Friday, 17 June 2022

संत चोखोबारायांचे जीवनचरित्र प्रकरण १५ वे ll ऐसा आनंद सोहळा ll

 संत चोखोबारायांचे जीवनचरित्र 
         प्रकरण १५ वे 

                    ll  ऐसा आनंद सोहळा  ll 

ऐसा आनंद सोहळा । निर्मळा पाहे आपुले डोळा ll
आनंद न माय गगनी । वैष्णव नाचती रंगणी ॥ 
जेथे नाही भेदाभेद । अवघा भरला गोविंद ॥
तया सुखाशी सुखराशी | वोळली ती निर्मळेसी ll 
सोयरा देखोणी आनंदली । वेळोवेळी विठु न्याहाळी ॥
                   - संत सोयराबाई 

                  मंगळवेढ्याच्या वेशीत संत चोखोबाराय गेले. याचे दुख: सर्वांनाच झाले होते.संत सोयराबाई, त्यांचा मुलगा कर्ममेळा पोरके झाले होते. पण नामदेवांनी त्या कुटूंबाचे सांत्वन केले. त्यांना धिर दिला. चोखोबारायांची बहिण निर्मळा आणि मेव्हणा बेका यांना निरोप पाठवून पंढरपुरला बोलवून घेतले गेले.तोपर्यंत संत नामदेव यांनी ग्रामीण भागातील अनेक लोक, संत, महात्मे जमवून चोखोबारायांच्या अस्थी मंगळवेढ्यातून भजन करत पंढरपुरात आनल्या. एवढ्या जनसमूहाच्यासह पालखीत संत चोखोबारायांच्या अस्थी आल्याचे बघुन संत सोयराबाई, संत कर्ममेळा भारावून गेले.अस्पृश्याला कुठे कोण वाली असतो ?  येथे मात्र संत नामदेवांनी मोठा जनसमुदाय जमवून चक्क  संत चोखोबारायांची समाधी बांधायला घेतली होती.मनुस्मृती या ब्राम्हणी कायद्याप्रमाणे अस्पृश्यांची समाधी बांधायची नसते किंवा त्याला देव तथा पूजनीय बनवता येत नाही. संत नामदेव वर्णाश्रम धर्मीयांचा कायदा मोडीत काढुन , चोखोबारायांची समाधी उभारत होते.त्यामुळे ही घटना काही साधारण नव्हे.आणि इतिहासात एका अस्पृश्याचे स्मारक पहिल्यांदाच होत होते.या बद्दल त्या कुटुंबाला अत्यंत आनंद झाला होता .सोयराबाईनी अभंग लिहून हा आनंद व्यक्त केला आहे. या समाधी सोहळ्याला निर्मला बंका ही जोडीही हजर आहे. निर्मळा म्हणजे चोखोबारायांची बहीण तिच्या डोळ्यासमोर समाधी सोहळा होतो आहे.तिचाही आनंद अवर्णनीय आहे. सर्वांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. आपल्या घरच्या व्यक्तीचे कायमस्वरूपी स्मारक होत आहे ही त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब होती.  
                   
                        संत सोयराबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे या समाधी सोहळ्याला कुठलाही भेदाभेद न करता, सर्व जनता दादीवाटीने उभी होती. पतका आकाशात झुलत होत्या. हा सोहळा सोयराबाईंच्या कुटुंबालाच तेवढा आनंदयायक नव्हता  तर सबंध पंचक्रोशीत सर्व अस्पृश्यांना, वारकर्यांना व गरिब जनतेला नामदेवांनी आयोजित केलेल्या समाधी सोहळ्याचा आनंद झाला होता.

                            भारतात प्रथमच एक सवर्णाने, एका अस्पृश्याचे स्मारक, मोठा उत्सव साजरा करून बांधले होते. नामदेव जन्माने शिंपी होते. त्यांनी सर्व संतांचा मेळा जमवला होता.सर्व जातीपातीचे संत त्यांच्या मेळ्यात सामाविष्ट होते. त्यात चोखोबाराय आणि त्यांचे कुटूंब तेवढे अस्पृश्य जातीतून आलेले होते. सर्वांच्या साक्षीने नामदेवांनी कुठलाही भेदाभेद न् पाळता बडव्यांच्या नकावर टिच्चून विठ्ठल मंदिराच्या समोर चोखोबारायांचे स्मारक बांधले.आजही विठ्ठल मंदीरासमोर उभी असलेली संत चोखोबारायांची समाधी समतेचा समाज निर्माण करू पहाणाऱ्या नामदेवांची ती निषाणी आहे. जातीअंताची भुमीका घेऊन काम करणार्यांसाठी ही समाधी समतेचे प्रतिक आहे. ही समाधी सवर्ण- अस्पृश्याच्या मैत्रीचे ते प्रतिक आहे. चोखोबाराय - नामदेवांच्या मैत्रीचे ते प्रतिक आहे.सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरा जातींना जोडनारा हा क्रांतीदोस्तीचा दुवा आहे.या क्रीतदास्तीला जपले पाहिजे. याद्वारे जातीअंतक प्रबोधन केले पाहिजे.  
                समाधी सोहळ्याच्या नंतरच्या काळात चोखोबारायांच्या परिवारातील त्यांची बहीण निर्मळा पुन्हा आपल्या मूळ गावी जावून राहिल्याचे निदर्शनास येते. कारण तसा संत सोयराबाईंचा अभंग सापडतो. त्यात त्यांनी चोखोबारायांची आठवण  काढत आयुष्य व्यतित करणाऱ्या निर्मळेची वेदना मांडली आहे.निर्मळाच्या रुपाने सोयराबाई म्हणतात विठ्ठला तुच सांभाळ आता लाडक्या चोखोबाला. म्हणजे हा अभंग संत चोखोबारायांची समाधी बांधल्यानंतरचा आहे.
संत सोयराबाई म्हणतात.
 पुसोनी सर्वांसी निर्मळा निघाली l येवुनी पोहंचली मेहुणपुरी ll सर्वकाळ छंद वाचे नाम गाय l आठवीत आहे चोखियांसी ll
 म्हणे विठोबा दयाळा मागणे आहे तुज | माझा भक्तराज सांभाळी तूं ll
 सोयरा म्हणे ऐसा सुखाचा सोहळा l भागी अवलीळा निर्मळाती ll 

                     यात निर्मला यांचे वर्णन सोयराबाईनी केले आहे. आशा प्रकारे एका सज्जन माणसाचा शेवट अत्यंत त्रासातून झाला. कुणालाही एकही शब्द वाकडा आणि आगाऊ न बोलणाऱ्या चोखोबारायांना पावलोपावली त्रास देण्यात आला. सदैव 'दूर हो " म्हणत हिन लेवण्यात आले. चोखोबारायांचा जरासा देखील कुणाला स्पर्शही झाला तरी त्यांनी अंगावर पाणी शिंपडून स्वताला शुद्ध करून घेतले. फक्त माणुस पणाचे हक्क अधिकार मागीतल्याबद्दल चोरीचा आळ घालून मारण्यात आले होते.त्यांचे संपूर्ण जीवन यातनेत गेले होते.
                     विचार करा चोखोबारायांसारख्या फक्त एका अस्पृश्याचे डॉक्यूमेंटेंशन झाले म्हणून सत्य इतिहासाच्या पटलावर आले.असे कितीतरी चोखोबा गावागाव मेले असतील, मारले गेले असतील. मारले गेलेले हजारो चोखोबा अजरामर झाले नाहीत, कारण त्यांच्या सहवासात आठवणींचे स्मारक बांधणारे कुणी नामदेव नव्हते.हजारो प्रतिभासंपन्न अस्पृश्य गढ्या बुरजांत तेल शेंदूर पाजुन जिवंत गाडले गेलेत. त्यांच्या नोंदीही नाहीत. चोखोबारायीच्याही आधी आणि  त्याच्या नंतरही बोलू, लिहू पहाणाऱ्या हजारो अस्पृश्यांना जागोजाग मारण्यात आले होते. जीवंत जाळण्यात आले होते. कित्तेकांना पाण्याची विहीर , जलाशय का बाटवलेस म्हणून दगडाने ठेचून मारण्यात आले होते.आशा हजारो शहिदांचे , बलिदान दिलेल्यांचे कधीही स्मारके बनली नाहीत.किंवा उच्चजातवर्गीयांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांनी माफीही मागितलेली नाही.
                      आज घडीला त्या काळाची कल्पना करताना संत नामदेवांची त्यावेळेसची कृती अत्यंत क्रांतीकारक वाटु लागते.कारण ते व्यवस्थेचा बळी गेलेल्या एका प्रतिभासंपन्न साहित्तीकाचे स्मारक उभारतात. नामदेवांनी उभारलेले स्मारक आज घडीला समतेचे, एकत्मतेचे प्रतिक म्हणून पुढे आनायला हवे. ते स्मारक साधेसुधे नसुन एका महान साहित्तीकाचे आहे. परंतू आजही नामदेव- चोखोबारायांना जानुनबुजुन डावलण्याचा प्रयत्न केला जातो.आजही जातीव्यवस्था,अस्पृश्यता पाळणाऱ्या समाजव्यवस्थेत नामदेव- चोखोबाराय मनापासून स्विकारणारे फारच कमी आहेत.इतरांचे काहीही असो, नामदेवांनी उभारलेले संत चोखोबारायांचे स्मारक जातीअंताच्या लढाईचे मध्ययुगीन भारतातील पहिले प्रतिक म्हणून पुढे आनले पाहिजे. संत  चोखोबारायांच्या चरणावर संत  निर्मळा यांच्या शब्दांत लोटांगण -

"आनंदे ओविया तुम्हासी गईन् । जीवेभावे  ओवाळीन पायांवरी ll
सुकुमार साजिरी पाऊले गोजीरी । ते हे मिरविली विटेवरी ll कटेवरी कर धरोणी श्रीहरी । उभा भीमातीरी पंढरीये ll 
महाद्वारी चोखा तयाची बहीण l घाली लोगण उभयतां ll 

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment