♦अण्णाभाऊंच्या संदर्भात केल्या गेलेल्या अफवा आणि वास्तव.
नितीन सावंत परभणी
9970744142
(सौत्रांतिक मार्क्सवादी अभ्यासक)
सांप्रत वर्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून अनेक ठिकाणी साजरे होत आहे.या जन्मशताद्बी वर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अनेक चळवळी,पक्ष,संघटणा अण्णाभाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहेत.याच धर्तीवर अण्णाभाऊवरची डाव्यांची सुटलेली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी कॉ.सुबोध मोरे यांचा एक लेख लोकसत्ता या दैनिकात येवून गेला आहे.त्यांचा आनखी एक लेख त्या आधी बार्टीच्या पुस्तकातही आलेला आहे.दोनही लेखांची मांडणी आणि केंद्रबिंदू जवळपास सारखीच आहे.
या दोनही लेखात कॉ.सुबोधजी मोरे यांनी डाव्या चळवळीवर अण्णाभाऊंच्या संदर्भाने घेतले जाणारे आक्षेप खोडण्याचा प्रयत्न केलेला आहे.यात त्यांना लोकांचे आक्षेप अनेक मुद्दे पुरावे देवून खोडता आले असते त्या ऐवजी त्यांनी अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रात जे घडलेच नाही ते अवास्तव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसुन येइल.त्यांच्या दोनही लेखातील काही अक्षेपांवर येथे चर्चा करण्याचा माझा मानस आहे.
मोरे आपल्या दैनिक लोकसत्ताच्या लेखात म्हणतात,
" याच राजकारणाचा एक भाग म्हणून, डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील दलित चळवळीला कमजोर करण्यासाठी आणि मातंग समाजाला त्यातून वेगळे पाडण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी १९७५-७६ सालानंतर अण्णा भाऊंची ‘मातंग समाजाचे नेते’ अशी प्रतिमा पुढे आणण्याचा प्रयत्न केला;"
खरे तर १९७५ - ७६ नंतर विविध आंबेडकरवादी सामाजिक चळवळींनीच अण्णाभाऊ हे प्रतिक फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीत अंतर्भूत करण्यास सुरुवात केली होती.विविध जात समुहाला आपल्या पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीत आणण्यासाठी नेहमी फुले शाहु आंबेडकर सांगण्या ऐवजी त्याच जातीतले पुरोगामी प्रतिक उभे करण्याचा प्रयत्न कांशीरामजींनी केलेला आहे.या धर्तीवर अण्णाभाऊंच्या गावी त्यांनी अण्णाभाऊंच्या कुटूंबातील सदस्यांना घरही बांधून दिलेले आहे.त्यानंतर स्वता आंबेडकरवादी चळवळींनीच अण्णाभाऊ हे प्रतिक चळवळीत सामावून घेतले,सर्वच महापुरुषांच्या फोटोंच्या रांगेत अण्णाभाऊ दिसायला लागले.यात सुबोध मोरेंना राजकारणाचा भाग कसाकाय दिसतो याचा उलगडा होत नाही.आणि जर अण्णाभाऊ हे प्रतिक मातंग समाजाला वेगळे पाडण्यासाठी आनण्यात आले होते तर सर्वाधिक मातंग समाज अण्णाभाऊंच्या प्रतिकाच्या द्वारेच फुले शाहु आंबेडकरवादी बनला.अनेक मातंगांनी तर बोद्ध धम्माची दिक्षाही घेतली.आंबेडकरांच्या प्रभावाखालील दलीत चळवळीत मातंग आले ते आण्णाभाऊंचे प्रतिक स्विकारुन यामुळे ती निष्प्रभ झाली नाहीच,मात्र डाव्यांच्या हातुन अण्णाभाऊ निसटले हे म्हनता येइल.कारण डाव्यांनी सामाजिक सर्वहरा जातीतील महापुरुषांना प्रतिक बनवायचे नाकारल्यामुळे हे घडले.
लोकसत्ता दैनिकाच्या लेखात त्यांनी अण्णाभाऊंना घरी सोडले वगैरे जे लिहीलेले आहे अगदी तसेच बार्टीच्या पुस्तकातील लेखातही मोरे म्हणतात,
"कॉ.अण्णाभाऊ गेले त्या वेळेस मी अकरा वर्षाचा होतो.अण्णाभाऊ साठे ज्या गोरेगावातील सिद्धार्थनगर क्रमांक २ मधील गृहनिर्माण वसाहतीत रहात होते."
पुढे कॉ.मोरे यांनी शुद्ध नसलेल्या अण्णाभाऊंना त्या ट्याक्सीवाल्याला रस्ता दाखवत गोरेगातील घरी नेऊन सोडल्याचे विस्ताराने लिहीलेले आहे.यात ते म्हणतात
नंतर टॅक्सीत पुढे बसून मी अण्णाभाऊंच्या घरापर्यंत गेलो व घरातील पुरुष मंडळींना सांगून अण्णाऊंना टॅक्सीवाल्याच्या मदतीने घरात सोडले."
याबद्दल काही प्रश्न निर्माण होतात त्या बद्दल मोरे यांनी स्पष्ट मांडणी करायला हवी.मोरे जेव्हा अण्णाभाऊ यांना घरी सोडायला गेले तेव्हां अण्णाभाऊ यांच्या घरात अनखी कोन कोन पुरुषमंडळी होती ?
कॉ.सुबोधजी मोरे यांना माझा प्रश्न असा आहे की अण्णाभाऊ यांच्या घरातील ही पुरूष मंडळी कोण ? कारण अण्णाभाऊ यांच्या सोबत त्यांचा मुलगा रहात असे आणि तो नेमका मे महिण्यात गावी गेलेला होता.आणि त्या नंतर त्यांचा मुलगा आणि अण्णाभाऊंचे भाऊ शंकर साठे हे अण्णाभाऊंच्या अंत्यविधीला मृत्यूच्या दुसऱ्यादिवसी पोहंचले.मग मोरे सोडायला गेल्यानंतर अण्णाभाऊंच्या घरी असलेली ही पुरुषमंडळी कोण ?
बार्टीच्या पुस्तकातील दिलेल्या याच लेखात पुढे कॉ.सुबोधजी मोरे म्हणतात
"त्याच काळात गोरेगावला अण्णाभाऊंचे भाऊ शंकर बापू साठे,आण्णाभाऊंची द्वितीय पत्नी जयंताबाई व मुलगी शकुंतला,शांताबाई राहत होत्या."
मोरे आपल्या लेखात शंकर साठे हे गोरेगावला रहात असल्याचे जे सांगत आहेत हे धादांत खोटे आहे.शंकर साठे हे स्वता माझा भाऊ अण्णाभाऊ या स्वलिखीत ग्रंथात आपण गावी रहात असल्याचे वर्णन करतात.शेवटी अंत्यसंस्काराला सुद्धा ते आणि आण्णाभाऊंचा मुलगा दोघेही सोबत गावाकडून मुंबईला आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.आता खुद्द शंकर भाऊ साठे मी गावी रहात होतो हे आत्मचरित्रपर निवेदन कथन करत असतील तर मोरेजी खुद्द प्रत्यक्षदर्शी शंकर भाऊ साठेंपेक्षा कोणत्या नव्या पुरावा पध्दतीचा वापर करत आहेत ?
विपर्यास होणारा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की मोरे हे अण्णाभाऊ गोरेगावातील सिद्धार्थ नगर मधे रहात असल्याची आणि तिथेच ते गेल्याची जी माहिती देत आहेत ती चुकीची आहे.
मोरे जेव्हा ११ वर्षाचे होते तेव्हा चंद्रकुमार नलगे नावाचे लेखक अण्णाभाऊंशी तासंतास चर्चा करत असत,एवढ्या ते म्याच्युअरिटीचे होते.म्हणून त्यांच्या सर्जा नावाच्या पहिल्या कथासंग्रहाला अण्णाभाऊंनी प्रास्तावना दिली आहे.अण्णाभाऊंनी दिलेली ही एकमेव प्रास्तावना आहे.आता एवढे म्याच्युअर्ड चंद्रकुमार नलगे आपल्या लेखात म्हणतात
"मी अण्णाभाऊंना म्हटलं, " तुम्हाला तर मंत्री राजारामबापू पाटलांनी फ्लॅट दिला आहे,असं मी ऐकलं आहे. तुम्ही इथं कसं काय रहाता ?" अण्णाभाऊ म्हनाले , " मी तो नाकारला. कारण माझी माणसं इथं आहेत.ही मोठ्या दिलाची माणसं आहेत. त्यांचे जगणं खर आहे.या जगण्यावर माझा जीव आहे.या जिवंत माणसांना सोडून गेलो तर माझी प्रतिभा अटेल.सुखदुखाशी झोंबाडून जीवनाशी लढा देनारी इथली माणसं मी सोडुन गेलो,तर मी जीवंत रहाणार नाही.माझी लेखणी थंडावून जाईल."
नलगे जे सांगताहेत ते सत्य मानायचे की मोरे यांचा घरी नेऊन सोडलेला प्रसंग सत्य मानायचा ?
प्रा.चंद्रकुमार नलगे सध्याला जीवंत आहेत.ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे संस्थापक आहेत.एवढा मोठा माणूस खोटे बोलत आहे का ? किंवा का खोटे बोलत असावा ? निवृत्त प्राध्यापक नलगे यांना कॉल करुन चौकशी केली तर ते म्हणाले अण्णाभाऊ चिराग नगरातील घरीच वारले ते गोरेगावला कधीच रहायला गेलेले नाहीत.अण्णाभाऊंच्या भावकीतले जवळचे विलास साठे हे सध्या पुण्यात रहातात ते सुद्धा म्हणतात की अण्णाभाऊ चिरागनगरलाच वारले.
कॉ.सुबोध मोरे यांना खोटी माहिती देण्याची वेळ का यावी ?
सुबोध मोरे हे अण्णाभाऊ सुव्यवस्थीत जीवन जगत होते, वगैरे ही जी मांडणी करत आहेत ती चुकीची आहे.कारण अण्णाभाऊंनी नलगे यांना पत्र लिहून मुलगा मधुला मदत करण्याचे कळविले आहे.सुव्यवस्थित जीवन जगणारा माणूस मदत मागेल का ?
मग अशी मदत त्यांनी मोरे यांच्याकडे हक्काने मागयला हवी होती.किंवा कम्युनिस्ट पार्टीकडे तरी ही मदत त्यांनी मागायला हवी होती.अण्णाभाऊ तसे का करत नाहीत ? अण्णाभाऊंना पार्टीतील लोकांनी अप्रत्यक्षरित्या वेगळे किंवा एकटे पाडले होते.
शाहीर द.ना.गव्हाणकर यांनी कलापथक मोडल्यानंतर पुन्हा तिच माणसे घेवु कार्यक्रम करणे सुरु केले.म्हणजे तुम्हाला नेमके अण्णाभाऊच नको होते का ? याबद्दल माझे भाऊ अण्णाभाऊ मधे शंकर साठे म्हणतात
"फक्त अण्णाभाऊच त्या पथकात नव्हते.अण्णाभाऊंची गाणी,पोवाडे,छक्कड,लावणी हे सर्व पाहिजे होते.पण त्यांना अण्णाभाऊ नको होते."
मग डाव्यांनी अण्णाभाऊंची उपेक्षा केली हा जो लोक आक्षेप आहे तो खरा नव्हे का ? गव्हाणकर यांनी अण्णाभाऊंना डावलून पुन्हा कला पथक चालवणे म्हणजे अण्णाभाऊंना एकटे पाडणे होय.यातून अण्णाभाऊ मानसिक तनावाखाली गेले.एक माजी अस्पृश्य जातीतून आलेला व्यक्ती आता बुद्धीजीवी म्हणून नावारूपाला येत आहे हे गव्हाणकरांसाख्यांना सहन तर झाले नसावे ना ?
कम्युनिस्ट चळवळीला आर्थिक सर्वहरातून आलेले शेतकरी जातीतलेले कॉ.शरद पाटील बुद्धीजीवी म्हणून चालले नाहीत,आजही चालत नाहीत मग त्यांना सामाजिक सर्वहरातील माजी अस्पृश्य जातीतले अण्णाभाऊ बुद्धीजीवी म्हणुन चालतील का ?
अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते.त्यांनी वर्गीय साहित्यनिर्मिती केली.त्याचबरोबर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढे आणि चळवळींच्या अकलनातून जातीअंताच्या भुमीकेपर्यंत आले.त्याद्वारेच त्यांनी बुद्धाची शपत,उपकाराची फेड ह्या कथा लिहील्या.अण्णाभाऊ जसे वर्गीय साहित्य निर्मिती करत होते तसेच त्यांनी जात हे वास्तव दाखवत जातीअंताची भूमिका घेणारी साहित्यनिर्मिती केली,माजी अस्पृश्य व शेतकरी जातींना जोडणारे दुवे बनवणारी भूमिका सुद्धा घेतली.त्यामुळे ते मार्क्सवादी आंबेडकरवादी होते असे म्हणण्यात काहीही चुक नाही वाईट नाही.अण्णाभाऊंवर डाव्या विचारांचा प्रभाव होता हे म्हणण्याला आमचा विरोध नाही.पण ते आंबेडकरवादी सुद्धा होते हे डाव्यांनी मान्य करायला हवे.म्हणून अण्णाभाऊ फक्त मार्क्सवादीच होते.त्यांना कॉम्रेड लावलेच पाहिजेत हा अग्रह कशासाठी ? त्या अग्रहातून मोरेंनी सुद्धा बाहेर येण्याची गरज आहे.
इंग्रजांकडून मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल अण्णाभाऊंची भूमिका कॉ.मोरे यांना समजून घेता आलेली नाही.ही भूमिका कोंबडीचोर कथेतून अगदी स्पष्ट झालेली आहे.त्यामुळे अण्णाभाऊ मिळालेल्या स्वातंत्र्याचे अगदीच समर्थक होते वगैरे हा दावा कोंबडीचोर कथा निकाली काढते. " यह आझादी झुटी है देश जनता भुकी है " हे शब्द नसतील पण भाव आणि केंद्रबिंदू तोच असणारी कथा म्हणजे कोंबडीचोर होय.अण्णाभाऊं बद्दल जनमानसात झालेले प्रबोधन आणि त्यातले आपल्याला न पटलेले मुद्दे खोडण्याच्या नादात अण्णाभाऊंनी साहित्यातून दिलेले संदेश आणि त्या साहित्याचे अंतरंगच हरवले जानार नाही याची दक्षाता मोरेंसारख्या जुण्या कम्युनिष्टांनी तरी घ्यायला हवी.
अण्णाभाऊ 1958 ला झालेल्या दलित साहित्य संम्मेलनाच्या उद्दघाटनपर भाषणात म्हणतात
" हे जग,ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे."
या विधानातील दलीत शब्द काढून कष्टकरी श्रमकरी हा वर्गीय शब्द प्रचारित करण्यामगे डाव्यांचे काय प्रयोजन होते ? फक्त लढाई वर्गीयच जात्यांतक नको या प्रयोजनातून त्या विधानाला सोइसकररित्या बदलण्यात आलेले आहे.याबद्दल आज डावे स्पष्टीकरण देतील का ?
खरे तर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यातील विविध प्रतिके,दुवे यावर चर्चा व्हायला हवी.तसी न करता कुठलातरी असंयुक्तीक वाद निर्माण करुन चळवळी विस्तारणार आहेत काय ?
सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरांना जोडणारा सर्वात मोठा दुवा हे अण्णाभाऊ आहेत.त्यांना सर्वच सामाजिक चवळींनी प्रतिक मानने चांगलेच आहे.भाषेची निर्मिती राबनारे करतात.शब्दांची निर्मीती कष्टकरी,श्रमकरी,शेतकरी करतात.ऐतखाऊ किंवा अभिजन नव्हे.आणि अण्णाभाऊ याच भाषेची, शब्दांची नवनिर्मीती करणाऱ्या जात,जमात समुहाला ते आपल्या साहित्याचे नायक बनवतात.स्त्रीयांना त्यांनी नाइका बनवले.भटके विमुक्त,आदिवासी,दलित-अस्पृश्य आणि शेतकरी जातीतले लोक अण्णाभाऊंनी नायक म्हणून उभे केले.त्यांच्या स्वस्त्तित्वाचा प्रश्न उभा करत त्या नायकांना विद्रोह शिकवीला.म्हणून भाषेची निर्मिती करणाऱ्या सर्वहरांचे (सामाजिक,आर्थिक) साहित्यिक क्षेत्रातील नेतृत्व म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस एक ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन म्हणून साजरा झाला पहिजे.या मागणीला डाव्यांनी स्विकारले पाहिजे.पाठिंबा दिला पाहिजे.अण्णाभाऊंच्याच नावे मराठी भाषा दिन घेतला पाहिजे.
कॉ.शरद पाटील अण्णाभाऊंच्या फकिरा कादंबरी बद्दल म्हणतात.
"अण्णाभाऊंची फकिरा ही महान दृष्टी कादंबरी आहे.ही कांदबरी क्रांतीकारी नेनीवेचा विजय आहे."
( @ लेख आहे तसा वापरा,पोस्ट,शेअर करा )
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment