१. जगण्याची नियमावली उच्चजातवर्गीय व्यवस्था बनवत असते.ती पाळता पाळता निम्नजातवर्गीयांची घुसमट होते.
नैतिक अनैतिकतेच्या कसोट्या उच्चजातवर्गी ठरवतात.काय नैतिक आणि काय अनैतिक हे वरचे ठरवनार.त्या नैतिक अनैतिकतेच्या शिक्षा आणि पुरस्कारही जात आणि तोंड बघूनठरते.सजातीय श्रीमंताने किंवा आपल्यापेक्षा वरच्या जातीच्याने केलेले महापाप माफ केले जाते.ते चव्हाट्यावर आनायचे धाडस समाजव्यवस्था करत नाही.पण
सजातीय गरीबांची किंवा आपल्यापेक्षा निम्नजातीयांची छोटीसी चुक सुद्धा टोकाच्या शिक्षेला तयार असते.कठोरातल्या कठोर शिक्षेचा अग्रह निम्नजातवर्गीयांसाठी असतो.
*********************************
२.बलात्कार हा शब्द संविधान आणि लोकशाही आल्यानंतर सर्वाधिक उच्चारला गेला आहे.लोकशाही येण्याआधी सगळं काही धर्मसंम्मत होतं.सन्माननीय अपवाद वगळता लोकशाही येण्याआधी बाई कितीही ओरडली,दाद मागायला कुनाच्या दारात गेली तरी बलात्कार नव्हेच.
*********************************
३.नैतिक अनैतिकतेच्या कसोट्या हल्ली श्रीमंतीवर पद प्रतिष्ठेवर बदललेल्या आहेत.जेल भोगुन आलेला,भ्रष्टाचार करतो हे जगजाहीर असनारा,लुटनारा,श्रीमंत तथा राजकारणी आल्यानंतर त्या अप्रामाणिकाच्या स्वागतासाठी लोक उभे रहातात तर प्रामाणिक असनारा सच्या मनाचा,तत्वांना माननारा,गरिब आल्यानंतर मात्र त्याच्या आदरार्थ उठण्याची प्रथा नाही असेल तर हल्ली मोडली म्हनावी लागेल.
*********************************
४.लहानपणी भांडणात कुणीच कुनाला ऐकनारे नसेल,एकमेकांना भारी पडनारे असतील आणि दोघेही समबळ असतील तर मारामारी ऐवजी आया बहिण काढुन हतापायी धकवली जाते.आय बहीण काढली की दोन्हीही पार्ट्या मारामारीपेक्षा जास्त घायाळ होतात.हतबल होतात.हा भांडणांतला मानसशास्त्रीय नियम आता राजकारणात आनला गेला आहे.
शेवटी काय बाई वरुन टिका पुरुषवर्चस्ववादी मानसिकता बळकट करत जानारे आहे.
********************************
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment