♦#चित्रपटांतील_ब्राम्हणी_दहशतवाद♦
आपन हळद रुसली कुंकु हसले हा मराठी चित्रपट पाहिला आहे काय ? या मराठी चित्रपटात नायकाला दिलेले नाव #नामदेव आहे. तो साधाभोळा आहे , शिवाय शारीरिक अपंगत्व आलेला आहे. आख्खे गाव त्याला नाम्या म्हनते. नामदेव नावाचीच माणसे साधीभोळी व्यंग असनारीच का बरे ?
आलीकडले उदाहरण घ्यायचे झाल्यास बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातही नायकाचे नाव *नामदेव* साधाभोळा आणि वर विसरभोळा म्हणजे मानसिक व्यंग असलेला व्यक्ती . आख्खे गाव त्याला नाम्या म्हनते .#नाम्या नाम्या म्हणून पुन्हा पुन्हा #हिनत्वदर्शक उच्चार का बरे ?
अशा #चित्रपटांमधे अब्राम्हणी साधुसंताचीच नावे का बरे वापरली जातात ? तुक्या हे नाव तर हिंदी चित्रपटांत सुद्धा वापरून झालेले आहे. म्हणजे नामदेव तुकारामांवरील राग द्वेष ब्राम्हणी व्यवस्था अशा पद्धतीने तर व्यक्त करत नाही ना ? माझा तर एक आक्षेप असाही आहे की छोटा भिम या सिरीअलीला छोटा भिमच नाव का दिले गेले आहे ? कुनीतरी मोठा भीम झालेला रुचलेले, पचलेले दिसत नाही वाटतं . जिवा शिवाची बैलजोडं असेच गाणे का असते बरे ? सावरकर आगरकरांची बैलजोडं असे नावे का नसतात . जिवाजी महाले शिवाजी महाराजांची आस्सल जोडी आवडलेली दिसत नाही वाटतं .म्हणून मेंदूतून असली भडास काढली जाते . सगळ्या हिंदी मराठी चित्रपटांतील ब्याकग्राउंडच्या भिंती कुठल्या प्रतिकांनी सजलेल्या असतात ते बघा ? सुज्ञांना जास्त काय सांगावे . एका चित्रपटात गांधीच्या बाजुला गोळवळकरांचा फोटो लावलेला होता . ज्या गोळवळकराच्या विचारधारेच्या माणसाने गांधीला मारले त्याच गांधीच्या बाजुला गुरुजी वाह !
चिमणीपाखरं चित्रपट आठवतोय ? कुठल्या समस्येवर आहे ? ब्लडक्यांसर . आणि दुनियादारी आठवतो ? कुठली समस्या आहे ? तिच ब्लडक्यांसर म्हणजे ब्राम्हणांच्या घरातल्या समस्येवर चक्क विस विस तिस तीस वर्षे पुन्हा पुन्हा चित्रपट काढनार . काकस्पर्शची समस्या कुनाच्या घरातील आहे ? आणि आऊटडेटेड झालेल्या समस्येवर चित्रपट काढुन आम्ही सुद्धा पुरोगामी असल्याचा आव कुणासाठी ? बायका बोडक्या करणे ही समस्या आमची नव्हेच .
ही ब्राम्हणी फिल्मइंडस्ट्री कधीही अस्पृश्यता , जातीव्यवस्था स्त्रीदास्यत्व , वर्गीय शोषन , बेरोजगारी , शेतमजूरांचे जीने या समस्यांवर चित्रपट काढत नाही . *आर्त* या चित्रपटाच्या टिमपैकी एका सदस्याशी माझी चर्चा झाली ते म्हनाले आम्ही *आर्त* हा जातपंचायत व स्त्रीदास्यत्वावर चित्रपट बनवला तर त्यांचे सिनेमाग्रह तो चित्रपट लावायला पन तयार नाहीत .
दशक्रिया कांदबरीचे लेखक अत्यंत प्रामाणिकरण आहेत.त्यांच्याबद्दल माझ्या मनत थोडेही किल्मीश पाप नाही.दशक्रिया कांदबरीवर चित्रपट आला मला येथे वेगळ्या अंगाने चर्चा करायची आहे ती अशी की दशक्रिया हा ब्राम्हणांमधील अस्पृश्य ब्राम्हणावर तो चित्रपट आहे. किरवंत म्हणजे मसनवाट्यातील क्रियाकर्म करनारा हलका ब्राह्मण . म्हणजे ही देखील त्यांचीच समस्या. मग आमच्यातील इतर अस्पृश्यांच्या समस्या दखलपात्र नसतात का ? इतर अस्पृश्य हे अस्पृश्य नाहीत का ? किरवंत ह्या ब्राम्हणी आउटडेटेड समस्येवर चित्रपट बनवून असा कोनता मोठा तिर आपन मारत आहात ? वास्तविक मुद्दा प्राधान्यक्रमाचा आहे.इतर अस्पृश्यांच्या समस्या महत्वाच्या का वाटु नयेत.अस्पृश्यता आजही जीवंत आहे. बनवा चित्रपट. जातीव्यवस्था तर तुम्हीच आजही जिवंत ठेवली आहे .बनवा की एखादा पिक्चर . आरे संसार संसार सारख्या चित्रपटातून हिरो म्हणून लोकप्रिय झालेल्या कुलदीप पवार नावाच्या कलवंताला तुम्ही नेहमीच विलनचे रोल दिले , निळु फुले सारखा मोठा समाजसेवक तुम्ही घानेरडे विलनचे रोल देवून बदनाम केलात .
म्हणून आम्ही अब्राम्हणी कलावंत तुमची ब्राम्हणी व्यवस्था जाहीर नाकारत आहोत. तुमचे ब्राम्हणी चित्रपट तुम्हालाच लखलाभ.शरद पोंक्षेचे हे नथुराम बघा.त्या नथुरामला देव करा .. आता तेवढेच बाकी आहे .
नितीन सावंत , परभणी
प्रचारक
छंदांशी कला साहित्य महासभा
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment