ll नवरात्रोत्सव दिवस तिसरा ll
तेरणा मांजरेची गणमुख्या - कुलस्वामिनी तुळजा
जगभरातील स्थिरस्थावर मानवी सभ्यतेची सुरुवात स्त्रीयांपासुन होते.गरोदरपणात भटक्यांच्या टोळीतील स्त्रीया लांब आणि जास्त प्रवास करु शकत नसत.त्यातून त्यांनी पाण्याच्या , जलाशयाच्या आसर्याने नैसर्गिक गुफा आणि झाडांच्या मोठ्या खोडात रहाणे पसंत केले.या प्रारंभिक स्थिर होण्यातून पुढे शेती , नृत्य , रेखाटन , रंगरंगोट्यांचा शोध स्त्रीयांनी लावला.सुरुवातीला संपूर्ण गण एकत्र रहायचा.पुढे गणातून ज्ञाती फुटुन वेगळ्या बनल्या.ज्ञातींची कुळे झाली आणि नंतर कुळाचे कुटुंब बनत गेले. आशीच महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे आणि कुळांची पुर्वजा म्हणजे तुळजाभवानी होय.
तुळा म्हणजे तोलने,मोजने,मापणे किंवा वाटुन देने होय.तुळजा म्हणजे मोजुन देनारी , समान वाटुन देनारी ,तुळा करणारी होय.तेरणा मांजरेच्या किनाऱ्यावर आपल्या वाढत जाणाऱ्या गणाला पोसण्यासाठी जमीन वाटून देनारी. तसेच सामूहिक गणाने काढलेल्या पिकाचे परडीने समसमान हिस्यांत गणात वाटप करणारी गणमुख्या म्हणजे तुळजाई होय.आजच्या भौगोलिक प्रदेशात बालाघाट डोंगर रांगामध्ये समुद्र सपाटीपासून २७० फुट उंचीवर वसलेले गाव म्हणजे तुळजापूर होय . उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे हे ठिकाण.धर्मग्रंथात दंडकारण्य म्हणून या भागाचा उल्लेख सापडतो.
पुढे तिने वाढत गेलेला गण आपल्या चार ज्ञातींना विभागून दिला. एका ज्ञातिच्या वाट्याला २४ कुळे आली.या चौघींची २४ कुळे मिळुन संख्या बनली ९६ कुळांची.म्हणून महाराष्ट्राची ९६ कुळे वसवणारी आद्य गणराज्ञी म्हणजे तुळजा भवानी होय.
परंतू हा काळ वंशसमाजाचा.येथे अजुन जातीव्यवस्था जन्माला आलेली नाही.त्यामुळे ही कुळे एकजातीय नाहीत.आजच्या जातीव्यस्थेत दाखवली जानारी कुळे वंशसमातील कुळांची कॉपी किंवा भ्रष्ट स्वरुप आहे.आज कुनाचेही कुळ शुद्ध उरलेले नाही.
तुळजेचा काळ हा शिल्पकलेचा शोध लागण्याच्या आधिचा.त्यामुळे तिचे मुख्य प्रतिक आकारहीन दगडाचे.तुळजापूरची घाटशिळा हेच खरे तिचे स्मृतीस्थळ.पुढे मुर्तीकलेच्या शोधानंतर तुळाजाईमुर्ती स्वरुपात आली. आजही सर्व ग्रामदेवता आकारहीन दगडातच आहेत.
ब्राम्हणी छावणीच्या उन्मादा नंतर अनेक पुर्वजांचे , ग्राम संरक्षक मातृकांचे मानवी स्वरूप लपवून त्यांना पुढे अलौकिक दैवत्व बहाल केले गेले आहे.
या प्रकारात एक तर त्यांच्याबद्दल दुष्ट आफवा परवल्या गेल्या किंवा अलौकिकत्व देवुन त्यांचे सुष्ट नेनीवेकरन करण्यात आले आहे.
मराठीतल्या रंडकी चंडकी ह्या शिव्या रंडी चंडी स्त्रीयांच्यावरुन निर्माण झालेल्या आहेत.कुलटा म्हणजे या गणातून त्या गणात व्यापार व्यवहार औषधउपचार करण्यासाठी फिरनारी राज्ञी होय.आज कुलटा शब्दाला वाईट अर्थ निर्माण करुन दिला गेला आहे.गणीका म्हणजे नाचनारी नव्हे.गणाची प्रमुख ती गणीका.आशा अनेक शब्दांच्या द्वारे पितृसत्ताक समाज व्यवस्थेत स्त्रीयांची टिंगल टवाळी केली गेलेली आहे.साज घडीला सर्वाधिक शिव्या स्त्रीयांवरुनच आहेत.शिवी सुद्धा शिवाच्या बायकोचे नाव आहे.
अगदी याच प्रमाणे आज तुळजाभवानीचा पट जुगाराचा पट म्हणून सांगितला जातो.
तुळजाभवानी भारती बुवांच्या मठात जुगार खेळायला जाते अशाप्रकारे भाविकांत एक मिथक पसरवण्यात आलेले आहे.जे चुक आहे. तुळजाभवानीचा चौपट हा गणभुमीचे समान वाटप करनारा पट आहे.
म्हणून वंशसमाजात आधी गण त्यांची मुख्या गणराज्ञी मग ज्ञाती होय. पुढे ज्ञातीची कुले बनली.त्यानंतर कुलांची कुटुंब बनत आणि एक कुटुंब काही मैलांवर जावून नवे गाव वसवी.
त्यामुळे अनेक नदीकिनारी समान आडनावाची अनेक गावे सापडतात.ज्यांचे देवक कुलचिन्ह एक असल्यामुळे त्यांच्यात विवाह होत नाहीत.हि झाली भाऊबंदकी.
जाती समाजात आज कुटुंबव्यवस्था परार्थीकरणातून परात्म बनत चालेली आहे.त्यामुळे एक व्यवस्था जाऊन नवी व्यवस्था येने अपरिहार्यच आहे.तुळजाईच्या विविध ज्ञाती पुढे अनेक नदीकिनाऱ्यावर शेतीयोग्य जमीन शोधत नवे गावे वसत गेल्याचे असल्याला दिसून येते.गावे वसवताना तिच्या गणाच्या , ज्ञातिच्या वंशजांनी आपल्या पुर्वजा भवानीचे ठाणे जागोजागी उभे केले.तिचा इतिहास विविध मार्गाने जपून ठेवला.असेच देवीचा इतिहास जपून ठेवनारे गोंधळी , आराधी , भोपे , पोतराज,तृतीय पंथी होत.
♦#एककुळी_गाव ♦
मानव समाज वंशसमाजात शिकारीतून शेतीत उतरला आणि त्यांच्यात आधी गण तयार झाले. मग गणाचे ज्ञातीत विभाजन झाले. त्यानंतर, प्रत्येक ज्ञातींत कुले बनत गेले. पुढे सात पिढ्यांच्या नंतर कुले विभाजीत होत. नवे कुल तयार होत असे.
साळंतून व सरंजामी समाजात आल्यावर कुळाची जागा कुटुंबाने घेतली. कुटुंबातून पुढे भाऊकी.भावकी आणि वाडे यांची संख्या सात पिढ्याइतके वाढली की बेट फुटून ११ मैलावर नवा गाव वसवला जाई.
या वंशसमाजातील सा-लोहित अर्थात रक्तसंबधाने बांधलेल्यांत विवाह होत नाहीत. त्यासाठी कुलचिन्ह देवक परंपरा होती. ज्यांचे देवक कुलचिन्ह सेम ते भाऊबंद मानले जातात.पुढे जाती समाजात आडनावेही आली.समान आडनावे असनारे भाऊबंद मानले जावुन तिथेही बेटीव्यवहार होत नाहीत.ते भाऊबंद असल्यामुळे त्यांच्यात राम राम घालत नाहीत.
गावे कसे वसतात किंवा वसवली गेलीत त्याचे एक उदाहरण पाहुया :
परभणी हिंगोली जिल्ह्यांच्या सिमा #पुर्णा_दुधना नद्यांनी बांधलेल्या आहेत. यातील दुधना नदीकिनारी धार, समसापुर, दुरडी आणि मुरुंबा या चार गावी चोपडे आडनावाचे सकुल्य पण असपिंड्य बांधव आहेत. चारही गावी पोळ्याचा मान चोपडे यांच्याकडे आहे.चारही गावी होळीचा मान चोपडे यांच्याकडे आहे.मुख्य गढी आणि वहितीखाली जास्त जमीन चोपड्यांकडेच.ही गावे चोपडेंनी वसवल्याचे लक्षात येते. समसमान वाटणी करनारे गाव समसापुर, नदिच्या अगदीच धारेत ( कडेवर ) वसवलेले गाव म्हणजे धार, नदिने वळण घेतल्यानंतर त्या दुरडीच्या आकाराच्या किनाऱ्यावर वसवलेले गाव दुरडी तर आंबेचे ठाणे असलेले मुरुंबा. अंब शब्द पाण्याशी सुद्धा नाते सांगणारा आहे.
ही एकाच भावबंदकीची वा कूळाची आपत्ये आहेत. महापूर आल्याने किंवा गणाची संख्या वाढल्यामुळे नवीन गावे वसवून नवी जमीन वहितीखाली आणण्याचे काम चोपडेंनी केलेले आहे. यासाठी पांढरीच्या जमीत धान्य पुरुन ठेवून कोंभ नाही आले तर ती जमीन गाव वसवण्यासाठीची असे मानले जाते . काळीची सुपीक जमीन पिकांसाठी तिथे गाव वसवणे निषिद्ध.
#पुर्णा नदिच्या किनारी तर दोन दोन नावांची सारखी गावे आहेत.म्हणजे एकच गाव महापुरात तुटून वेगळा झाला असेल तर नाव कायम राहिले गावे वस्त्या दोन झाल्या.जसे पोटा ही गावे दोन आहेत.परळी (काळे आणि दशरथे) पिंपळगाव (कुटे आणि टोंग) सावंगी (पंढरकर आणि गरुड ),नांदगाव ( जवंजाळ आणि भालेराव ) ही एकाच नावाची दोन गावे आहेत.ही गावे नदिच्या परस्पर विरोधी तिरावर एकमेकांडे तोंडे करुन उभी आहेत.मटकर्हाळा आणि सावंगी या गावी गरुड आडनाची सकुल्य म्हणजे एकाच कुळाची बांधव आहेत.
या गावांचा अधिक विस्ताराने अभ्यास केला तर गावे कोण्या काळात वसवली गेलीत, हे सहज लक्षात येइल.
यांना एककूळी गावे म्हटले जाते.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment