ll संत चळवळीच्या उदयाची पार्श्वभुमी ll
भारतीय दर्शनशास्त्रातील संघर्ष आध्यात्मवादी विरुद्ध जड़वादी (भौतिकवादी ) असाच राहिलेला आहे. या संघर्षात, आहे त्याला नाही म्हणून आणि नाही त्याला आहे म्हणुन, किंवा जे आहे ते तुम्हाला कळणार नाही म्हणून, सातत्याने मुर्ख, बनवण्याचे काम आध्यात्माची बाजु घेणाऱ्या ब्राम्हणवाद्यांनी केले आहे. कुणी कर्तबगारी दाखवत असेल, आपले आकलन सादर करत असेल तर तुम्हाला जन्मजात हे अधिकारच नाहीत म्हणून आध्यात्मवादयांनी विषारी प्रयोग भारतात केलेले आहेत. या उलट जग आकलनीय आहे आपण जगाचा अभ्यास करू शकतो.जगाला समजुन घेवु शकतो.अनुमान प्रमाणाच्या द्वारे आपण सत्यापर्यंत पोहंचु शकतो. ही मांडणी भौतिकवाद्यांची. कुनीही जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, गुण - कर्तत्व महत्त्वाचे असतात. या तत्वांचा आग्रह भौतिकवादी धरत होते.
या भाजडवादी, भौतिकवादी प्रवाहामधे लोकायत, न्याय वैशेषिक, सांख्य, पूर्व मीमांसा, बौद्ध व जैन तर आध्यात्मवादी प्रवाहात वैदीक या तत्वज्ञानाचा समावेश होतों. आध्यात्मवादयांच्या तत्त्वज्ञानातून सुरवातीला वर्णव्यवस्था आली होती आणि नंतर जातीव्यवस्था. वर्णन्यवस्थेच्या काळात आध्यात्मवादयांचा धर्म होता श्रुतींचा श्रौत धर्म तर त्यानंतर आलेल्या जातीव्यवस्थेच्या काळात आध्यात्मवादयांच्या स्मृतींचा धर्म बनला स्मार्तधर्म. या श्रौतस्मार्ध धर्माच्या आधारे अध्यात्मवाद्यांनी शोषणाच्या पिंडणाच्या आणि दमनाच्या संस्था मजबूत केल्या होत्या. या श्रौतस्मार्त धर्मीयांनाच, वैदिक धर्मी, ब्राह्मणधर्मी,वर्णाश्रमधर्मी असे म्हटले जाते. हे आध्यात्मवादी श्रौतस्मार्त धर्मी बहुसंख्य ब्राम्हणच होते. ते राजेमहाराजांना हताशी धरून, धार्मीकतेच्या नावे प्रचंड लूट करत असत. चालुक्य आणि यादवांच्या काळात तर मंदिरे स्थापन करून प्रचंड लुट करण्याचे काम हे वैदिक ब्राम्हण करत असत.
महाराष्ट्रात पूर्व चालुक्यांच्या वेळेपासून ( इ.स. ५५०-७५३) ब्राह्मणशाहीने डोके वर काढायला सुरवात केली होती. त्यानंतर उत्तरेत राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य आणि यादव यांच्या कारकिर्दीत ब्राह्मणशाही मजबूत होत गेली. या सर्व राजवटींचा ब्राम्हणी धर्माला पाठिंबा होता. त्यांच्यापैकी कित्येक राजांनी शिव आणि विष्णु यांची मंदिरे आणि तळी बांधली.त्यांच्या आमदानीत ब्राम्हणांना अग्रहार म्हणून शेते इनाम दिल्याचे कोरीव लेख उपलब्ध झालेले आहेत. शेकडो वर्षे ब्राह्मणांना जमिनी मिळत गेल्याने, तेराव्या शतकापर्यंत ब्राम्हणांच्या मालकीच्या जमिनी सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत
म्हणजे काय तर शेतकरी,कष्टकरी वर्गाने काबाड कष्ट करून पिकवलेले उत्पादन,एकीकडे राजेमहाराजे जाचक कर लावून लुटतू नेत असत, तर दुसकडे दुसरीकडे धर्मपुरोहीत धार्मीकतेच्या नावाखाली वृत्तवैकल्ये लादुन लूट करत असत. राजा रामदेवरायाच्या दरबारात चातुर्वग्य चिंतामणी ग्रंथ लिहून हेमाद्री पंडित या ब्राम्हण पंडिताने आडिच हजार व्रतवैकल्ये भोळ्या जनतेवर 'लादली होती. यादवाच्या काळात मंदिरे बांधण्याचे टैंडर हेमाद्री ब्राम्हणाकडेच होते. रामदेवरायाकडून प्रचंड पैसा उपसून हा हेमाद्रीपंडीत मंदिरे बांधत होता. त्यामुळेच तर यादवकालीन मंदिरांना हेमाडपंथीय मंदिरे म्हणतात.खरे तर, ती यादवकालीन मंदिरे होत. या वैदिक वर्णाश्रम धर्मीयांचा सर्वोच्च सुवर्णकाळ यादवांच्या राजवटीत होता. जनता नागवली जाऊन ब्राह्मण जगवण्याचे , पोसण्याचे काम या काळात झाले होते. ही होती तत्कालीन ब्राम्हणशाही !
रामदेवराय यादवाची राजवट आणि तिथुन पुढचा काळ खालून सामंतप्रथेचा मानला जातो. यादवाच्या राजवटीत पैठण, आंबेजोगाई यांसारख्या ठिकाणी जमीनी खेड़े दान दिलेले सामंत तयार झालेले होते." खालून, सामतेप्रथेचा अर्थ होतो, विकसीत झलेला जमीनदारवर्ग स्थानिक रयतेवर क्रमश: सशस्त्र हुकूमत गाजवू लागतो. या वर्गावर लष्करी सेवेची अट होती. आणि म्हणूनच दुसऱ्या कोणत्याही थराच्या मध्यस्थीविना शासक सत्तेशी प्रत्यक्ष संबंध असल्याचा त्यांचा दावा होता. वरून सामतप्रथेत राजाधिकारी करीत असलेल्या प्रत्यक्ष करवसुलीऐवजी आता छोटे मध्यस्थ करवसूली करतात आणि तिचा एक हिस्सा सामती उतरंडीत वितरित करतात.
त्या काळात जे सामंत तयार झाले ते ब्राम्हण आणि मिरासदार शेतकरी जातीतून. सर्वसामान्य शेतकरी जाती आणि कारगीर जातींचे त्याकाळी आतोनात शोषण, पिडण चालू होते. व्यवसाय बंदिस्त जातीयतेमुळे कारागीर जातींच्या कारागीरित होणारी नवनिर्माती थांबलेली होती. तेच ते पारंपारीक निर्माण करून कारागीर जाती गुजारण करत असत.तर सर्वसामान्य शेतकरी अत्यल्प उत्पादन काढुन, कुटूंब जगवून शेतसारा भरण्यातच आयुष्य पणाला लावत असत. आशावेळी मुक्तीची गरज निर्माण झाली ती सर्वसामान्य शेतकरी जाती, कारागीर जाती आणि अस्पृश्य जातींना.
महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास , मध्ययुगीन भारताच्या सुरवातीला जी संतांची चळवळ उभी राहीली ती कारागीर जातींच्या नेतृत्त्वाखाली, ज्याचे नेतृत्व शिंपी जातीतील संत नामदेव यांनी केले होते.संत चळवळीचे प्रयोजन होते आध्यात्मिक मार्गाने या क्रायसिस मधे सापडलेल्या जातींचे शोषण , पिडन , दमन मांडणे. विठ्ठलाच्या दारात, वाट्याला आलेले भोग,दारिद्र्य मांडून आध्यात्मिक मार्गने मुक्ती शोधण्याचे काम संत चळवळीतून झाले.
कारागीर जातींमध्ये संत भोजलिंगका हे सुतार होते, संत गोरोबाकाका कुंभार होते, नरहरी महाराज सोनार,संत जोगा महाराज तेली होते, काशिबा हे गुरव, शामा हे कासार, विसोबा खेचर लिंगायत व्यापारी होते.या कारगीर जातींच्या नेतृत्त्वाखाली उभे राहिलेल्या भक्ती चळवळीत ब्राम्हण समाजातून बहिष्कृत केले गेल्याने संत निवृत्तीनाथ , संत ज्ञानेश्वर,संत सोपान , संत मुक्ताबाई सहभागी झाले होते. अस्पृश्य जातीतून संत चोखोबाराय,संत सोयराबाई,संत कर्ममेळा , संत बंका आणि संत निर्माळा सहभागी झाले होते. या संत चळवळीत दुय्यम शेतकरी जातीतून माळी समाजातून संत सावता महाराज सहभागी होते. ह्या संत चळवळीच्या काळात मिरासदार शेतकरी सैन्यात प्रशासनात असत तर ब्राम्हण राज्यकारभार शासन चालवायला मदत करत म्हणून सुरवातीला वारकरी संत मंडळात मिरासदार शेतकरी जातीची संख्या कमी होती.
