Thursday, 2 September 2021

ll ब्रम्ह मिथ्या , जगत् सत्य ll

ll ब्रम्ह मिथ्या , जगत् सत्य ll 

भारत गुलाम राहिला त्याला इतर कारणांबरोबर  धर्मव्यवस्था सर्वात मोठी जबाबदार आहे.संसार आणि भौतिकवाद माया आहे असला खोटा सिद्धांत येथील धर्मपुरोहीत हजारो वर्ष सांगत होते. 
                 सगळं माया म्हटल्यानंतर तुम्ही कसला शोध लावनार.येथे कधीच न्युटन ग्यालिलीओ जन्माला आला नाही.येथे फक्त भोंदूंच्या जमातीच्या जमाती जन्माला आल्या. 
                  तुमच्या गुलामीला सिकंदर चंगेजखान इंग्रज जबाबदार नाहीत तुमच्या गुलामीला शंकराचार्य आणि धर्म चालवनारे ब्राम्हण जबाबदार आहेत.ब्रम्ह सत्य जगत मिथ्या हा खोटारडा सिद्धांत ब्राम्हणांनीच मांडला ना ? खरे तर जगत सत्य आहे, ब्रम्ह ब्रिम्ह सर्व मिथ्या आहे.पण खोटी बकवास अजुन चालुच आहे.जग कसेकाय खोटे असु शकेल.तरी करोडो सत्संग चालु आहेत.आणि त्यात जग खोटे आहे हे सांगणे चालु आहे. 
          ब्रम्ह सत्य जगत मिथ्या या सिद्धांताने लोक नपुसक बनले गेलेत.लोक अळशी बनले गेले.पाश्चिमात्य प्रगत बनले त्याचे कारण ते भौतिक जगणे मुख्य मानतात.ब्रम्ह वगैरे तिकडे काही नाही.भौतिक जग सुंदर बनवण्यासाठी ते झटत आहेत.आणि इकडे मात्र घरासमोर तुंबलेले गटार यांना मोकळे करता येइना हे सभोवतालचे जग काय सुंदर बनवतील.यांचे मेल्यानंतर मोक्ष स्वर्ग मिळावा यासाठी आटोकाट प्रयत्न चालु आहेत.भारतीयांच्या दृष्टीने तुंबलेले गटार मिथ्या, मोक्ष अंतिम सत्य. 
          सर्व धर्मग्रांथांची पाने चाळा,भिती आणि प्रलोभनाच्या पलीकडे कुठलाही भावार्थ पुरोहितांकडून दिला गेला नाही.माणुसपणाची कोणती शिकवण यांच्या ब्राम्हणी धर्माने दिलीय ? लुटा , लुबाडा , ओरबडा याला मात्र धर्ममान्यता दिली आणि सर्वसामान्यवर्ग नेहमीच वेठबिगारी बनवला गेला. 
     आणि आज घडीला सज्ञानी म्हणवून घेनारा उच्चशिक्षीत वर्ग सुद्धा त्यांच्या शुभाशुभाच्या भ्रामक कल्पनांचा प्रचार करत आहे.
गैबानेपणाचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही उच्च शिक्षीत सुद्धा गैबाने बिंडोक असु शकतात.जन्मलेल्या लेकरांची नावे ठेवण्यापासून ते पिंडदानापर्यंत सर्व कब्जा ब्राम्हणांचा त्यामुळे स्वतंत्र विचार करणे भारतीय जाती जमातीत नाही. 


नितीन सावंत परभणी
9970744142

No comments:

Post a Comment