Wednesday, 20 May 2020

ll संत चोखोबारायांचा समाधी सोहळा दिवस ll

ll संत चोखोबारायांचा समाधी सोहळा दिवस ll

सर्वच संतांवर सर्वात मोठा अन्याय कोणता झाला असेल तर त्यांची मते विकृत करुन खपवली गेल्याचा.किंवा संत जे म्हनालेच नाहीत ते त्यांच्या नावे खपवले जाने.काही संतांवर तर त्यांचे श्रेय दुसऱ्यालाच देवुनही अन्याय झालेला आहे.
वारकरी सांप्रदायाचे पहिले आणि मुख्य नेतृत्व संत नामदेव होत.त्यांनीच उत्तरेकडे दौरे काढले,सांप्रदायाचे अभंगरुपी तत्वज्ञान निर्माण केले आणि विठ्ठलाची आरती लिहीली.तरी त्यांना अडगळीत टाकण्याचा मोठा कट महाराष्ट्रात आजतागायत झाला आहे.
संत चोखोबारायांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात संत नामदेव यांनी वेळोवेळी भूमिका घेतली होती.पंढरपूरातील ब्राम्हण बडव्यांनी चोखोबारायांना पंढरपूराच्या बाहेर हकलल्यानंतर चोखोबाराय चंद्रभागेच्या पलीकडे जावुन राहिले असताना,संत नामदेव संपूर्ण संतमंडळाला तिथे घेवून गेले.सर्वांनी संत चोखोबारायांच्या घरी सहभोजन केले.मोठा उत्सव साजरा केला गेला.संत चोखोबाराय वेस पडुन गतप्राण झाल्यानंतर मंगळवेढ्याच्या वेसीच्या ढिगार्यातून  त्यांची हडे गोळा करुन पंढरपूरातील विठ्ठल मंदिराच्या पायरीला समाधी बांधण्याचे मोठे धाडस संत नामदेव यांनी केले होते.या संपूर्ण सोहळ्याचे नेतृत्वच संत नामदेव यांच्याकडे होते.तरी त्यांना मुख्य नेतृत्व म्हणून मानण्यास ब्राम्हणी छावणीचा विरोध आहे.
संत चोखोबारायांचा समाधी उत्सव वैशाख महिन्यात साजरा केला जातो. या उत्सवाचे नियोजन संत नामदेव महाराजांचे  वंशज असलेल्या नामदास मंडळींकडे असते. वैशाख वद्य पंचमी हा चोखोबारायांचा निर्वाण दिवस तर वैशाख वद्य त्रयोदशी हा चोखोबारायांचा समाधी बांधली तो दिवस. समाधी सोहळ्यानिमित्त छोटा मांडव घातला जातो. वैशाख वद्य पंचमीपासून अखंड वीणा उभा रहातो. वैशाख वद्य त्रयोदशीला कीर्तन व महाप्रसाद होतो.

नितीन सावंत परभणी
दि.20/5/2020

No comments:

Post a Comment