ll उंदिरायण ll
कोणे एकेकाळी बिळराष्ट्र नावाच्या देशात आटपाट नगरी एक गरिब उंदिर रहात असे. तो महाण अशा कुरतडे वंशात जन्माला आला होता. त्याबद्दल त्याला विशेष असा स्वाभिमान वाटत असे. याच नगरात अनेक वंशाचे उंदिर रहात असत. दुतोंडे, फेके , टणाटणे, भोकपाडे, पळपुटे अशा अनेक वंशाची ही उंदरे बिळराष्ट्रात आनंदाने गुण्यागोविंदाने नांदत होती.कुरतडे वंशात जन्माला आलेल्या उंदराला विशेष अभिमान वाटण्याचे कारणच तसे होते. याच्या पुर्वजांनी मोठमोठ्या संस्कृती कुरतडून त्या संस्कृतीचा बट्याबोळ केला होता. याच्या पुर्वजान्मधे तिन बिळांपुरती जागा मागनारा आर्यमान बटुउंदिर यापासुन ते इंग्रजांच्या विरोधात झालेल्या स्वतंत्र संग्रामात जहाजातून उडी मारनारा फिदा फरारकर अशी मोठी परंपरा होती. या बद्दल आजही कुरतडे जमातीचे लोक चवीने सांगत असतात.
या उंदरांची एक भाषा सर्व जगात विख्यात आहे . ती म्हणजे फेकृत भाषा. समस्त उंदिरवृंदांचा असा दावा आहे की ही आमची फेकृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. पण यांच्या उंदिरराष्ट्राला विरोध करनाऱ्या नतदृष्ट्या काही सामाजिक संघटनांचे असे म्हनने आहे की ही फेकृत भाषा फेकाफेकीची जाडाजोडीची आहे.
असो आद्यआर्यवृत्त उंदिरराष्ट्र बनवण्यासाठी समस्त उंदिरवृंद एक दिलाने झटत असतात.या उंदिरवृदांच्या आनेक संघटना आहे. ज्यामधे टणाटण संस्था,अखिल भारतीय दंगार्थी परिषद, उंदिरमहासभा, उंदिरदल , राष्ट्रीय उंदिरस्वयंसेवक संघ, महिला उंदरिणीसांठी उंदिरीण वाहिनी आदी संघटना कार्यरत आहेत .
या उंदिर संस्कृतीवर माहिती देनारी भरघोस पुस्तके बाजारात आहेत.
ज्यामध्ये
फिदा फरारकर यांचे चिंधुत्व , उंदिरदास यांचे उंदरांचे श्लोक, तसेच या उंदिरांच्या स्वप्नातील राष्ट्र उभे करण्यासाठीचा प्रेरक ग्रंथ म्हणजे हनुस्मृती तर उंदिरांच्या पुर्वजांचा इतिहास सांगणारा ग्रंथ जो फिदांनी लिहीलेला आहे. तो ग्रंथ म्हणजे सहा उंदरांची पाने.
इत्यादी ग्रंथांमधुन आपन उंदिरवृंदांची माहिती घेवु शकतो.
उंदिर संस्कृती मधे अनेक शास्त्रज्ञ आहेत.या उंदिरांचे एक तांबेउंदिरबुवा आहेत त्यांनी वैद्यकशास्त्र इतके विकसित केले आहे की पुरुषांनाही गर्भधारणा राहु शकते. तर एक क्लासेस चालवनारे उंदरेधिकारी ॐ बरोबर एम सी स्क्वेअर असे शास्त्रीय सुत्र मांडत आहेत.इतिहासात केलेली प्रत्येक ग्रेट कृती उंदिरांचीच असते असा उंदिरवृदांचा दावा आहे.
उंदिरांच्या महान पराक्रमांबद्दल इतिहासात पानापानावर पुरावे सापडतात. पुण्यात एका पाजीराव उंदरे यांनी उंदराई राजवटीत नग्न उंदरींच्या शर्यती लावल्याचे, घटकंचुकीचे खेळ खेळल्याचे पुरावे सापडतात. एका उंदिर ऋषी यांनी समुद्र प्राशन केल्याची सुद्धा कथा लोकप्रिय आहे. मग जीवसृष्टी धोक्यात आल्याने ते मुतले. म्हणून समुद्राचे पाणी खारे झाले ..
हल्ली या उंदरांचे मंत्रालय भरते. मंत्रालयात उंदरांची संख्या खुप वाढली आहे. समस्त देशावर उंदिरांचा कब्जा निर्माण झाला आहे ...
उंदिरवृदांच्या या यशाचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे ...
संदर्भसुची :
१) पुण्यात उंदिर उपरेच - स.दा. कुरतडे
२) अद्यआर्यवृत्तासाठी उंदरांचे योगदान - ना.सी लाळघोटे
३) उंदरांना आनखी झोडपनार - गमो उंदरे
४) यात उंदरांचा काय दोष - उंदिरध्वाज बिळेकर
५) उंदिरान्नो जागे व्हा - मिलींद उंदिरबोटे
६) अवघ्या सुर्यजाळ - उंदिरगुरुजी धोत्रे
७) मुशकपुराण अध्याय सातवा पळपुटे कांड - कामदास पळपुटे
८) उंदिरमाहात्म्य - च.ला जावे
आणि
९)अखिल भारतीय उंदिर साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष
बालसाहित्तीक कुर्तडकर यांचा लेख
-----------------------------------------------------------------------------
नितीन सावंत परभणी
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment