♦️तुटलेपणाची , एक्कलकोंडेपणाची , समाजव्यवस्थेपासून दुर गेल्याची , परात्मतेची , मणुष्यत्वापासून दुर गेल्याची लक्षणे कोणती ?
१) सभ्य वागावेसे वाटणे. कमी आणि मोजकेच बोलणे. दिड दोन इंचच हसणे.खळखळून मोठ्याने हसनारे बावळट वाटणे. उनाड , मुक्तछंदी , बोलक्या लोकांचा तिरस्कार वाटणे , त्यांना हिन लेखने. अकाली म्याच्युअरिटी येने.
२)सर्वकाही नियमांत व्हावे असे वाटणे. तारखा आणि वेळेला, नितिमुल्यांना अवाजवी महत्व देने.अवेळी , न सांगता , आचनक कुनी आलेले गेलेले न आवडणे .शिस्त, आणि स्पर्धेची उदाहरणे सतत जिभेवर असणे.
३)सर्वकाही नफ्यातोट्याच्या गणितात बसवणे , माझा फायदा काय हा पहिला प्रश्न पडणे. निखळ आनंद , मैत्री ,शेजारधर्म निसर्गसानिध्य निव्वळ बकावास वाटणे.आजुबाजुच्यांना ते आहेत तसे न स्विकारता टोकाच्या मोजपट्टीवर तोलत रहाणे.
४)अभिनंदन, भरभरून कौतुक न करणे. मुक्तपणे कौतुक करणारे लोक चमचे वाटने. नुकतेच मेलेल्या लोकांच्याप्रती थोडीही संवेदना न वाटणे. चांगल्या आणि जास्त शब्दांत त्यांना अभिवादनही न करणे. त्यांच्या कार्याची दखल न घेणे.तशी दखल घेणारे मुर्ख, चमचे वाटणे.
५)भांडवली झगमगाटाचा हव्यास असणे.तशी वेशभूषा , तशी बोली कॉपी करणे. ब्र्यांड व लेबलांत मोजमाप करणे .पाश्चिमात्य जग सगळेच चांगले , सायंटिफिक वाटणे . वकिली करुन तसे सतत सिद्ध करत रहाणे.भारतीय परंपरा, सन , वार , उत्सव, संस्कृती तुच्छ , टाकावू वाटणे.भारतातील लोक , बोली , त्यांचे व्यवहार रानटी वाटने.
६) कुनाच्याही मातीला न जाणे.वाढदिवस आनंद सोहळे साजरे न करणे.हे सर्व टाइम वेस्टिंग वाटणे. प्रेझेंट क्षण न जगता सतत भविष्यात डोकावणे. ऐम, लक्ष , टार्गेट , गोल आणि ॲच्युमेंट सतत डोक्यात असणे. त्यासाठी सतत धावपळ करत रहाणे . थोडक्यात काय एकजीव मिक्सअप न होने , किंतूपरंतु ठेवणे , सतत विरोधी भूमिकेत असणे.
आदी गुणवैशिष्ट्ये असणारी लोक्स महारोगीट आहेत.ती सतत या एक्कलकोंड्या , परात्मतेच्या घानेरड्या रोगाची लागण इतरांना करत असतात.आणि वरुन बिनकामी टाकावू सोज्वळ सभ्यतेचा आव आनत असतात.तुसडेपणाच्या सर्वोच्च टोकावर असनारे लोक अत्यंत विघातक आहेत.त्या कामसूत्र जाळनार्या भक्तांपेक्षाही तकलादू , गएगुजरे हे काहीच न करु पहानारे आहेत.
नितीन सावंत परभणी
संस्थापक अध्यक्ष
मानव मुक्ती मिशन
9970744142
No comments:
Post a Comment