Friday, 23 August 2019

ll औलिया ते आवली ll

#औलिया म्हणजे 'अल्लाह वाला' अर्थात अल्लाह का दोस्त.#अवलिया शब्दाचे साधु,संत,#फकिर,#पिर असे विविध अर्थ निघतात.

हा शब्द भरतात सुफींच्या आगमनामुळे आला.स्पेशली सुफींनाच औलिया म्हटले गेले आहे.या सुफींच्या चालिरीती,वर्तन बघून लोक अवाक होत असत.या सुफींची साधना आणि तत्वज्ञानातील उंचीमुळे सामन्य लोक त्यांच्या वागणूकीला हटके वर्तन करणारे लोक म्हनत असत.यांचे इश्वराशी लाडिक भांडण चाले.श्रीमंतांना,राजेमहाराजांना हे औलिया फारसा मानापमान देत नसत.किंवा आपल्या रहाण्याच्या अश्रमाबाहेर तासंतास उभे करत असत.हे लोक एकांतात रहात.संपत्ती वगैरेंचा बिलकुल लोभ नसे.

मराठीत हा शब्द दाखल होताना औलियाचे #अवली बनुन आला.नंतरच्या काळात हा अवली शब्द आगावु वर्तन करणाऱ्यासाठी वापरला जायला लागला.मराठवाड्यात आगाऊपणा करणाऱ्याला लै आवली पोरगं आहे म्हणतात.
पुढे ब्राम्हणी साहित्याकांनी तर कहरच केला.तुकोबारायांच्या बायकोला अगाऊ दाखवण्यासाठी त्यांनी जिजाबाई हे नाव वापरणे बंद करुन आवली हे नाव कायमचे चिकटवले.म्हणजे जिजाबाई नवऱ्याला मारते,भांडखोर आहे,फुटकळ तोंडाची आहे अशा खोट्या,खोडसाळ आणि विकृत अफवा ब्राम्हणी लेखक साहित्तीकांनी पसरवल्या.आणि जिजाबाईं हे नाव वापरणे बंद करुन,अवली हे नाव अधिक रुढ केले.आवली हे नाव ठेवले होते का ? त्याकाळी तुकोबारायांच्या घरात वापरले जाई का ?हे नाव जन्मनाव आहे का ? हे शोधले पाहिजे.

आशा पध्दतीने अवली शब्दाने इथपर्यंत प्रवास केला.औलिया या सुंदर #सुफी शब्दाचे अवली शब्दात विकृतीकरण करण्यात आले.औलिया शब्दापासून औलाद हा शब्द सुद्धा आलेला आहे.अलीकडे काय अवलाद हाय ही ! कडु #अवलाद हाय ते ! अशा शब्दातूनही औलाद शब्द बदनामीच्या वाटेवर आहे.

#भाषेचे_ब्राम्हणीकारण_आणि_विकृतीकरण_असे_होते.

नितीन सावंत परभणी
9970744142

No comments:

Post a Comment