कबीर लतिफ मोमीन मुसलमान l
सेना नाव्ही जान विष्णुदास ll
-संत तुकोबाराय
मंगळवेढा हे शहर सोलापूर जिल्ह्यात येते.मंगळवेढा पंढरपूर पासून अवघ्या 27 km अंतरावर आहे.या मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले त्यामध्ये संत दामाजी पंत,संत चोखामेळा,संत कान्होपात्रा,संत बसवेश्वर,संत मौनी बुवा,संत गैबीबाबा आणि संत लतिफ बुवा होत.या मंगळवेढ्याच्या भूमीत सर्वांत जास्त संत विसावले,वाढले,बहरले आणि तिथेच त्यांनी आपला देह ठेवला. काहीजन जन्माने तिथलेच तर काहीजन बाहेरचे.मंगळवेढा पुर्वीचे मोठे शहर.त्यामुळे तिथे सर्वच धर्म,पंथ,सांप्रदायाची रेलचेल असे.अनेक साधु,संत,मुनी या शहरात येत असत.अगदी असेच लतिफशाह नामक एक संत विजापूरच्या शहरातून मंगळवेढ्याला आले होते.मंगळवेढ्यात आल्यावर ते लिंगायत धर्मीयांच्या मठात थांबले होते.पुढे लिंगायत आचार्यांनी त्यांनी तिथेच रहण्यास अग्रह धरला आणि ते शेवटपर्यंत मंगळवेढ्यातच आपले सामाजिक आध्यात्मिक कार्य करत राहिले.आज मंगळवेढ्यात संत लतिफशाहा यांची समाधी असनारा एक दर्गा आहे.बाजुला लतिफशाहा यांच्या सोबत आलेल्या इतर सहकारी संतांच्याही समाध्या आहेत.लतिफशाहा यांच्याबद्दल सकल संत गाथेत एक अभंग समाविष्ट आहे. म्हणजे हे संत वारकरी सांप्रदायत सर्वानुमते मान्यताप्राप्त आहेत.या मान्यतेचा आनखी एक पुरावा असा की संत तुकोबाराय सुद्धा या संताचा उल्लेख करतात तो असा की,
कबिर लतिफ मोमीन मुसलमान l
सेना नाव्ही जान विष्णुदास ll
म्हणजे संत लतिफशाह हे सुफी संत होते. त्यामुळे त्यांची समाधी दर्ग्याच्या स्वरूपात आहे.ते लिंगायत धर्मातही प्रिय आहेत आणि वारकरी संतांचे तर ते प्राणप्रिय आहेत.इतका एकात्म संत सापडणे मुश्किल.ज्याअर्थी संत तुकोबाराय या संत लतिफशाह यांचा उल्लेख आपल्या अभंगात करतात त्याअर्थी ते संत संत तुकोबारायांच्या आधीचे असण्याचा निकष आपन बांधु शकतो.लतिफशाह यांचे एकूण दोन अभंग पुर्णस्वरुपात तर एक अभंग आर्धा,असे एकूण ३ अभंग आज आपल्याला उपलब्ध आहेत.रा.चिं.ढेरे यांनी आपल्या मराठी मुसलमान संतकवी या ग्रंथात लतिफशाहा यांच्याबद्दल लिहीताना त्यांचा एक अभंग समाविष्ट केला आहे.तो असा ..
आता पुजा कुठे वाहू l
पहाता देहीच झाला देवु ll
भावे पुजन करिता l
देही देव झाला तत्वतः ll
तोडु गेलो तुळशीपान l
तेथे अवघा मधुसूदन ll
अत्र गंध पुष्प धुप l
अवघे विठ्ठल स्वरूप ll
फल तांदूळ नैवेद्य l
पहाता अवघाची गोविंद ll
म्हने लतीफ ब्रम्हज्ञानी l
अवघा पहाता चक्रपाणी ll
आणि वारकरी धर्माच्या मान्यताप्राप्त सकलसंत गाथेत त्यांचा दुसरा अभंग खालीलप्रामाने सामाविष्ट आहे.
बाजरगीर देख नहीं उपजता नहीं गावदी l
आंखया होके दुनिया आंधी ll
आजब आजब हूं इस तनका l
घडी पहेर खेल है नही गारुडका ll
राजा और रंग एक राह सबकी l
मट्टी हो जाय घडी पलख तनकी ll
कहे लतिबशा गुरु मिल जद हमकू l
संसार झुटा गारुड हो गया तबकू ll
इतका ग्रेट संत आणि ब्राम्हणी व्यवस्थेने त्यांच्याबद्दल कुठलेही साहित्य जतन केले नाही.उलट नष्ट केले असण्याचीच शक्यता जास्त आहे. तरिही हा संत जीवंत राहिला तो इतर संतांच्या उल्लेखांवरुन. संत लतिफशाह बद्दल मोरोपंत म्हणतात
" ख्यात तुकारामसुत साधुसभा प्राणवल्लभ लतिफा l
हृदयात स्मरा त्यासी असो भागवत भक्त जाती असतीलभा ll "
संत तुकोबाराय यांनी लतीफशाह यांच्या पुष्कळ लिखान केले असावे. म्हणूनच तर मोरोपंत लतिफ यांना तुकारामसुत म्हनत आहेत.दुर्देवाने आज तुकोबाराय यांनी केलेले ते उल्लेख नाहीत.
संत लतिफ यांनी एक हिंदी पदावली लिहीलेली आहे त्यात संत नामदेव यांचा उल्लेख लतिफशाह यांनी पहिला संत म्हणून अग्रभागी केला आहे. याद्वारे वारकरी सांप्रदायाचे पाया रचैता पद हे नामदेवांच्याकडेच जाते.संत लतिफशाह म्हणतात
ऱामनाम नौबत बजाई l
पेहली नौबत नारद सुंबर ll
दुसरी नामा कबीर सुनाई ll
यात संत ज्ञानेश्वर नाव नाही.संत लतिफशाह यांच्यावर महितीबुवांनी सुद्धा लिखाण केले आहे.सर्व संतांची चरित्रे असनार्या भक्तिविजय ग्रंथात महिपतीबुवांनी लतिफशाह यांना स्थान दिले आहे म्हणजे ते किती उल्लेखनीय व ग्रेट होते हे लक्षात येते.
असो या संताच्या समाधीवर नतमस्तक होण्यास संधी साधून येणे फारच प्रेरणादायी आहे.मंगळवेढा फिरून दाखवताना ह.भ.प योगेश महाराज सिद व ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी या संतांची भेट घालून दिली.दर्ग्याजवळ गेलो असताना बाजुला बसलेल्या मुस्लिम मंडळीना या संताबद्दल विचारले असता त्यांनी आपल्याला काहिच माहिती नसल्याचे कबुल केले.आम्ही म्हनालो हे लतिफशाह संत तुकोबारायांचे प्राणप्रिय संत होते.तेव्हा एक मुस्लिम म्हनाले मी संत तुकाराम यांच्यावर लागलेली टिव्हीवरली संपूर्णपणे सिरिअल पाहिली त्यात हे उल्लेख आले नाहीत.मी म्हनालो ब्राम्हणी मेडिया दाखवत नसतो.एकजन संत लतिफशाह यांचे वारसदार यांना बोलवायला गेले होते.पण ते घरी नसल्याचे कळले.नाहीतर आनखी काही वेगळी माहिती मिळाली असती.संत कबीर ते संत शेख मुहम्मद या क्रांतीकारी संत परंपरेतील हे लतिफबुवा आजच्या ब्राम्होभांडवली जातवर्गीय व्यवस्थेत एक क्रांतिदोस्ती करुन देनारा दुवा ठरो ..
असो मंगळवेढ्यातील इतर संतांच्या प्रमाणे संत लतिफशहा यांना सुद्धा आमचा ...
सांप्रदायिक जोहार ..
जय भारत ..
संदर्भ :
१)रा.चिं.ढेरे - मराठी मुसलमान संतकवी.
२) सकळसंत गाथा.
३) तुकाराम गाथा - देहुप्रत
४)प्राचार्य आप्पासाहेब पुजारी - मुलाखत
नितीन सावंत परभणी
मानव मुक्ती मिशन
9970744142
No comments:
Post a Comment