Wednesday, 27 October 2021

*♦️बसवधर्म महासभा♦*

 *♦️बसवधर्म महासभा♦*

बसवधर्म महाभेची भूमिका लिहीत असताना हे मुख्य उद्देश पुढे ठेवत आहोत.

★ बसवधर्म महासभा ★

   बाराव्या शतकात बसवादी शरण व शरणींनी जात्यंतक- स्रीदास्यांतक क्रांती केली त्या क्रांतीला "कायक क्रांती" अथवा "सर्वहारांची क्रांती" म्हणतात.  सर्व कायक "सामाजिक सर्वहारा" म्हणजे 'माजी अस्पृश्य जाती व आदिवासी जमाती' व "आर्थिक सर्वहारा" म्हणजे 'शेतकरी जातीतील गरीब व कारागीर जाती' आहेत.

प्रतिक्रांती होऊन लिंगायत जातिग्रस्त झाले व नवीन जाती जन्माला आल्या. आजच्या काळात आम्ही ह्या दोघांमध्ये दोस्ती घडवून क्रांतीची मशाल पेटवू इच्छितो.

◆ ध्येय ◆

जात - वर्ग - स्रीदास्य अंतक क्रांती घडवून आणण्यासाठी सामाजिक व आर्थिक सर्वहारा मधील दुरी मिटवणे, हे सौतांत्रिक मार्क्सवाद करू शकतो, ह्यावर आम्ही अभ्यासाअंती ठाम आहोत. विधायक चर्चेसाठी आम्ही आव्हान करत आहोत.

◆ धोरण ◆

१.  बसव साहित्य चळवळ उभी करणे,
बसवादी वचन साहित्याचा नव्याने बहुप्रवाही, अब्राम्हणी, विधायक भौतिकवादी अन्वेषण पद्धतीने मांडणी करणे. सुलभीकरण व निरूपण करणे.  प्रबोधन करणे

२.  विवाहसंस्था पितृसत्ताक असल्याकारणाने तीने पुरुषांना अमानवीय बनवून टाकले आहे, घरातील स्त्री कुटुंबप्रमुख असली तरी तिचे अधिकार अबाधित असणे आवश्यक आहे. स्त्रीपुरुष समता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न सोहळ्याना प्रोत्साहन देणे, अशी लग्न केलेल्या कुटुंबाचा ' प्रशिक्षण मेळावा' घेण्यात यावा. जेणेकरून त्यांच्या पिढ्या समतावादी चळवळीत सातत्याने काम करत राहतील.
किन्नर व हिजडा हे मानवसमाज चा अविभाज्य घटक आहेत. इतिहासात किम-नर, वा-नर, वैश-वा-नर, किम-पुरुष इ. लिंगभेदांना मान्यता होती. आजच्या काळातही त्यांना समान वागणूक व समान संधी साठी अविरत काम करणे.

३.  युवा प्रचारक घडविणे
कम्युनिस्टांनी धर्माचे काहीच प्रबोधन केले नाही. ह्याचे कारण कार्ल मार्क्सचे पुढील वाक्यात 'धर्म लोकांसाठी अफूची गोळी आहे'  ही अर्धसमजून कारणीभूत आहे.

"धर्म हे जगाचे सामान्य सिद्धांत आहे, त्याचे तर्क लोकप्रिय स्वरूपात, त्याचे उत्साह, नैतिक मंजूरी, त्याचे गंभीरपूरक आणि सांत्वना आणि औपचारिकता यांचे सार्वभौमिक आधार आहे. मानव सारख्या अत्युत्तम सत्याची खरी कल्पना नसल्यामुळे ही मानवी अत्युत्तम कल्पना आहे. धार्मिक दुःख, एकाचवेळी आणि त्याच वेळी, वास्तविक दुःख आणि वास्तविक दुःखांविरूद्ध निषेधाची अभिव्यक्ती आहे. धर्म हे अत्याचारी प्राणी, हृदयहीन हृदयाचे हृदय आणि सौम्य परिस्थितीचा आत्मा आहे. हा लोकांचा अफीम आहे."
"धर्माचे प्रबोधन सौतांत्रिक मार्क्सवादच करणार"

४.  'गाव तेथे अनुभव *मंटप*' ह्या संकल्पेतून लोकशाहीवादी संस्कृती रुजविणे.

५.  दक्षिण भारतातील समतावादी अब्राम्हणी क्रांतिकारकांचे साहित्य मराठी मध्ये प्रकाशित व्हावे, ह्यासाठी 'दक्षिण भारतीय व मराठी साहित्यिक अभ्यासक  टीम' बनवून अब्राम्हणी कला व साहित्यात वाढ करणे.

मानवमुक्ती मिशनच्या *बसवधर्म महासभेची टीम* अनुभव मंटपच्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक मध्ये
*जात वर्ग स्रीदास्य अंतक काम करेल*,
ह्यासाठी आपले मार्गदर्शन व सहकार्य आवश्यक आहे.

♦मुख्य मुद्दे♦

१. एकूण दहा जणांची टीम असणार

२. अध्यक्षीय पीठ स्त्री अथवा तृतीय पंथी यांना असावे,
हा सामाजिक सर्वहारा ( SC / St / NT ) असावा.मानवमुक्ती मिशनच कार्यकर्ता असावा

३.  आर्थिक सर्वहारा वर्गातील ( शेतकरी व सधन वर्गातील )
४. पत्रकार/राजकीय विश्लेषक
५. मानववंशशास्त्रज्ञ अभ्यासक
६. शिक्षणतज्ञ
७. मुक्त चिंतक

*संशोधक व अभ्यासक वर्गाचे तातडीचे काम*

१. बसवधर्म महासभेचे स्वतःचे ग्रंथालय असावे,त्यातुन सर्वत्र विद्रोही / परिवर्तनवादी पुस्तके,संदर्भ ग्रंथ वाचक वर्गास उपलब्ध होतील.

२. तातडीचे काम म्हणजे *४ते५ बुकलेट्स तयार करून प्रकाशित करणे*
ह्यातून भविष्याचा वेध घेणारी भूमिका मांडणे, भविष्यात आपल्याला कोणकोणत्या विषयांवर उपाययोजना करून काम करायचे आहे. ह्यावर लिखाण करणे.नवीन लेखक,कवी घडविणे,वाचक वर्ग मिळविणे. सौतांत्रिक बसवादी भूमिका मांडणी साठी कुशल लेखक,कवी यांच्या इथे नेमुणका होणे आवश्यक आहे. बसव साहित्य चळवळीचे काम ह्या माध्यमातून पुढे नेणे.

३. *कार्यशाळांचे आयोजन करणे*
सर्वहारा समाजाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी कार्यशाळा आवश्यक आहेत. इतिहास,धर्मशास्त्र,संस्कृती, विज्ञान,समाजकारण ह्या विषयावर प्रबोधन करणे.
बुद्धकालीन नालन्दा,तक्षशिला, विक्रमशीला,सन्नती सारखी विद्यापीठे बहुजन समाजाची ज्ञानकेंद्रे होती. त्याच पद्धतीने ही चळवळ उभी करणे.

४. संशोधन
हा विषय अतिसंवेदनशील व महत्वाचा आहे.अब्राम्हण समाजाचे, अब्राम्हणी कला व साहित्याचे मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन करून समाजाला ज्ञानदासोह अर्पण करणे.

५. लिंगायत मधील ३५० जातींचा शोध आणि पडताळणी करणे व त्यांना जाती अंतक बनविणे.

आपल्या भूमिका नेहमी जाणकार व विषेतज्ञ कडून पडताळणे.

बसवधर्म महासभा धर्मामध्ये अडकून काम करणार नाही
व्यापक भूमिका घेऊन संपूर्ण वंचित सर्वहारा समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार आहे.
त्याग आणि स्वसमर्पित कार्यकर्ते बसवचळवळीचे चे बलस्थान आहे आणि त्यांच्या माध्यमातून *सौतांत्रिक बसवतत्व* पुढे नेतील.

*जय बसवा ! जय भारत*

*प्रदेशाध्यक्ष : कॉ.आशिष सुगत्यायण (गोवा )*
*8668973467*

*सचिव: कॉ. अभिषेक देशमाने.( सांगली )*
*9822054291*.

*समन्वयक : कॉ.नितीन सावंत ( परभणी )*
*9970744142*
♦♦♦♦♦♦♦♦

*on December 17, 2018* 

*Labels: basavdharm mahasabha, अभिषेक देशमाने, कॉ.आशिष सुगत्यायन, बसवधर्म महासभा*

No comments:

Post a Comment