आकाक्षांना मुरड घालणारी 'धग'
धग ही उद्धव ज शळके यांची सत्तरीच्या दशकातील स्त्रीवादी कादंबरी.आशा काळातील ही कादंबरी आहे की जिथे भांडवलशाहीचा स्पर्शही झालेला नाही.इग्रंजांच्या आगमनाने भांडवलशाही अवतरली असेल पण विदर्भ आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळुनही बरीच वर्षे तिचा स्पर्शही झाला नाही.धग चे संपूर्ण जीवन ग्रामीण आहे.हे ग्रामीण जीवन सरंजामशाही ने निहीत आहे.जिथे सरंजामशाहीची नियमावली पूर्णपणे कार्यरत आहे.आशा वातावरणात धग आकाराला येते. सरंजामशाहीत एका अल्पसंख्य असणाऱ्या शिंपी जातीच्या कुटुंबाला वेळोवेळी आपल्या स्वप्नांना,आकांक्षांना कशी मुरड घालावी लागते याचे उत्तम चित्रण धग ने केले आहे. या सरंजामशाहीच्या नियमावलीच्या खुणा धग मधे जागोजागी दिसतात.भाऊकी काय म्हनेल ? जातीतले लोक वाळीत टाकतील की काय ? पती परमेश्वर असतो, तो नेइल द्या वाट्याने जावे , नाही गेल्यावर जग काय म्हनेल ही धग अप्रत्यक्षपणे मनाला लागलेली आसते.
कादंबरीची नाईका कौतिक आहे.तिच्या सासऱ्याला शेवटपर्यंत जेवण पुरवल्याच्या कारणावरून गावच्या श्रीमंत सरंजामदाराने तिचे घर बळकावले आहे.हे घर गहाण म्हणून लिहुन घेतल्याचे कौतिकचे शेजारी सिता आणि सिताचा पती सुखदेव कौतिककला खात्रीने सांगतात.
तेव्हा कौतिक सिताच्या नवऱ्याला म्हणजे सुखदेवला म्हनते की तुम्ही माझ्या सोबत चला आणि त्या बाखड्याच्या समोर ही जबानी द्या. पण गावचा बखाड्या मोठा श्रीमंत त्याच्याकडे वारंवार काम पडते म्हणून सिता आणि सुखदेव कौतिकच्या बाजुने बोलण्यास नकार देतात.ही सरंजामशाही कौतिकवर अन्याय करते.तिच्या बाजुने कुणीही उभे रहात नाही.ग्रामीण भागात अल्पसंख्याक जातीचे हे नेहमीचे मुख्य दु:ख आहे.शेवटी गहाण म्हणून लिहुन घेतलेले घर गावचा उच्चभ्रू मिरासदार शेतकरी बखाड्या बळकावतो.गावगाडा पोसणारी प्रवाही ठेवनारी एकेकाळीची सरंजामशाही नंतर नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे ती आडगळ ठरते.ती शोषण करणारी जाचक व्यवस्था बनते.
नामदेव हा कौतिकचा नवरा आहे.तो पुरुष असूनही खंबीर मनाचा नाही.परिस्थीला लवकर शरण जानारा,हलक्या काळजाचा आहे.वारंवार तो परिस्थीती समोर गुढगे टेकतो.त्याला शेतातली श्रमाची कामे करण्याचा कंटाळा आहे.किंवा त्याच्याच्याने ते होत नाही.त्यामुळे तो वारंवार आपली बायको कौतिकच्या भोवती तगादा लावून कधी कपड्यांचा व्यापार करण्यासाठी पुढाकार घेतो तर कधी मिशनकाम करण्यासाठी गावे बदलायला लावतो.पहिल्यांदा महादेव आपल्या सासुरवाडीहुन आपल्या मुळ गावी तळेगावला आपल्या बायको पोरांसह येतो.तिथे तरी मिशनकाम करुन घर चालवावे असा त्याचा मानस आहे. परंतू तिथेही त्याचा बाप स्वताच्या मिशनीला हात लावु देत नाही.महादेव काही दिवस आपल्या बायको सोबत शेतात काम करुन नंतर कपड्यांचा व्यापार सुरु करतो.तो छोट्या छोट्या जत्रांमधे,आठवडी बाजारात तो कपड्यांची दुकान लावायला लागतो.एकदा तो उधारीवर भरपूर माल अनतो.तो काही कटेना म्हणून आणि मोझरीचा नत्थुसेट जुनी मशीन आणि रहायला घर देतो म्हनला म्हणून महादेव पुन्हा बायका पोरांसह तळेगाव सोडुन मोझरीला येतो.तिथे गावचा नत्थुसेट सरंजामी तोऱ्यात नोकराला मशीन दाखवायला सांगतो.आणि पोळ्याला कामावरल्या गढ्यांचे फुकट कपडे शिवुन घेण्यासाठी महादेवला लवकर कामाला सुरुवात करण्याचे आव्हान करतो.महादेवच्या पदरी पुन्हा निराशाच पडते.ती मशीन खुप गंजुन गेलेली खराब निघते आणि नत्थुसेटकडे निवाराही न मिळाल्याने हे कुटुंब शेवटी एका घिसड्याच्या आसर्याला जाते.मुस्लिम असनारे हे घिसडी कुटुंब शेवटपर्यंत कौतीकच्या संसाराचा आधार बनते.म्हणजे शिंपी आणि मुस्लिम या दोन सर्वहरा कुटूंबांची क्रांतिदोस्ती होते , परिस्थीतीशी झुंजण्यासाठी.
खचलेला महादेव मोठ्या महादेवाच्या जत्रेला जातो आणि तिकडेच त्याला महारोग होतो.हि रघतपिती आम्ही दुरुस्त करु म्हणून त्याला ख्रिश्चन मिशनरीचे लोक उपचाराला घेवून जातात.
कौतिक आणि महादेवला नामा आणि भिमा ही दोन मुलं आहेत.भिमा हा कुनालाही न जुमाननारा उनाड आहे.तो कौतिक आणि महादेवच्या हाताबाहेर गेल्याने पुढे तो जुगार खेळणे,चोरी करणे,उद्धट बोलणे अशा वाईट सवई लावून घेतो.या भिमाचा त्रास कौतिकला सर्वाधिक भोगावा लागतो.एकदा हा उनाड भिमा ज्यांनी आसरा तिला त्या खिसड्याच्या कुटूंबातील बानोवर हात टाकतो.बानो घरी सांगते.त्यामुळे कौतिकला घर सोडायची वेळ येते.शेवटी बानोची आई सकीना आणि वडिल कासम मध्यरात्री घर सोडुन जाणाऱ्या कौतिकला पुन्हा असरा देतात.तिला घर सोडु देत नाहीत.
महादेव आणि कौतिकचा लहाना मुलगा नामा आहे.अगदी आईचा शब्द पाळणारा,निरागस स्वभावाचा नामा आहे.इंग्रजी शाळेत जाऊन खूप शिकायचे त्याचे स्वप्न आहे.परंतु त्याची गरीबी त्याच्या आकांक्षांना मुरड घालायला लावते.बाप रघतपीती आल्याने तिकडेच गेला.आपल्या मुलाला नामाला आपण त्याच्या पायावर उभे करू न शकल्याने,शाळेत न पाठवु शकल्याने, आपले हक्काचे घर गेल्याने,आणि विशेष म्हणजे नवऱ्याचा आधार गेल्याने कौतिक वेडी होते. प्रचंड हालअपेस्टा झेलून , सतत कसाबसा संसार उभा करायचा प्रयत्न करणारी कौतीक वारंवार संसारात कोसळते , तिच्या पदरी सुख लागत नाही.संसार धुळीला मिळालेली ती स्त्री शेवटी वेडी होते. शेवटी घर चालवण्याची जबाबदारी नामावर येते.नामाची लहानी बहिण यसोदी बानू च्या जागेवर भाता फिरवायला लागते,तर नामा हॉटेलात कामाला लागतो.तो आईला खिशात भजे घालून आणतो, तर कधी मालकाने दिल्यावर उजागर आणतो. कौतिक आणि यसोदीच्या पालनपोषणाची जबाबदारी नामावर येते.
अशी एकंदरीत आशा-आकांक्षांना मुरड घालणारी कौतिक नावाच्या शिंपीनीची कहानी.ग्रामीण जीवन काबाडकष्ट उपसणारे आहे.ग्रामीण भागात मैल दोन मैल चालणे ग्रामीण लोकांना काहीच वाटत नाही. प्रचंड पायी प्रवास करणारी ही माणसं,जितकी गरिबी तितका पायी प्रवास,कारण गरिबांना कुठे मिळणार बैलगाडी.मोटारी, बस आल्याही होत्या पन त्या मोठ्या शहर आणि तालुक्यात, म्हणून नामा पाइच शाळेत जातो.महादेव कपडे विकायला गठ्ठा डोक्यावर घेऊन पायी जातो.आपल्या मूळ गावाहून मोझरी ला डोक्यावर शिलाई मशीन आणि पाटा आणणारी कौतिक आणि नामा इतके व्याकूळ होतात की, अवसान गळल्याने मशीनचा पाटा ही फुटतो.इतका पाई प्रवास करनारी ही ग्रामीण माणसं जगण्याची धडपड काही सोडत नाहीत...
कौतिक प्रचंड कष्ट उपसणारी आहे.एवढे कष्ट उपसूनही ती फारशी कुणावर खेसकत नाही.चुका करणाऱ्या भीमाला ही पदराखाली घेते.कपड्यांचा गठ्ठा चोरांनी लुटल्यानंतर नवरा घरी न येता अमरावतीला भिकाऱ्या गत जीवन जगतो.तर त्याला शोधून त्याची समज काढून त्याला घरी आणणारी कौतिक आहे.तरीही तिच्या वाट्याला संकटांचे डोंगर उभे आहेत.एक संकट गेले की दुसरे संकट तयारच आहे.कधी भीमा तिचा मोठा मुलगा घरात चोरी करून सारे पैसे घेऊन पळून जातो,कधी मुलगी यसोदी आजारी पडते,कधी नवरा खचतो तर कधी अचानक गायब होतो.तरीही संकटांना धीराने तोंड देत कौतिक नवऱ्याने मांडले तिथे संसार उभी करणारी खंभीर आहे.तरी हा तिचा खंबीरपणा टिकेल कुठपर्यंत ? शेवटी ती परिस्थितीपुढे हतलब होते.नवरा महारोगाने ग्रस्त झाल्याचे समजून ती आतुन तुटत जाते शेवटी ती वेडी होते.
या कादंबरीचे उठावदार मोठेपण म्हणजे वऱ्हाडी भाषा.'धग' ही मराठीतली सर्वात सुंदर वास्तवदर्शी कादंबरी आहे.त्यातल्या त्यात 'स्त्रीवादी' कादंबरी.या भूमिकांना घेऊन आणि समीक्षकांनी म्हणावी तेवढी दखल घेतलेली दिसत नाही.उलट अभिजनांनी लॉबिंग करून उद्धव शेळके यांचे साहित्य चर्चेलाही घेतले नाही.पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात शेळके यांची पुस्तकेही मिळत नाहीत.'नाळ' हा वऱ्हाडी बोलीवर चित्रपट काढताना नागराज मंजुळे यांचे 'धग' वर का लक्ष गेले नसेल हा प्रश्न पडतो? कारण नाळ हा तितका चर्चीला गेला नाही.धग वरचा चित्रपट नागराजला नाळपेक्षाही उंचीवर घेवून गेला असता.धगवर अजूनही चित्रपट येऊ शकला नाही हे मोठे गूढच आहे.
कौतिक च्या वाट्याला जे आले ते उद्धव शेळके यांच्या वाट्याला ही उपेक्षित जगणे आले की काय हा प्रश्न पडतो? कारण महाराष्ट्रात लॉबिंग करून समीक्षा लिहुन घेण्याचा प्रघात जुनाच आहे.
भाषिक सौंदर्य मूल्य,शिगेला पोहोचवणारे उत्कट प्रसंग आणि दुःखद शेवट हे या कादंबरीचे खास पैलू आहेत.
कौतिककडे बघून आपले दुख तर छटाकभरच आहे याची जानीव वारंवार कादंबरी वाचताना होते. उद्धव शळके हे स्त्रीयांचे जगणे,त्यांची सहनशीलता अगदी खुप सुंदरपणे क्याच करतात.ती बारिक सारीक अभिव्यक्ती ते सोडत नाहीत.शिंपी समाजाच्या कुटुंबाचा सांस्कृतिक देव आणि संकटांच्या समयी कौतिकच्या नेनीवेतून ज्याचा धावा होतो तो शादुलबाबा एक मुस्लिम सुफी संत आहे. एकदा शेतात रोजंदारीचे काम जास्तवेळ करता यावे.आपल्या लहान मुलीने त्रास देवु नये,झोपुन रहावे म्हणून कौतिकने आपली मुलगी यसोदीला रोजच्यापेक्षा जास्त अफु चारला.ज्यामुळे यसोदी हालचालच करेनासी झाली म्हणून कौतिकने भीतीपोटी आकाशाकडे हात करत नवस बोल्ला होता तो असा की " देवा शादुलबुवा,मह्या यडीबांगडीच्या हातानं काही चुकभूल झाली असनं त मले उचलून ने एक्का रातीतून,पन मह्य फय अस्स कच्च तोडुन नोको नेवू ,लागनं त मी तुह्या नावानं पाच बस्तरवार करिन पुडच्या बस्तरवार पासुन "
नंतर कौतिकने मोहरमच्या दिवसी आपला दोन नंबरचा मुलगा नामाला पाच घरे मागायला लावून हा नवस फेडल्ला.तो प्रसंग असा
मोहरमच्या दिवशी कौतिकने नामाला आंघोळ घातली. घासून पुसुन अंग स्वच्छ केल.डोक्याला खोबरेल तेल चोपडलं.भांग पाडुन दिला.नवं कुडत घालायला सांगितले.चड्डी नेसायला लावली.नंतर महादेवाच्या मालातल्या कोऱ्या करकरीत दुपट्ट्याची झोळी कीली.ती नामाच्या खांद्यावर अडकून दिली.तांबडा पिवळा नाडा गळ्यात घातला.हतात वाटी दिली.समजावून सांगितलेलं सारं काही त्याच्या डोक्यात शिरलं की नाही,हे पहाण्यासाठी विचारु लागली.
" किती घर मांगसिन ? "
" पाच."
" अन् काय मन्सिन?"
"हुसेन हुसेन धुल्ला " नामा लाजुन म्हनाला,
पण काओ मा,पाच घरं नाई हिंडलो त ? "
" नाई बाप्पा,हिंडाच लागते.त्याच्यात कायची लाज आये.आपल्या देवाचं आफुन नाई त कोनं कराव् ..."
" पन गुजी - जानराव हासन्नाओ."
" हासू हसले त.आमच्या शादलबुवानं आमाले असंच फकीर व्हाले सांगितलं मना.मंग कोनी नाई हसत... "
मग तू आगूदर त्याईले सांगनं,का हासू नोका मनू .. "
" हो जा सांगतो."
"आगूदर सांगनं. "
" सांगतो मंतो तं." पहिल्यांदा खेकसुन बोलल्यवर मग कौतिक शांतपणे म्हनाली.
" आन् कोनी काई देल्लं त थें हाती नौको घेऊ.वाटीत घेऊन झोईत टाकजो."
खांद्यावर झोळी घातलेला नामा लाजतमुरकत शेजारची पाच घरं हिंडला.पैकी कुणी गहू, कुणी तांदूळ,कुणी जोंधळे दिले.वर एकेक- दोनदोन पैसे.शेवटी सारं घेवून नामा सुटकेच्या अनंदात घरी आला.
कौतिकानं सारं धान्य एकात दळून काढलं.खिचडाच तो. भिक्षावळीतल्या पैशांचं गुळ दुध आणलं.खिचड्याच्या पिठाचे रोडगे झाले.महादेवने गुळदुधात कुस्करले. त्याचे लाडु बांधले.शादलबुवाला त्या लाडवांचा नैवेद्य दाखवला.ऊद जाळला. अबीर वाहिला.नंतर महादेवनं शादलबुवापुढं डोकं टेकलं नामालाही टेकायला लावलं. शेवटी कौतिक आली.तिनं यसोदिला उघडं केलं.शादुलबुवापुढं उपडं केलं.तिच्या नामाच्या व स्वताच्या गळ्यापोटाला अंगारा लावला.स्वता डोकं टेकुन नमस्कार करताना पुटपुटली.
" बाप्पा शादलबुवा,मले यडीबांगडीले काई नाई समजत. चुकलंमाकलं थें पोटात घाल. ह्या सर्वा तुहाच फापटपसारा आये.तारसीन त तारजा आन् मारसीन त मारत जा ! "
कौतिकचे कुटुंब म्हणजे शिप्यांचे आर्थिक सर्वहरा जातीतले शेतमजूर कुटुंब आहे.तिची संकटकालीन नेनीव कोण्यातरी सुफी मुस्लिम संताचा धावा करते.आणि त्या मुस्लिम संतालाच ती जगाचा सर्वेसर्वा करुन टाकते.हे सर्व जग तुझाच फापटपसारा आहे.तुच सर्व निर्माण केले आणि तुच विनाश करणार अशी तिची भूमिका आहे.आमच्या या कौतिकच्या तत्वज्ञानातला सर्वेसर्वा शादलबुवा आहे.
आजच्या सारखी ग्रामीण भागात हिंदू मुस्लिम वगैरे अशी भांडणेही नाहीत.सर्वांचे राबने पोटासाठी आहे.म्हणून राबनारे मुस्लिम कुटुंब कौतिकला आधार देते.कौतिकचा धावाही एका मुस्लिम संताचा आहे.येथे कौतिकसाठी स्वजातीय परके आहे तर परधर्मीय मुस्लिम आप्तस्वकीय आहेत.तिचा धर्म तिला मदतही करत नाही की तिची चौकशी सुद्धा करत नाही. तिचा धर्म तिला लुटतो.आणि मदतीला येतात परधर्मीय. ही ग्रामीण भागातील माणुसकी आहे.जी आज भांडवलशाहीने संपत चाललेली आहे.
उद्धव ज.शळके यांच्या मांडणीला,निरिक्षणाला,सलामच
नितीन सावंत,परभणी
9970744142
