संत चोखोबाराय गेले.नामदेवांनी त्यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या अगदी समोर बांधली.हे संत चोखोबारायांचे स्मारक मोठा गाजावाजा करून , सर्वांना सोबत घेऊन उभे केले होते. लोकांनी त्यातून काय धडा घ्यायला हवा होता? कशासाठी संत नामदेवांनी सर्व जातीचे संत एकत्र केले होते ? कशासाठी सर्व संत मंडळ चोखोबारायांच्या घरी जावून सहभोजन करत होते ? गोपाळकाला म्हणजे काय ? भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणजे काय. ?
आर्थात कुणीही भेदभेद करायची नाही. जातीव्यवस्था, अस्पृश्यता पाळायची नाही. सर्वांना समान लेखावे, मानावे आणि वागवावे.हा सर्वच संतांच्या शिकवणुकीचा मुख्य उदेश होता.चोखोबारायांच्या नंतर झालेल्या सर्वच संतांनी देखील चोखोबारायांचा अगदी आदरपूर्वक उल्लेख केला आहे. सर्वांना चोखोबाराय वंदनीय, पुजनीय वाटतात.
संत तुकोबाराय संत चोखोबारायांच्या बद्दल तर 'चोखा माझा गणपती' म्हणतात. संत तुकोबारायांनी आनखी एका अभंगात संत चोखोबारायांच्या बद्दल गौरवाने वर्णन केले आहे. ते असे.
चोख्याचे अभंग करविले देवानी | स्वप्नी ही येऊनी सांगितले।।
चोखोनिया म्हनोनी निंदतील कोणी । लागोणी बरे मजला गोणीन पहाती ॥
माझ्या चोखियाचे नित्य घेती नाव । त्याच्या घरी धाव जाय माझी ॥
तुका म्हणे चोखा युगायुगीचा भक्त । म्हणोनी पंढरीनाथ ऋणी त्याचा ॥"
चोखोबारायांच्या बद्दल निंदानालस्ती केलीत पहा ? ही तंबी देत ' भेदाभेद भ्रम अमंगळ ' असेही तुकोबारायांनी स्पष्ट सांगिले आहे.
संत एकनाथ महाराजांनी चोखोबारायांच्या बद्दल अनेक अभंग लिहीले आहेत. इतर संतांपेक्षा संत एकनाथ महाराजांचे चोखोबारायांचा उल्लेख करणारे सर्वात जास्त अभंग आहेत. संत एकनाथ महाराजांवर संत चोखोबारायांचा मोठा प्रभाव होता. म्हणुनच संत एकनाथ महाराजांनी पैठण परिसरात अस्पृश्यता निर्मूलनाचे अनेक प्रयोग केले होते. आपल्या घरी पितर भोजनाच्या पंगतीत त्यांनी अस्पृश्यांना जेवू घातले होते. एकनाथ महाराजांनी तर इंद्र दरबारातील नासलेले, सडलेले आमृत चोखोबांची दृष्टी पडताच शुद्ध झाल्याचे अभंगातून वर्णन केलेले आहे.
ही संत मंडळी समतेचा अग्रह धरत चोखोबारायांना प्रतिक म्हणुन उभी करत होती. कुणी भेदाभेद करू नये, ईश्वर भेदाभेद करत नव्हता. संत भेदाभेद करत नव्हते हा वारेकरी सांप्रदायाचा महत्त्वाचा भाग होता.आणि संत चोखोबाराय या समतेच्या मांडणीसाठी संतांनी प्रतिक बनवले होते.
या शिकवणुकीचा समाजमनावर काही फरक पडला की नाही ? भेदाभेद मानू नये, ईश्वराच्या दारात कुणीही लहानमोठा नसतो, देव सर्वांचाच, सगळ्यांसाठी सारखाच ही शिकवण समाजमनात रुजली की नाही?
याचे उत्तर जड अंतकरणाने नाही असे द्यावे लागते.जातीभेद विरहीत एकच गाव संताना वसवण्यात यश आले. ते गाव म्हणजे पंढरपूर होय.गावगाड्यात संतांच्या स्वप्नातील समता पोहंचू शकली नाही.आज घडीला महाराष्ट्रातील सर्व वारकरी पंढरपुरात एकत्र आले की, जातीभेद करत नाहीत, अस्पृश्यता पाळत नाहीत.कुनाची जात विचारत नाहीत.ते एका ताटात जेवतात, एकमेकांना अलिंगण देतात, एकमेकांच्या पाया पडतात, परंतु हेच वारकरी गावाकडे गेले की पुन्हा नित्यनियमाप्रमाणे जातीभेद, अस्पृश्यता पाळतात. जातीभेद विरहीत आदर्श समाजाचे एक स्वप्न संतांनी पाहिले होते त्या स्वप्नाला वारक-यांनी पंढरपुरापुरतेच ठेवले. आणि चोखोबारायांचे काय झाले ? भालचंद्र नेमाडे म्हणतात.
" बिचारा चोखा यातिहीन म्हणून त्याची वारकऱ्याना पर्वा नाही आणि भरकटलेल्या दलित चळवळीने तर विठ्ठल भक्त चोख्याला प्रतिगामी ठरवलेले. असा एकूण हा भला संत मराठी परंपरेपासून तेव्हाही व आताही दूरच राहिला. शेवटी संतानाही जातीचे पाठबळ लाभलेले दिसते. परंतु केवळ स्वतःच्या आविष्कार सामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत पाठबळ लाभलेले दिसते"
एकटा चोखोबा तेवढाच वारकऱ्यांच्या दृष्टीने माणुस ठरला आहे. बाकी अस्पृश्य मात्र माणुस म्हणुन गणले गेले नाहीत.चोखोबारायांनी अस्पृश्यता अमानवीय असे सांगुनही, तुकोबाराय यांनी भेदाभेद मानू नका असे सांगूनही, संत एकनाथ महाराजांनी भेदाभेदाच्या विरोधात काम करूनही, वारकर्यांनी मात्र दैनंदीन जीवनात, गावपातळीवर अस्पृश्यता, भेदाभेद चालूच ठेवला आहे. २०१९ साली विदर्भातील आर्वी या गावी माजीअस्पृश्य जातीतला मातंग समाजाचा ८ वर्षाचा मुलगा मंदिरात गेला म्हणुन, त्याला भर दुपारी गरम स्टाईलच्या फरशीवर एसिड टाकून बसवण्यात आले होते. मातंग समाजील या मुलावर मंदिर बाटवल्याचा आरोप करण्यात आला होता. अशीच घटना लातुर जिल्ह्यातील सरपंच असणाऱ्या मातंग समाजाच्या महिलेलाही मंदिरात का गेल्या म्हणुन नवरदेव असणाऱ्या त्या महिलेच्या मुलासह दोघांनाही गावगुंडांनी मारले होते. जळगाव जिल्ह्यातील अस्पृश्याची मुले विहीरीत का पोहली म्हणून त्यांना उघड़े नागडे करून शेतातून गावापर्यंत मारत आनले गेले होते. या सर्व घटना २०१९ च्या आहेत. याही अगोदर परभणी जिल्हयातील देशमुख पिंप्री या गावी तर पाऊसात मंदिराच्या आडोशाला उभे असलेल्या आंबादास सावणे या बौद्धाला ठेचून मारण्यात आले होते. तो मंदिरात सुद्धा गेला नव्हता.
आशा अनेक घटना आजही मनाला व्याकुळ करतात. चोखोबारायांना न्याय मिळाला का हा प्रश्न पुन्हा उद्भवतो. त्यांनी लिहीलेले अस्पृश्यतेचे अभंग फक्त गाथ्यापुरतेच ठेवले जातात का ? सर्वांच्या आधी चोखोबारायांनी सामाजीक समतेचा अग्रह धरूनही हा चोखोबा रस्त्यावरच तिष्ठत उभा ठेवण्यात आला आहे. त्याची स्वतंत्र अशी भव्यदिव्य , मंदिरे, सभागृह, मंगलकार्यालये, इमारती, वास्तू तुम्हाला कुठेही दिसनार नाहीत.काही अपवाद वगळल्यास चोखोबारायांच्या वाट्याला मरनोत्तरही वाळीत टाकलेलेच भोग आले आहेत. शेवटी चोखोबायांसह त्यांच्या कुटूंबीयांनी नेमाडे म्हणतात त्या प्रमाणे
" सर्वांनी निष्कपट मनाने एका अवाढव्य,
परंपरेला उगमस्थानीच धोक्याचे ईशारे देऊन ठेवले."
या संदर्भात संत चोखोबारायांचा सखोल अभ्यास करूनच तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले की या वारकरी भक्तीमार्गाने आपला उद्धार होने शक्य नाही. म्हणुनच त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद न माननाऱ्या बौद्ध धम्माचा पर्याय निवडुन सर्वच अस्पृश्यांना गुलामगीरीतून मुक्त केले.वारकरी , भागवत धर्माने व्यवहारात समता आनली असती तर आज घडीला हजारो माजी अस्पृश्य जाती वारकरी , भागवतधर्मी दिसल्या असत्या.
आपल्या आजुबाजुला संतांच्या मेळ्यात वावरलेल्या चोखामेळ्याला ग्रामीण जातीग्रस्त समाजमनाने स्विकारले नाही. अस्पृश्यता पाळायची नाही हे चोखोबारायांच्या संत चरित्रावरून तरी लोकांनी ठरवून टाकायला हवे होते. पण समाजाला 'तसे करावेसे वाटले नाही, जो जातीग्रस्त समाज चोखोबारायांचे, तुकोबारायांचे ऐकत नाही तो आपले काय ऐकेन या भुमीकेतून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला होता.
आतातरी ग्रामीण समाजाने संत चोखोबारायांना न्याय दयावा. संत तुकोबाराय, संत एकनाथ महाराज सांगतात त्याप्रमाणे जातीभेद करू नये. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर ही शिकवण सर्वांनी 'आचरणात आणावी आपल्या अवतीभोवती कुणालाही भेदाभेद करू देऊ नये. सर्वांना माणुस म्हणून वागवावे. हिच चोखोबारायांना खरी श्रद्धांजली ठरेल.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment