Saturday, 7 March 2020

ll महिला दिनाच्या निमीत्ताने ll

ll महिला दिनाच्या निमीत्ताने ll

आजही तिला मोठ्याने हसता येत नाही,चौकटीच्या बाहेर पाऊल टाकता येत नाही.काही घरातील कर्तीधर्ती माणसे ही गोस्ट अभिमानाने मिरवतात "आमची बाई चौकटीच्या बाहेर पाऊल टाकत नाही !"

आशा गावांना मानामोळ्याचे गाव म्हंतात.म्हणजे ज्या गावातील बाई दुकानात जात नाही,गिरणीत जात नाही,पाणी भरायला जात नाही,ढाळजेत सुद्धा येत नाही ते गाव प्रतिष्टेचे.तिथेच मुली द्याव्यात,कराव्यात असा तो नियम.म्हणजे गावची प्रतिष्ठा बाईच्या दमकोंडीवर.पदर घेने,मोठ्याने न बोलने,निर्णय प्रक्रियेत सहभागी नसणे ही चांगली बाई आसल्याची लक्षणे. माझे तर एक सुत्रच बनलेले आहे जिच्या गळ्यात भरपूर दागिने ती जास्तित जास्त डांबलेली.कधीतरी बारा महिण्याला घराच्या बाहेर येणारी ती अंगभर दागिने लपेटून येते.

हळ्दीच्या डागाचा नवरा मेला तरी तिला जन्मभर सांभाळनारे ग्रेट.तसे वर्तन करनारी पोटजात श्रेष्ठ.आणि पुनर्विवाह लावुन देनारे तिचे आयुष्य पुन्हा सुंदर बनवनारे हलके, ही स्त्रीची सिडी करुन बनवलेली उलटी रित.स्त्री ही जातीव्यवस्थेचे खरच महाद्वार आहे.

कलपरवा भाषण संपल्यानंतर एका msw च्या विद्यार्थीनीने उभे राहुन प्रश्न केला.हा भेद घरातच होत असेल तर.ह्रदयाला टोचले.आपनही हक्क आधिकारांना पात्र आहोत ही जाणीव नव्हती तेव्हाचे ठिक होते.स्त्री निमूटपणे स्विकारे ते.मी सुद्धा दादाच्याबरोबरीने घरात का जगु शकत नाही ? त्याचे आंथुरणे मी का काढावीत ? त्याच्या अंथुरानाच्या घड्या त्याने का घालू नयेत ? हे प्रश्न आज मुलींना सतावत आहेत.ॲड वैशालीताई डोळस म्हंतात "स्वयंपाक कुणी करावा तर ज्याला भुक लागली त्याने".स्विकारेल का निदान मध्यमवर्गीय संस्कृती तरी ? आहे ना अवघड.भरधाव वेगाने पोरगी मोटारसायकल चालवत गेली की त्या कोपऱ्यापर्यंत जाइस्तोवर मान मोडेपर्यंत बघनार्या मंडळीचे म्हनने असे असते की बाई स्कुटीवरच छान दिसते. याच्या पुरुषी अहंकाराला धक्क पोहंचतो तिने गाडी चालवल्यावर.जेवनाचे ताटे कुनी लावावीत.निदान पाण्याचा तांब्या तरी आपल्याला भरुन घेता येतो का ?? आयुष्यभर सर्व ऋतूत तिने लागनार्या १२ तोंडांच्या भाकर्या दिवसरात्र बडवत बसाव्यात,आपन एकदातरी स्वखुशीने तिचे हे काम हलके केलेय का.जमेल का ?

आमच्या परभणीत मालतीताई गिरी आहेत.त्या सायकल पासुन ट्रकपर्यंत सर्व वहाने धुतात.म्हणजे वाशिंग सेंटर चालवतात. एवढेच नव्हे तर सायकल पासुन मोठ्या ट्रक पर्यंत सर्व वहाने चालवतात.त्या बोलताना म्हनाल्या की तुमच्या सैराटच्या आर्चीने आत्ता ट्र्याक्टर चालवले आहो मी तर २००१ सालीच ट्र्याक्टर चालवला.पण मला परिस्थेने चालवावा लागला एवढेच.कुठलेही काम करन्याला न लाजता त्यांनी त्यांची दोन मुले व एक मुलगी उच्च शिक्षणासाठी पुणे औरंगाबाद ला पाठवलीत. त्यांच्या वाशिंग सेंटरवर गेलो तर अगदी पुरुषांना लाजवेल या पद्धतीने त्या गाड्या वाश करत असतात.पुरुषांच्या कपड्यात बॉब कट केल्याल्या आमच्या मालतीताई ताई गिरी.आज त्यांची दैनिक एकमत ने परभणी पेजवर दखल घेतली आहे.बरे एखादी मालतीताई धाडसाने पुढे येते बाकीच्या हळव्या मायमाऊल्यांचे काय ??

स्वताच्या महिलांना स्वातंत्र्य न देता दुसऱ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्या स्त्रीयांच्या पुरुषांना शुभेच्छा द्या ही डेअरिंग आपल्याला तर करने झाली नाही त्याने तरी केली म्हणून .

नितीन सावंत , परभणी
प्रवक्ता मानव मुक्ती मिशन .
9970744142

No comments:

Post a Comment