Thursday, 20 May 2021

देशाच्या अंतर्गत अनेक देश आणि राष्ट्रे आहेत, ती कोण एकसंघ करणार ?परभणीत

देशाच्या अंतर्गत अनेक देश आणि राष्ट्रे आहेत, ती कोण एकसंघ करणार ?

परभणीत उड्डाणपुलाच्या खालचा रेल्वेगेट ओलांडला  की ४० हजारांची वस्ती लागते.नुसती वस्ती म्हटल्यानंतर पुढचे कथानकच लक्षात येनार नाही तुमच्या.ही वस्ती म्हणजे अनेक कॉलण्या, नगरं पण कुनाची तर बहुतांश शेडुल्ड कास्टची आणि मुस्लिमांची.बोद्ध , मातंग , चर्मकार , मुस्लिम आणि तर गरिब जातींचा हा समिश्र परिसर.या भागात १० पर्यंत छोट्यामोठ्या शैक्षणिक संस्था, शाळा आहेत.आणि १० पेक्षा जास्त क्लासेस वगैरे आहेत.
भीमनगर , क्रांतीनगर,पंचशील नगर , शांतीनिकेतन नगर , प्रसावत नगर , वर्मा कॉलनी , इंदिरा गांधी नगर , विकास नगर , लुंबिनी कॉलनी , मंत्री नगर , बाबर नगर , कृषी नगर , तथागत नगर , अजिजिया नगर या ४० हजारांच्या वस्तीकडे रेल्वेफाटक क्रॉस करुन जाताना दर पंथरा मिनीटाला एक ऱेल्वे जाते.सतत गेट बंद असतो.आजरी माणसे , गरोदर महिला , डोके फुटल्यानंतर भळाभळा रक्त वहानारे पिडीत, विद्यार्थी, लहान मुले, कामावर जानारे कष्टाळू,मजुर लोक फाटक उघडेपर्यंत केविलवाणे उभे रहातात, उच्चजातवर्गीयांच्या व्यवस्थेकडे तोंड करुन.

    परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात कर्मच्यार्यांची संख्या किती असेल बरे ? तर १० हजाराच्या वर नव्हे. या विद्यापीठात जायला दोन्हीहीकडुन चांगले रस्ते आहेत.तरिही करोडो रुपये खर्च करून या विद्यापीठात जाण्यासाठी उड्डाणपूल होत आहे.हा उड्डाणपूल काळ्या कमानिकडील गेटकडे झाला असता तर असे म्हनता आले असते की हा उड्डाणपूल केवळ कर्मचाऱ्यांच्यासाठी नाही तर सायाळा,लोहगाव मार्गे येणाऱ्या जाणाऱ्या  ग्रामीण लोकांनाही त्याचा फायदा होइल. 

पण तसे नव्हे काम चालु असलेला उड्डाणपुल अक्षदा मंगल कार्यालयाच्या बाजूने केवळ विद्यापीठात ये जा करण्याऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी होत आहे.विद्यार्थी तर विद्यापीठातच हॉस्टेलला रहातात.बाहेरून येणारे ते किती असनार.

    ज्यांची अमूल्य वेळ वाचवण्यासाठी हा हवाईमार्ग होत आहे,त्यांचे अलीकडील काळात शेती संशोधन क्षेत्रात योगदान काय ? प्रचंड पगारी घेनारे हे कर्मचारी शेतकी शेत्रात आलिकडे काय नवीन योगदान देताहेत ? आजूबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांच्या नऊ हजार एक्कर बळकावलेल्या जमिनी आज ९५% पडीक आहेत.सरकारी बाभळी वाढलेले जंगले झालेत या शेतकऱ्यांकडुन बेभाव बळकावलेल्या जमीनीवर.आशा सुस्त वर्गाला हा उड्डाणपुल करुन दिला जात आहे.

   करोडो रुपायांचा चुराडा करुन उच्चभ्रू वर्गासाठी उड्डाणपूल बांधणे चालु आहे.नसता झाला तिथे उड्डाणपुल तर त्या फाटकावर कुनीही गरोदर महिला , आजरी बालके , रक्त वहानारे पिडीत, कामावर जानारे मजुर उभे रहानारे नव्हते.
पुलाची गरज कुठे होती ? साकळा प्लॉट परिसर आणि  भीम नगर , मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरच्या परिसरात.

इकडे का होत नाहीत उड्डाणपूल ? गरज जास्त कोण्या भागात आहे ? 

भारतीय उच्चजातवर्गीय व्यवस्था आजही शेडुल्ड कास्ट , मुस्लिम,माजी अस्पृश्य जातींना अदखलपात्र मानते.कृतीतून तसे दाखवून देते की तुम्ही आमच्यासाठी किड्यामुंग्याप्रमाणे आहात.
येथे उड्डाणपूल , भव्य रस्ते हे उच्चजातवर्गीयांसाठी बनतात.ब्राम्हणी भांडवली व्यवस्थेचे जे वाहक आहेत आश्यांच्यासाठी तात्काळ सेवा सुविधा असतात.तुम्हाला सेवा सुविधा द्याव्यात तर पुन्हा तुमच्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर तयार झाले तर आवघड होइल या ब्राम्हणी व्यवस्थेच्या वहाकांसाठी ,म्हणून आशा वस्त्यांमध्ये जाणीवपूर्वक प्राथमिक आणि अत्यंत महत्वाच्या सेवासुविधा दिल्या जात नाहीत.
आणि काही चोंगे म्हणतात आता कुठ राहिलाय जातीवाद.
 

नितीन सावंत परभणी 
9970744142.
दिनांक 21 मे 2021

No comments:

Post a Comment