Thursday, 21 May 2020

भांडवली ईमानदारी आणि प्रामाणिकपणा

भांडवली ईमानदारी आणि प्रामाणिकपणा

जागतिक समाजव्यवस्थेचे मार्क्सवादाने एकूण सहा कालखंड केलेले आहेत.
आदिम साम्यवाद, सरंजामशाही,भांडवलशाही,साम्राज्यशाही,कम्युनिझम,आणि असे राज्य तिथे शासनसंस्था नसतील तो साम्यवाद.

प्राच्यविद्यापंडीत कॉ.शरद पाटील यांनी आदिम साम्यवादामधे मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता तर सरंजामशाही मधे तुर्कपुर्व आणि तुर्क आल्यानंतर खालून वरुन अशा सामंतप्रथा उभ्या केल्या आहेत.

भारतीय सरंजामशाहीमधे वर्णजातीय अभ्यास करताना अंतर्गत द्वंद्व, शोषणाची यंत्रणा याच बरोबर काही गुणविशेषही आपल्याला अभ्यासण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय भांडवलशाहीचे डावपेच आपल्याला कळनार नाहीत.

सरंजामशाहीमधे प्रामाणिकपणा, इमानदारी, नैतिकता, सदाचार, हे सर्व गुण प्रत्येकाला कंपलसरी पाळणे बंधनकारक आहे. कारण हि सरंजामशाही आपसी सालोहीत संबधाने, वस्तुविनिमय पद्धतीने बांधलेली आहे. एखादा गुण एखाद्या व्यक्तीने सोडला किंवा तो वाईट वागला,चुकला तर सामूहिक बहिष्काराद्वारे किंवा इतर शिक्षेद्वारे तो गुण पाळण्याची नियमावली पुन्हा प्रस्थापित केली जाते. सरंजामशाहीत 'जान जाय पर वजन न जाए' अशी यंत्रणा आहे. तिथे शब्दांचा आदर आहे. दिलेला शब्द आणि वचन पाळले जाते.

म्हणून सरंजामशाहीत 'पुरस्कारवितरण सोहळे' तुम्हाला दिसनार नाहीत.अत्यंत प्रामाणिक असल्याबद्दल,पैसे कमावताना टार्गेट पूर्ण केल्याबद्दल, उत्तम संवादकौशल्याबद्दल, नोकरी, काम प्रामाणिकपणे करत असल्याबद्दल पुरस्कार वगैरे. असले पुरस्कार सरंजामशाहीत तुम्हाला दिसनार नाहीत. हि देन भांडवलशाहीची. सरंजामदाराप्रती निष्ठा असणे अत्यंत महत्वाचे.

भांडवलशाहीत एकमेकांचे संबंध व्यावहारिक आहेत.त्यात पैशांच्या स्वरूप देवान घेवान होते,आणि पर्याय उपलब्ध असतात.शिवाय नफा हा उद्देश प्रधान बनल्यामुळे प्रामाणिक असणे,ईमानदार असने दुर्मिळ होत चालल्यामुळे त्यांना असले पुरस्कार देवून भांडवलशाहीला प्रामाणिक असल्याचे चित्र उभे करावे लागते. मोठा झालझोल करनाऱ्याला पुरस्कार देवून त्याला प्रामाणिक असल्याचे भांडवली यंत्रणा दाखवत असते.हे पुरस्कारही त्यांनीच निर्माण केलेले असतात.पुरस्कार वितरनाचे निकषही त्यांचेच असतात. किंवा मेडियाद्वारे पब्लिसिटी देवून भांडवली व्यवस्था एखाद्याला हिरो बनवते जो भांडवलदारांच्या ओंजळीने पाणी पित असतो.

तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रामाणिक असने कौतुकास्पद कसे होऊ शकेल? प्रामाणिकपणा हा तुम्हाला मिळालेला उपजत गुण आहे.तो तुम्ही पाळलाच पाहिजे.तुम्ही प्रामाणिक असायलाच हवे ना. तुम्ही इमानदार नाहीतर काय बेइमान होनार का ? स्पेशली सरकारी क्षेत्रात काम करनाऱ्या एखाद्याला मेडिया ते खुप ईमानदार आहेत,प्रामाणिक आहेत म्हणून जर पब्लिसिटी देत असेल तर समजावे काहीतरी लफडा आहे.
त्याला पगार कशासाठी मिळतो ? इमानदार आणि प्रामाणिक असण्यासाठीच ना ? कि बेइमान वागावे म्हणून ?

सरकारी क्षेत्रात काम करनार्यांचा इमानदारी हा गुण कौतुकाचा विषय होऊ शकत नाही जरी भांडवलशाही त्यांचे कौतुक करत असेल तरी...

हल्ली वकिलीच्या क्षेत्रात आमका ईमानदार म्हणून विशिष्ट व्यक्तिला पब्लिसिटी आशा प्रकारे दिली जाते जणू काय सर्व वकिल बेइमानच आहेत. पोलीस खात्यातातही विशिष्ट मेकअप केलेला चेहरा भांडवलशाही ईमानदार म्हणून दाखवते जणू काय सर्वच सावळे काळे खरबड्या तोंडाचे बेइमानच असतात. यात आयुक्त असो नाहीतर कलेक्टर ते लै ईमानदार आहेत म्हणून भक्ताड आणि ते आपल्या जातीचे हाइतवाले रोज पारायणे करत असतात.मग तुमच्या साहेबाला पगार न घेता इमानदार प्रामाणिक रहा म्हनावे? जनु काय आख्खे जग बेइमान झाले आहे. आणि हे दोनचारजनच तेवढे प्रामाणिक, इमानदार उरले आहेत.

कर्तव्यात इमानदारी आणि या प्रामाणिकपणा या गुणांचे कौतुक होत असेल तर समजावे देश विनाशाच्या दिशेने जात आहे. कारण हे गुण दुर्मिळ होत असल्याचे लक्षण आहे.

नितीन सावंत परभणी
9970744142
३१/१२/२०१८

No comments:

Post a Comment