक घरात मोठ्या मुलाकडे देवघर आणि आई-वडिल जातात. आणि तो नवा  कारभारी बनतो.

#कुलप्रमुख बनण्याची एक पध्दती असे.
कुलातील कुलप्रमुख मेल्यानंतर स्मशानभूमीत उत्तराधीकारी जो दास आहे, तो आपल्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेतो. त्या माठाला पाठीमागून छिद्र पाडले जाते. त्यातून जी पाण्याची धार लागते त्या धारेचे तो दास चितेला वेढे मारतो. नंतर मागे न पहाता ते गाडगे मागच्या मागे सोडुन दिले जाते. नंतर तो दास मनगट तोंडाला लावून बोंबलतो. पुढे तो कपड्यांसह आंघोळ करतो. नंतर डोक्यावरचे केसही काढून टाकले जातात. 

हा विधी दास्यातून मुक्त होनारा विधी आहे. दास्यविमोचन विधी. कुलप्रमुख गेल्यानंतर घरातील एक दास (मोठा मुलगा ) एवढे विधी करुन दास्यातून मुक्त होतो. आणि नवा कुलप्रमुख बनतो. जो स्वतंत्र असतो. म्हणूनच तो गाडगे फोडल्यानंतर कुनाला काही ऑब्जेक्शन आहे का हे विचारतो. आणि त्याच्या कारभारीपणाचा उद्घोष  मनगटाने बोंब मारत करतो. 

#दास्य_विमोचन विधीतून तो नवा कुलप्रमुख बनतो. त्याला मेलेल्या कुलप्रमुखाच्या ज्या जमीनीचा मालक आहे त्याचे उत्तराधिकारित्व मिळते.

आजही ग्रामीण भागात मृत व्यक्तीला पाणी पाजणाराला ही जमीन दिली जाते, त्यालाच उत्तराधिकारी मानले जाते. 

आपल्या विधीमधे आपला इतिहास वसलेला असतो. आजच्या काळाचे संदर्भ त्याला बदलून आपल्यापूढे विकृत स्वरूपात मांडतात. त्याच्या उकलण्याची योग्य मेथडाॅलाॅजी आपल्याकडे असेल तर अशा पद्धतीने कर्मकांड, विधीतूनही वारसाहक्काचा इतिहास आपल्याला प्राप्त होतो. हि अब्राम्हणी, बहूप्रवाही, विधायक ऐतिहासिक भौतिकवाद या अन्वेषणपद्धतीने प्राप्त झालेली उकल आहे, अंत्यविधीतील कर्मकांडाची.

नितीन सावंत परभणी
९९७०७४४१४२ 
दि.३ जुलै २०२०

No comments:

Post a Comment