सामंतप्रथा ही अशी, उत्पादन पध्दत आहे, की जीत शासकवर्ग वा जाती कुळांच्या वा शेतकऱ्यांच्या व कारागिरीच्या आणि भुदासाच्या वा अतिशुद्र मजुरांच्या अदास (पण निमस्वतंत्र ) श्रमीकांनी निर्मिलेला अतिरिक्त माल, महसूल कररूपाने वसूल करतात व स्वतःच्या पदसोपानानुसार वाटुन घेतात.
अशा पद्धतीने या शोषणाच्या सरमंजामशाहीत सर्वसामन्य वर्ग व्याकुळ झालेला होता. म्हणून ब्राम्हणशाही, सरंजामशाही विरुद्ध संतांनी विद्रोह केला आणि त्याला मोठा जनाधार मिळाला होता.
मध्ययुगीन भारतात ब्राम्हणी पोथ्या लिहीण्याचा सपाटा यादव काळाच्या टप्यावर मोठ्याप्रमाणावर चालू होता.त्याकाळी अनेक ब्राम्हण संस्कृतमधे लिखान करून राजे महाराजीकडून पैसे उकळत असत. ब्राम्हणी संस्कृत लिखानाला राजाश्रय होता. त्यानंतर शाहीरी पोवाडे यांनाही राजाश्रय लाभला. संतांच्या 'अभंगांना त्यांच्या अभिव्यक्तीला मात्र कुठलाही राजाश्रय त्याकाळी मिळाला नाही. तरिही संतांचा काव्यप्रकार अत्यंत लोकप्रिय झाला त्याचे कारण सर्वसामान्यांचे - दैन्य दुःख पिडन शोषण, दमन संतीनी अभंगातून मांडले होते. सर्वसामान्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम वारकरी संतांनी केले,त्यामुळे लोकाश्रयावर संत चळवळ उभी राहिली.
कारगीर जातींनाही त्याकाळी हिन वागणूक दिल्याचे पुरावे सापडतात. संत नामदेवांना औंढा नागनाथाच्या मंदिरातून हकलून देण्यात आले होते. म्हणून संत नामदेव यांनी आपल्या अंतरीक मनाची सल जगजाहीर केली होती.
कुश्चळ भुमीवरी उगवली तुळस । अपवित्र तयाशी म्हणु नये ॥ नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी। उपमा ' जातीची देऊ नये ।। ज्ञानाचे, सर्वाधीक आदान प्रदान भ्रमंती केल्याने होत असे. या कारागीर जाती व्यावसायाच्या निमीत्ताने सर्वत्र फिरत असत त्यामुळे त्याचे अनुभव विश्व मोठे, व्यापक बनले होते. त्या तुलनेत शेतीत रोज राबणारा सर्वसाधारण शेतकरी ब्राम्हण सांगेल तेच सत्य मानत असे. यातून शेतकरी वर्ग माणसीक गुलाम बनला होता.
आशा वेळेला व्यापक साहित्य निर्मीतीचा संकल्प संत नामदेव यांनी सोडला आणि इतर संतानी तो पूर्ण करायला मदत केली.
बाम्हणशाहीविरुद्ध भागवत धर्माचे बंड संतांनी उभे केले. सामंतशाही, सरंजामशाही विरुद्ध त्यांनी आपली कैफियत विठु पाटलाकडे मांडली. 'संतांकडे सर्व प्रकारची कृतीस लागणारी साहित्यशस्त्रे होती पण त्यांना अनुकुल नव्हती भौतिकवादी ती परिस्थिती. या संत चळवळीच्या पायावर छत्रपती शिवरायांची राजकीय क्रांती झाली, पण हे पहायला पहिल्या टप्प्यातील संत मंडळ अस्तित्वात नव्हते.
संत चळवळीतून जातीअंताची प्रक्रीया मोठ्या प्रमाणावर झाली असती तर उत्पादन वाढीचीं निश्चीती झाली असती. कारण बुद्धाच्या वर्णीताच्या क्रांतीने देशाचे उत्पादन आठपट वाढले होते. संतांकडून जातीअंताची क्रांती होऊ शकली नाही. गावगाड्यात ' जाती ' तशाच राहिल्या. एकट्या चोखोबारायांनाच भक्तीमार्गाद्वारे बरोबरी मिळाली. बाकी अस्पृश्य तसेच राहिले ताटकळत ,जातीअंताची वाट बघत. ही संत चळवळीच्या उदयाची पार्श्वभूमी आणि मर्यादाही.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment