भटक्यांच्या स्वतंत्र्याचे काय ?
पोट आणि भुक जन्माला घेवून येणारी माणसे म्हणजे भटके विमुक्त.गावच्या हगनदरीत बिराड उतरवून कोरकुटक्यासाठी आयुष्य पनाला लावणारी ही माणसांची टोळी.
आपल्याच सारखी दिसनारी हडामासाची माणसे किती भिषण आणि वेदनादाई जीवन जगतात ना ?
फक्त आणि भक्त अन्नासाठी जीव धोक्यात घालून कुठल्याही जीवघेण्या प्रयोगाला ते सामोरे जातात. छातीवर दगड ठेवून मोठ्या हतोड्याने दगड फोडताना दगडी मनाचे कुनीच का त्यांना थांबत नसावे ? ती गोलाकार झुंड किती निर्दयीपणे पहात असते.डोळ्याच्या बुबुळात दोरीची गाठ खुपसून मोटारगाडी किंवा दगड ओढनारे ते प्रयोगकर्ते आणि त्यांच्या त्या शरिराला आणि टोळ्यांच्या खाचांना त्रास होताना बाजुचे नुसतेच पहातात. त्या जीवघेण्या वेदनेला कुनीच का थांबत नसावे ? खड्डा खोदून त्यात स्वताला तासंतास पुरुन घेवून गुदमरून जायची रिस्क घेनारे त्या मातीच्या ढीगार्यावर चार चिल्लर पैसे कुनी टाकतील याची वाट पहात असतात.कित्तेक मधेच गुदमरून मेले सुद्धा पहाणाऱ्याला फारसी दया आल्याचे अजुन पहाण्यात नाही.
हे तर महाभयंकर आहे की आपल्या पोटाचा गोळा,! अगदीच केविलवाणी पहाणारी ती बाहुलीच जनु,काठीवर बांधून तिला लोकांच्या समोर प्राण्याप्रमाणे खेळवणे, मृत्यूच्या दारातून तिची ने आन करणे आणि सभ्यतेचा आव आणणाऱ्या संस्कृतीने ते करमणूक म्हणून पहाने किती अमानवीय आहे.
करोडो भटक्यांना अजुन बुड टेकवायला हक्काची जागाही नसावी किती दयनीय जीवन आहे हे !
या देशात संधी गुण किंवा कार्यकतृत्व बघुन मिळत नाही तर जात,वस्त्या,रहणीमान आणि तोंड बघून दिली जाते.आम्ही गुणवान नाहीत हे साफ खोटे आहे.आम्हाला संधी दिली जात नाही हे वास्तव आहे.संधी दिली तर त्यांचे रेकॉर्ड मोडले जातील,त्यांना शरमेने माना खाली घालाव्या लागतील म्हणून प्रस्थापित व्यवस्था सदैव संधी नाकारत असते तरिही एखादी हिमा दास त्यांच्या थोबाडीत एडिडासचा बुट मारतेच.
सर्कसीत अशक्य कोटीतले प्रयोग करुन दाखवणारे सारे पोटाच्या भुकेचे व्याकुळ कलाकार एकच संदेश देत असतात आम्हाला संधी द्या रे आम्हीही काही कमी नाहीत.
मानवी शरिराचा संपूर्ण तोल टांगलेल्या दोरीवर तासंतास संभाळून धरणे,छातीवर दगड फोडणे,बैलाला,माकडाला,अस्वलाला,कबुतराला,कुत्र्याला सर्व कौशल्य पनाला लावून ट्रेन करणे,उंच आकाशातील उडत्या पक्षाला एकाच नेमात जमीनीवर पाडणे आणि ते ही भटके विमुक्त तुमच्या भाषेत अज्ञानी जमातींनी, अचाट आहे हे.
देशाच्या कलाकारी आणि करमणुकींच्या क्षेत्रात देखील तुम्हाला माजी अस्पृश्य,भटके विमुक्त,आदिवासी,दलीत,शेतकरी जातीतले चालु नयेत दुखद आहे.
या देशात पारधी,बेलदार,कैकाडी,वडार,डक्कलवार , उचल्या वासुदेव आणि आदिवासी यांसारख्या असंख्य जाती,जमाती ह्या आजही भटकंती करत जीवन जगतात.त्यांच्या नावावर स्वताची हक्काची इंचभरही जमीन नाही.काही जातींना एखाद्या गावी आपला पाल ठोकावा लागला तर त्यांना गावच्या हगनंदरीत रहावे लागते.
आशा जाती जमातींची मुले शाळेत गेल्यानंतर भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा रोज त्यांना म्हनायला लावतात.
भारताला माझा म्हणण्याइतपत त्यांच्याकडे हक्काचे काय आहे?
प्रतिज्ञेतील माझा या शब्दावर माझा आक्षेप आहे.
भारत एक देश आहे.त्या देशातील सर्वजन माझे बांधव आहेत.माझे त्या देशावर प्रेम आहे.अशी ती प्रतिज्ञा भटक्या विमुक्तांसाठी असावी.
ज्यांच्या नावे पाय ठेवायला इंचभर जमीनही नाही,ज्यांना पाणी प्यायला हक्काचा पानवठा नाही,ज्यांना मुक्त वावरायला एक हक्काचा गाव नाही, त्यांना अख्खा भारत माझा म्हनायला लावने ही त्यांची क्रृर थट्टा आहे.
तरीही नकट्या नाकाने आम्ही वर्षामागून वर्षे स्वातंत्र्याचे सोहळे साजरे करत आहोत.
नितीन सावंत परभणी
9970744142
दि.१५ ऑगस्ट २०२०
No comments:
Post a Comment