श्रीमंतांच्या घरातील स्त्रीया लग्नसमारंभ प्रसंगी ज्या पध्दतीने अंगभर दागीने लपेटून येतात तेव्हा त्या मला दागीने आडकवून ठेवायचा स्ट्यांडच वाटतात.
स्ट्याडला नाही का त्या दागीन्यांचे आडकवुन ठेवण्यापलीकडे काहिच करता येत नाही.अगदी काही स्त्रीयांचेही असेच आहे,त्या फक्त दागिने घालून मिरवु शकतात पण त्या दागिण्यांवर त्यांची मालकी नसते.पितृसत्ताक समाजव्यवस्थेत आमची बाई छान दिसावी म्हणून तिला नाजुक साजूक भरपूर दागिने बनवून दिले जातात. बहुतांश वेळा या दागिन्यांचा खर्च पुरुषांनी उचललेला असल्यामुळे बाईचे काम ते दागिने लपटने एवढेच असते.तिला त्यातला एकही दागिना मोडता येत नाही.त्यावर तिचा मालकी हक्क नसतो.म्हणून मला ती स्त्री दागिने आडकवायचा स्ट्यांड वाटते.
ग्रामीण भागातली मोठ्या घरची स्त्री परावलंबी आहे.तिला दागिने भरपूर असतात पण त्यावर तिची मालकी नसते.त्यामुळे ती जेव्हा भरपूर दागिने घालून कुठल्या तरी लग्न समारंभ किंवा उत्सवात हजर असते तेव्हा तिला इतके जपून वागावे लागते की एखादा दागिना हरपेल पडेल याच्याच धाकधुकीत ती वावरते.घरचे काय म्हनतील ही सदैव टांगलेली तलवार तिच्या डोक्यावर असते.
माझ्या दृष्टीने आशा सर्व स्त्रीया दागिने आडकवायचा स्ट्यांड आहेत.
हल्ली दागिने हे सौंदयाचे कमी पण प्रतिष्ठेचे मोठे लक्षण बनले आहे.घरात संडास नसला तरी चालेल दागिने जास्त असले पाहिजेत ही मानसिकता कालपर्यंत होती.सरकारच्या दबावामुळे हल्ली संडास बांधावे लागलेले आहेत.नाहीतर स्त्रीयांचा विचार करुन स्वखुशीने पुरुष वर्गाने संडास काही बांधले नसते.
कधीकधी तर स्त्रीया अंगावर भयानक आजार रोग काढतात परंतू दागिने मोडु देत नाहीत.बाई मेली तरी चालेल पण घरातील दागिने नाही मोडले पाहिजे.हा रिवाज ग्रामीण भागात आजही पाळला जातो.
सगळ्या बाजूने पत गेली तरी दागिन्यांत पत शोधनारे आजूनही असावेत अजबच आहे ना जरा ..
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment