♦गांधी शिवाय मार्क्सवाद चालवता येतो.
जाती व्यवस्था समर्थक, वेदांती विचाराचे प्रचारक गांधी पुरोगामी चळवळीचे प्रतिक म्हणून स्विकारा हा अट्टाहास का ? कशासाठी ?
या देशातील जातीवाद असा की
आजच्या या जात-वर्गीय ब्राम्हणी व्यवस्थेतील निम्नजातीय व्यक्तीने जागतिक दर्जाचे काम केले तरी ते सर्वांना अनुकरणीय, व्यापक प्रतिक बनु दिले जात नाही. बनवले जात नाही. उदा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जे जागतिक दर्जाचे विचारवंत,भारतीय अस्पृश्यता, जातीव्यवस्था ही समस्या प्रथम प्राधान्यक्रम देवून जागतिक पटलावर चर्चेला आननारे महान व्यक्तीमत्व. त्यांच्याबद्दल लैच मजबुरीने हात आखडता घेवून, नाविलाजाने जयंतीच्या शुभेच्छा वगैरे दिल्या जातात.
पण, ज्या गांधीचे संपूर्ण जीवन जात-वर्गीय व्यवस्थेच्या समर्थनार्थ गेले. अस्पृश्यता निवारण्यासाठी द्यायच्या उपायाच्या संभ्रमावस्थेत गेले. त्या गांधीजीला ओढून ताणून तत्वज्ञ बनवून त्यांच्या विचारसरणीला गांधीवाद वगैरे बनवून मिठ मसाला लावून बळजबरीनेच प्रतिक म्हणून थोपवणे पुरोगामी चळवळीत आजही चालु आहे.
#गांधीनी_तुकोबांचे_अभंग इंग्रजीत भाषांतरीत केल्याने ते लगेच पुरोगामी होतात. लिखानाचा विषय बनतात. पण तुकोबांच्या संकल्पनेतला मुक्यांचा नायक ठरलेला मूकनायककार मात्र उपेक्षित असतो. कारण काय ? जातीव्यवस्थाच ना ?
डॉ आंबेडकर हे निम्नजातीय प्रतिक नको ..
काहीजण म्हणतात संपूर्ण गांधी नाकारता येनार नाही. गांधी थोडेफार चांगले होतेच की.
आता बहुजनांच्यात तथा सर्वहारांत हजारो प्रतिके, महापुरुष एकापेक्षा एक गुणसंपन्न असताना थोड्यास्या गुणसंपन्न व्यक्तीला प्रतिक म्हणून स्विकारा हा अाग्रह का ? कॉग्रेस टिकली पाहिजे जगली पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांनी आपली आयडॉलॉजी बदलून घ्यावी. प्रतिके बदलून घ्यावेत. इतकुसाकच चांगला असलेला गांधी बाजुला ठेवून फुले आंबेडकर प्रतिक म्हणून स्विकारावेत.
#जातीव्यवस्था_वर्णव्यवस्थेचे_समर्थक तथा डाव्या पक्षांचा कधीच साधा सदस्यही नसलेले गांधी आज डाव्यांच्या आयडॉलजीचा कणा बनलेले आहेत. पण डाव्या चळवळीचे सदस्य तथा स्टार प्रचालक असणारे आणि जातवर्गांतक साहित्य लिहीनारे अण्णाभाऊ मात्र डाव्यांचे गांधीएवढे तात्विक प्रतिक बनलेले नाहीत.
कारण काय ?
अण्णाभाऊ माजी अस्पृश्य जातीतुन आलेले तर गांधी #उच्चजातीय_प्रतिक...
गांधीला विरोध म्हणजे संघाला मदत अशी एक भिती दाखवली जाते.
मग गांधी स्विकारणे म्हणजे आंबेडकरी विचारधारेशी द्रोह नव्हे का ?
पण डॉ आंबेडकर विचारात कोण घेतोय ....
त्यांचे म्हनने असते तुम्हाला गांधी समजलेच नाहीत. तुम्ही गांधीवरली ही ही पुस्तके वाचा. मग त्यांना विचारले तुम्ही आंबेडकर वाचले का तर ते नाही म्हणतात.
#गांधी समजून घेण्यासाठी आंबेडकर सुद्धा वाचावे लागतात हे त्यांना मान्य नसते. हा मोठाच आंतर्विरोध.
गांधी प्रतिक म्हणून स्विकारा हा अट्टाहास का ?
आमची पण प्रतिके स्विकाराकी ...
--------------------------------------------------------------------------
भारतामधे आलेली मार्क्सवादी चळवळ ही उच्चजातीयांनी आणल्यामुळे ती जात्यांतक न रहाता केवळ वर्गांतक हा एकेरी लढा लढत राहिल्याने आज मार्क्सवादी पक्षांची फार मोठी सरशी झालेली आहे.
तरिही फुले आंबेडकरवादाचा व्यावहारिक जोड डाव्यांना अजूनही घ्यायचा नाही.फुले आंबेडकर व्यावहारिक जात्यांतक पण ते शुद्र आतिशुद्र जातीतले तर गांधी बनिया उच्चजातीय तो चालवायला सोपा जातो म्हणून अजूनही ज्याचा कुठलाही तत्वज्ञानात्मक वाद नाही तो गांधीवाद ब्राम्हणी डावे सोडायला तयार नाहीत.
जातवर्गस्त्रीदास्यांतक तत्वज्ञान उभारणारे कॉ.शरद पाटील
गांधीबद्दल म्हणतात...
1)काँग्रेसचे सर्वोच्च नेते टिळक व गांधीजी हे चातुर्वर्ण्य समर्थक वेदांती होते.
(जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर १७९ )
2) आणि खुद्द बनिया भांडवलदार जातवर्ग बुद्धकालीन मेंडकासारख्या गहपती भांडवलदारांचा क्रांतिकारी वारसा चालवणारा कधीच नव्हता. त्यांचे महत्तम राजकीय प्रतिनिधी गांधीजी.निळउत्पादक भारतीय शेतकऱ्यांची ब्रिटिश प्लॅटर्सविरुद्ध बाजू घेऊन लढणारे गांधीजी एक होते. तर सत्याग्रहींनी जमीनदारांचा खंड द्यायचे बंद करण्यापर्यंत जाऊ नये म्हणून चौरीचौरा ची पोलीस चौकी जाळली गेल्याचे निमित्त करून सत्याग्रहसंग्राच बिनशर्त मागे घेणारे गांधीजी दुसरे होते.ब्रिटिश सरकारने दिलेला कम्युनल ॲवॉर्ड मान्य करणारे गांधीजी एक होते. तर तो अस्पृश्यांना लावावा या आंबेडकर यांच्या मागणीला जिवावर उदार होऊन विरोध करणारे गांधीजी दुसरे होते.पण हे दोन्ही विरोध मिळून गांधीजी बनले होते.कारण भांडवलदार जातवर्गाला जातीव्यवस्था अबाधित ठेवून स्वातंत्र्य पाहिजे होते.आज या जातवर्गाला वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूकडील वरकड जमिनींचे अतिशुद्रांत फेरवाटप करून संपन्न ग्रह बाजारपेठ निर्मायाला विरोध आहे. आणि म्हणूनच औद्योगिक विकास ठप्प होऊन बेकारी व दारिद्र्य वाढले आहे.
(जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर 188 )
3)गांधीजींनी जरी स्वातंत्र्यचळवळीत शेतकऱ्यांप्रमाणे स्त्रियांना आणले तरी त्यांनी आंबेडकरांची जातीअंताची मागणी न स्वीकारल्यामुळे उच्च जात वर्गीय स्त्रियांच्या पलीकडे स्वातंत्र्यचळवळीत स्त्री आल्या नाहीत.
( जात्यांतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती पेज नंबर १९४)
------------------------------------------------------------------------
१)गांधी हे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते.जातीव्यवस्था त्यांना इश्वरदत्त वाटे.त्यामुळे ते मार्क्सवाद:फुले आंबेडकरवादी गटाचे तथा सौत्रांतिक मार्क्सवादी गटाचे प्रतिक नाही बनु शकत..
२) डॉ बाबासाहेब आंबेडकर गांधीला नेहमी मिस्टर गांधी म्हणायचे.त्यांनी संबंध आयुष्यात गांधीला कधीही महात्मा म्हटले नाही
३) व्हाट गांधी ॲंड कॉग्रेस ह्याव डन टु अनटचेबल्स
हा ग्रंथ लिहून बाबासाहेबांनी तेव्हाच गांधी पुर्ण उघडे पाडले आहेत.
ते सर्वहरांच्या जात्यांतक लढ्याचे प्रतिक बनु शकत नाहीत .
४)इंडिया टुडे नावाच्या सर्वाधीक खपाच्या मासिकाने सुद्धा गांधीजींच्या ब्रम्हचर्यत्वाच्या प्रयोगांवर निर्भयपणे लिहीलेलेले आहे ..
५)गांधीवाद तत्वज्ञान वगैरे होऊ शकत नाही.तरी त्याला ओढून ताणून तत्वज्ञान बनवने म्हणजे बळजबरीनेच उच्चजातीय प्रतिक स्विकारणे होय.
6)हजारो वर्षापासून उपेक्षीत असणारे माजीअस्पृश्य लोक जेव्हा हक्क अधिकार मागत होते तेव्हा त्यांना स्पेशल मताधिकार मिळु नये म्हणून उपोषण करुन खोडा घालनारे गांधी मानने म्हणजे माजी अस्पृश्य जातींची क्रूर थट्टा आहे.हे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जखमेवर मिठ चोळणे होय.
--------------------------------------------------------------------------
गांधीवादाचा रस्ता जातीव्यवस्था,वर्णव्यवस्थेच्या समर्थाने उच्चजातवर्गीयांची निमसरंजामी निमभांडवली व्यवस्था मजबुत करणाऱ्या राजकीय ध्येयस्थळी पोहंचतो.हा सबरमतीचा संत ज्यांच्या कृतीत आहे ते जय भीमचे नारे फक्त स्टेजशोसाठी देतात.त्यांच्या उक्तीत आणि कृतीत अंतर आहे.आम्हाला कृतीत ॲनहिलेशन ओफ कास्टवाले,ह्युमिनीटीला प्रधान माननारे आंबेडकर हवेत. इश्वर अल्लाह तेरो नाम ही समरसता झाली.ती आम्हाला नकोय.गांधी आंबेडकरवादाचा तात्विक मेळ बसु शकत नाही.त्याचे निर्माते परस्परविरोधी विचारधारेचे एकाच काळातील प्रतिनिधी आहेत.जात्यांध की जात्यांतक हा आमचा प्रधान निकष आहे.आता पुन्हा इमोशन्यालिटीची लाट गांधीच्या रुपाने आनने म्हणजे पुन्हा पुर्वीचीच उच्चजातवर्गीयांचीच ब्राम्हणी व्यवस्था स्वताहून मागणेच ठरेल.हा काळ प्रखर भूमिका घेण्याचा आहे.अन्यथा पुर्वीचे पाढे पन्नास..
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
#फुले_आंबेडकर_अपरिहार्य
#अब्राम्हणी_कम्युनिझम
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment