ll सौत्रांतिक मार्क्सवादी राजकीय विश्लेषण ll
नितीन सावंत परभणी
9970744142
1) भारतीय सरंजामशाहीने सामाजिक सर्वहरा आर्थात माजीअस्पृश्य जाती व अनुसूचित जमातींच्या जगण्यावर एवढे नियंत्रण मिळविले होते की ते फक्त मरणार नाहीत याची ते निकृष्ट दक्षता घ्यायचे.मग हा वर्ग निर्णयप्रक्रियेत येने हे महापापी स्वप्न.आज लोकशाही आली पण या लोकशाहीत नवी जातीव्यवस्था,अस्पृश्यता अदृश्य स्वरुपात वावरतेच.या सामाजिक सर्वहरा वर्गातुन पुढे आलेल्या नेतृत्वांना उच्चजातवर्गीय पक्ष पार्ट्या हसण्याचा विषय बनवतात.त्या नेतृत्वाने निर्णयप्रक्रियेत येने त्यांना हास्यास्पद वाटते.या मिश्किल हसण्यात "यांची काय औकात" हे निर्देश असतात.ही औकात ते जन्मावर आधारलेल्या निकषांवर काढतात.कारण गुणवत्तेत सामाजिक सर्वहरा वर्गच वरचढ ठरताना दिसतो. म्हणून भारतीय राजकारण हे जातीग्रस्त असल्यामुळे उच्चजातवर्गीय नेत्यांवर टिका होताना आरेकारे वगैरे फारसे होत नाही तर माजीअस्पृश्य जाती व अनुसूचित जामातींच्या नेत्यांवर टिका होताना आरेकारे तर होतेच प्रसंगी हल्ले सुद्धा केले जातात.भारतीय राजकारणात तर सामाजिक सर्वहरांच्या नेतृत्वाला जोडे उचलायला लावण्याचे प्रयोग सुद्धा झालेले आहेत.साम्राज्यशाही कंट्रोल करत जाणाऱ्या ब्राम्हो भांडवली राजकारणावर सध्या बनिया भांडवलदार,ब्राम्हणी बुद्धीजीवी तथा उच्चवर्गीय मिरासदार शेतकरी जातींचा कब्जा आहे.ही त्यांची अभेद युती आहे. ती तुमच्या एकाच निवडणूकीत आणि एकाच प्रयोगाने तुटणे असंभव आहे.
*******************************
2)शेतकरी जातीतुन राजकीय क्षेत्रात गेलेले धनदांडगे हे ज्या त्या जातीतले सर्वहरा नसून उच्चभ्रू मिरासदार असल्यामुळे ते शेतकरी जातींचे सच्चे लिडर ठरु शकत नाहीत.म्हणून आपन पहात आहोत की आलीकडील काही वर्षांत शेतकरी जातवर्गीयांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली आहे.आणि या उलट शेतकरी जातींचे नेते दिवसेंदिवस प्रचंड श्रीमंत होताना दिसत आहेत.शेतमालाचा भाव ठरवताना,बजेट ठरवताना शेतकऱ्यांचेच नेते मुख्य सूत्रधार असूनही ते शेतकऱ्यांची मातीच करतात.म्हणून शेतकरी जातीत दोन वर्ग बनत असल्याचे चित्र लवकरच क्लिअर होनार आहे.पहिला वर्ग म्हणजे उच्चभ्रू मिरासदार राजकारणी आणि दुसरा म्हणजे आर्थिक सर्वहरा वर्ग.शेतकरी जातींना राजकीय क्षेत्रात आर्थिक सर्वहरांचे नेतृत्व म्हणून पुर्वीचे श्रीमंत असलेले सजातीय पर्याय सोडुन देवून नवे तथा सर्वहराप्रधान पर्याय निवडावे लागतील.आपल्याच सारख्या समान दुख,पिडन असणाऱ्या इतर जातवर्गीयांशी मैत्री करावी लागेल.आणि सामाजिक सर्वहरा वर्गातले बुद्धीजीवी स्विकारावे लागतील.
#आर्थीक_सर्वहरा वर्गीय नेतृत्व स्टार्च केलेल्या कपड्यांतील ग्ल्यामरमधे जगनारे असेल की मातींचे लेने अंगभर लेवून नेतृत्व करनारे असेल ?
ही वेळ शेतकऱ्यांनी आपले नेतृत्व ठरवायची आहे.
शेतकरी जातीतील नेतृत्वात जातवर्गीय स्तरिकरण करुन घेण्यासाठी वाट्टेल ती तयारी आणि धडपड उपजत आसल्याने त्यांचे लढे तडीस जात नाहीत.. या नेतृत्वाला भांडवली झगमगाटाचे प्रचंड आकर्षण आहे.
या आरिष्ठ्यात आडकलेली शेतकरी चळवळ आणि राजकारण अंतर्गत जातवर्गीय लढ्याची भेदक रेषा स्पष्ट उभी केल्याशिवाय बाहेर निघु शकत नाही.
*******************************
3) भारतीय सरंजामशाही वर्गीय नसून जातीय असल्याने तरिही वर्गीय भुमीकेतून उभे रहाणाऱ्या डाव्या चळवळींचा जातीग्रस्त राजकारणाने दारुण पराभव केला आहे.यातून जातीअंत झाल्याशिवाय वर्ग बननार नाहीत किंवा जातवर्गीय लढा एकत्रच लढावा लागेल,अशा स्वरुपाच्या बऱ्याच मुद्द्यांवर आलीकडे डाव्या तथा पुरोगामी पक्षांचे एकमत झाल्याचे दिसून येत आहे.तरिही आज जातवर्गस्त्रीदास्यांत ही प्रमुख समस्या असतानाही डाव्या आणि पुरोगामी पक्ष पार्ट्यांना याचा कसा काय विसर पडतो हा महत्वाचा प्रश्न आहे.कारण आज घडीला कुठल्याही पक्षाच्या आजेंड्यावर हा जातवर्गस्त्रीदास्यांताचा गंभीर मुद्दा प्रमुख म्हणून घेतलेला दिसत नाही.फुले-शाहु-आंबेडकरवादी विचारांचे पुरोगामी पक्ष असोत किंवा मार्क्स-लेनीनवादी डावे पक्ष असोत हे सर्वच पक्ष उच्चजातवर्गीय तथा ब्राम्हो भांडवली पक्षीय ढाच्याला कॉपी करताना दिसत आहेत.भव्य मोठे स्टेज लावून माणसांची राजकीय जत्रा भरवण्याची पध्दती सर्वहरांच्यासाठी राजकारण करणाऱ्याना करता येणार नाही.सर्वहरांचे समाजमन राजकीय बनवताना ते लढे,मोर्चे, आंदोलने याद्वारेचे बनवावे लागते.राजकीय मेळावे हे जनतेला काहीच न देण्यासाठी उच्चजातवर्गीय पॅटर्नवर भरवले जातात.यात फक्त आश्वासनांची भाषणे होतात.
ब्राम्हो भांडवली पक्षामध्ये कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्यांना गुणवत्तेच्या आधारे पक्षात नेतृत्व किंवा स्थान मिळत नाही.तर जातीच्या तथा संख्येच्या आधारे जागा,स्थान,चेहरा निर्धारित केला जातो.त्यासाठी त्यांच्या जातीय सेल असतात.जसे दलित सेल,मागासवर्गीय सेल,अल्पसंख्यांक सेल,आदी.अगदी याच पॅटर्नवर पुरोगामी,डाव्या पक्षांमधे जातींच्या सेल नसतील परंतु जातींचे नेते,जातवार प्रतिनिधी म्हणून बसवले जातात.शिवाय ब्यानरवर सुद्धा जातवार महापुरुषांचे फोटो लावले जातात.म्हणजे जात कायम ठेवून हा प्रकार चालु असतो.ज्या पक्षांना प्रतिगामी म्हणून सतत विरोध चालु असतो त्याच पक्षांचे सर्वकाही कॉपी करता करता पुरोगामी पक्ष अगदी घराणेशाही सुद्धा स्विकारताना दिसत आहेत.
पुरोगामी चळवळीतील सर्वहरा तरुण आणि स्त्रीया कितीकाळ पक्षप्रमुखांचा जयजयकार करणार ? कितीकाळ साहेब साहेब करत सिल्फी काढत फिरणार किंवा सतरंज्या उचलनार ?
पुरोगामी किंवा डाव्या पक्षप्रमुखांनी आपल्या पक्षातून किती नवे नेतृत्व तयार केले आहेत ? सर्वहरांच्या चळवळीत बुद्धीजीवी बनण्याची प्रक्रिया चांगली आहे.परंतु राजकीय नेतृत्व न बनु देण्यात पुरोगामी आणि डावे पक्षप्रमुखच जबाबदार राहिलेले आहेत.राजकीय नेतृत्व म्हणून तरुणांना पुढे येण्यापासून प्रतिगामी पक्षाप्रमाणेच पुरोगामी तथा डाव्या पक्षानीही रोखलेले आहे.म्हणजे कार्यकर्त्यांनी कार्यकर्ताच रहावे नेतृत्व करत राजकारणी बनु नये.हा तरुणांचा कोंडमारा देशासाठीही नुकसानदायकच बनला आहे.
********************************
४)भारतीय राजकारणात प्रतिगामी पक्ष पार्ट्यांमध्ये स्त्री अवहेलना,शोषण, पिडण हे तर धर्मसंम्मत आहे.पण पुरोगामी म्हणून नवी व्यवस्था अनुपहाणाऱ्या पक्ष पार्ट्यांमध्ये स्त्रीवादी भूमिका तरी कोनत्या धड आणि चांगल्या आहेत.पुरोगामी पक्षांमधे स्त्रीला स्वताची राजकीय भूमिका आहे का ? तिला स्वताचे मत आहे का ? पुरोगामी तथा डाव्या पक्षांच्या अजेंड्यावर स्त्रीवादी तथा शोषण पिडन थांबवणारे किती मुद्दे आपल्याला ठळक दिसतात ?आपल्या स्टेजवर बाई दिसावी म्हणून बियाण्या पुरत्या एक दोन स्त्रीया स्टेजवर ठेवण्या पलीकडे पुरोगामी पक्ष पुढे जावु शकलेले नाहीत.त्याचे कारण म्हणजे भारतीय पुरोगामी चळवळी पुरुषवर्चस्ववादी एकप्रवाही आहेत.राजकारणात ज्या चार दोन पुरोगामी स्त्रीया पुढे आलेल्या दिसतात त्यांचाही पुरुष करून त्यांना पुढे आनलेले असते.ती बाई नसते एक प्रकारचा गडीच असतो.पुरुषी हावभाव आणि पुरुषी बोली बोलणारी राजकारणी बाई स्त्रीयांना न्याय देवु शकत नाही.
थोडक्यात काय जातीजातींचे कडबोळे उभे करुन त्या त्या जातीचे प्रतिनिधी घेवून एखादवेळा सत्ता येइल पन ती दीर्घकाळ टिकनार नाही.जातीजोडो नव्हे जातीअंत आणि पुरुषवर्चस्ववादी स्त्रीवाद नव्हे तर स्त्रीवादी स्त्रीवाद हवा आहे.तरच भारतीय पुरोगामी राजकारण यशस्वी राहिल.प्रतिगामी आणि पुरोगामी वर्गातील सिमारेषा स्पष्ट उभी राहिली पाहिजे.
पुरोगामी पक्षातील वक्ते,समीक्षक,प्रसिद्धीप्रमुख तथा ट्रोलर यांना प्रतिगामी पक्षांवर टिका करायला काहिच मिळत नसेल तेव्हा ते प्रतिगामी पक्षातील स्त्रीयांना टार्गेट करतात किंवा राजकारणात नसलेल्या राजकारण्यांच्या बायकांनाही लक्ष बनवले जाते.हिन दर्जाची भाषा वापरली जाते.आशा वेळेला पुरोगामी पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपल्याच ट्रोलरला आवरताना दिसत नाहीत.परिणामी आपलेही राजकारण सेम ब्राम्हणी प्रतिगाम्यांप्रमाणेच अन्यायकारक विषमतावादी बनते.
मागच्या निवडणुकांमध्ये विदर्भातील एका चांगल्या राजकारण्याच्या बायकोला त्या गरोदर असतानाचा फोटो सोशलमेडियात फिरवून ट्रोल करण्यात आले होते.असेच विद्यमान मुख्यमंत्र्याची बायको राजकारणात नसूनही त्या टार्गेट झाल्या त्या पुरोगाम्यांकडुनच.नुकतीच एक पुरोगामी समाजसेविका प्रतिगामी पक्षात गेली तेव्हा पुरोगामी पक्षातील ग्राउंडवरील कार्यकर्त्यांनी अत्यंत हिन शब्दात शिव्या वगैरे देवून त्या महिलेला टार्गेट केले.अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्याद्वारे पुरुषवर्चस्ववादी पुरोगामी राजकारण आपल्याला दिसून येइल.म्हणजे स्त्रीयांना रिअल प्रतिनिधित्व नाही,सक्रिय सहभाग नाही आणि आदबिची वागणुकही नाही.मग कसा काय करणार स्त्रीदास्यांत ?
ग्रामीण महिलेचे भयानक पिडन चालू आहे त्यावर कुठले पक्ष काम करत आहेत ? तिच्या श्रमाला दुय्यम दर्जा व हिन भाव आहेत. त्यावर कोनत्या पक्षाने गांभीर्याने घ्यायचे ठरवले आहे ?
*******************************
५)भारतीय पुरोगामी तथा डाव्या पक्ष संघटना अजूनही लोकमन क्याच करु शकलेल्या नाहीत.त्यांच्या जीवनात मोठा बदल होइल असा आशावाद सुद्धा ते निर्माण करु शकलेले नाहीत.लोकांना स्वयंस्फुर्त वाटायला हवे की हाच पक्ष का सत्तेत यावा.लोकांनी तनमनधनाने मदत करावी आसा पक्ष अजुनही भारतीय क्रांतीच्या क्षितीजावरही दिसत नाही.त्यासाठी लोकमन जिंकणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक आघाड्या आधी मजबूत कराव्या लागतात.भारतात धर्मसत्ता राजसत्तेला लगाम घालून हवे तसी चालवते.याला ग्रामसीच्या भाषेत सांस्कृतिक अधिपत्यवाद म्हणतात.पुरोगामी पक्ष संघटनांचा सांस्कृतिक आधिपत्यवाद मजबूत झाल्याशिवाय कुठलीही राजकीय सत्ता येनार नाही.यासाठी पर्यायी सांस्कृतिक राजकारण करण्यासाठी,तेवढा वेळ देण्यासाठी पुरोगामी पक्ष तयार नाहीत.त्यामुळे ब्राम्हणी पक्ष पार्ट्या अजुन मजबूत होताना तुम्हाला दिसत आहेत.हिंदुत्वाची सांस्कृतिक महाआघाडी ज्या प्रतिगाम्यांच्या ताब्यात आहे,त्यांचे सध्यातरी कुनीही काहीही वाकडे करु शकत नाही.हे थांबवण्यासाठी सांस्कृतिक लढाई आधी लढावी लागेल.मग दीर्घकालीन राजसत्तेचा मार्ग मोकळा होइल.विविध जातवर्गीयांना जोडनारे सामाईक दुवे घेवून सांस्कृतिक राजकारणाची सुरुवात होऊ शकते.पन वेळ कुणी द्यायचा ? हल्ली तर पुरोगामी पक्षप्रमुखांनी ठेवलेले बुद्धीजीवी साहेबच कसे सर्वहरांचे अंतिम उद्धारकर्ते असल्याचा भास निर्माण करताना दिसत आहेत.प्रत्येक पुरोगामी पक्षांचा बहुजनवाद स्वजातीकेंद्रित आहे.प्रत्येकाचा साहेब अनअपडेटेड कार्यप्रणाली घेवून राजकीय गणिते मांडत आहे.बुद्धीजीवी म्हणून घेनारे वैचारिक बनलेले कोनत्या साहेबाकडे चाकरी करायला जायचे याच्या तयारीत आहेत.आणि प्रत्येकाचे म्हनने आहे ते प्रतिगामी आहेत आम्हीच तेवढे पुरोगामी.
म्हणजे ब्राम्हणी भांडवली तथा सरंजामी उच्चभ्रू वर्गाची सत्ता घालवून नव्या जातजमातवादी ब्राम्हणी बुद्धीजीवी तथा पुरुषवर्चस्ववाद्यांची सत्ता आनायची आहे.हा नवा rशाहाणपना काही काळ आपल्या सर्वांना करायचा आहे.
*******************************
६)ब्राम्हणी भांडवली राजवटीत तोंडदाबुन लाथाबुक्यांचा मारा चालू असताना गांगरुन गेलाला सर्वहरा नेतृत्व नायकाची वाट पहात आहे . आणि ज्यांनी नेतृत्व करायचे आहे ते ब्राम्हणी भांडवली व्यवस्थेचे दलाल बनून सर्वहरा वर्गाला फसवत आहेत . सामाजिक सर्वहरांतले ब्राम्हणी बुद्धीजीवी आपल्या बुद्धीचा वापर व्याभिचारी वृत्तीने करत आहेत . सोईचे तत्वज्ञान निर्माण करुन त्यांनी क्रांतीस उद्विक्त परिस्थिती रोखून धरलेली आहे . हा ब्राम्हणी बुद्धीजीवी वर्ग साहित्य निर्मीती तर करतच नाही उलट थोडेफार कालाकारी आदाकारी निर्माण केली तर ती व्यवस्थेचे पाय चाटनारी असते .म्हणून व्यवस्था अशांना दरमहा लाखो रुपायांच्या पगारी देते . लोकमनाचा ठाव घेनारा विद्रोह व्यक्त करनारे नवे बुद्धीजीवी आजुन बनायचे आहेत ..
आर्थिक सर्वहरा वर्गातून उच्चभ्रू मिरासदार शेतकरी तथा बनिया भांडवलदार मस्तपैकी गरिब शेतकऱ्यांचे ढेकनासारखे शोषण करत आहेत . तुम्ही मरनार पन हे तुम्हालाही कळनार नाही .यात आर्थिक सर्वहरा वर्ग बनु घातलेले गरिब शेतकरी मात्र आशेने या पांढऱ्या कपड्यांतील माजलेल्या स्वजातीय राजकारणी वर्गाकडे मुक्तीदाता म्हणून पहात आहेत .पन हा भ्रम आहे . आजुन नवे लिडर , आर्थिक सर्वहरा वर्गांचे मुक्तीदाते बनायचे आहेत ....
सामाजिक सर्वहरा आणि आर्थिक सर्वहरा वर्गबनल्या नंतर दोनही वर्गाचे मुक्तीदाते खरी मैदानी लढाई लढतील ..
सौमावादी मुक्तीदात्यांन्नो वाट पहात आहे सर्वहरा वर्ग त्यांच्या मुक्तीची ... सर्वंकष मुक्तीची .. जातवर्गीयस्त्रीदास्यांताची.
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment