♦#सामाजिक_चळवळींचे_आकलन♦
भारतीय इतिहासाला एकामागोमाग एक अशा गौरवशाली महापुरुष , तत्ववेत्ते , विचारवंतांची परंपरा असतानाही याच भारतात आतिरेकी भक्तवर्ग वेगाने तयार होत असतो. तर्क करा म्हणणाऱ्या , स्वताच्या डोक्याचा वापर करा म्हणणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीतही पुढे भक्त वर्गाला चिकीत्सा तर्कच चालत नाही . तो स्वताही करत नाही आणि दुसऱ्यालाही करु देत नाही . हे जरा विचित्रच आहे . पन हे सत्य आहे .
आलीकडल्या काळात परिवर्तनवादी चळवळींचेही तसेच होत चालेले आहे. महापुरुष जावून शतके उलटत आलीत, पन त्यांचे विधाने घेवूनच भक्त वर्ग लढत आहे . नवे #संशोधन काडीचेही नाही.आजच्या नव्या समस्यांवर उपाय शोधायला हे जुण्या ग्रंथात डोकावतात . एकमेकांच्या लिहीलेले पुस्तकांवरुन हे समाजव्यवस्थेचे आकलन ठरवतात . आणि मिरवतात . हे सर्व कसे प्रचारकीय थाटत चालू आसते. आजचे प्रबोधन परिवर्तन हे प्रचारकीय थाटाचेच आहे .जे वाळुत मुतले फेस ना पाणी या स्वरुपाचे आहे .
गावगाड्याचे आकलन करनारी फारच कमी पुस्तके चळवळीत सापडतील . जी सापडतील ती ही खेड्यातल्यांना वेडे ठरवनारी . भटाळलेले म्हननारी .
विचार करा तुमची या महिण्याची पगार जरा उशीरा झाली तर तुम्हाला वेडे व्हायची वेळ येते . दोन दोन तिन तीन महिणे पगार नसेल तर संपूर्ण घरात चिडचिडेपणा येतो , भांडणे होतात . मग त्या #शेतकऱ्यांना एवढा सामंजस्यपणा कुठून येतो की सहा सहा महिणे घरात पिक येई पर्यंत तो न कुथता न भांडता निट घर संसार चालवतो . आणि सहा महिण्याला तुमच्या पगारी सारखी पिक येण्याची ग्यारेंटी नसतानाही मटका लावल्याप्रणे मातीत पैसे घालण्याचे धाडस कशाच्या , कुठल्या शक्तीच्या जोरावर शेतकरी करत असतो . त्याला शहरी लोक वेडे म्हणतात . वेडे शेतकरी नाही . पगार न झाल्यावर अस्वस्थ होनारे वेडे .
आता हे गावकी वर्णन , त्या गावगाड्यातील आर्थकारण , एकमेकांचे सामाजिक संबंध हे सर्व अभ्यासून नवी सुत्रे निर्माण करुन चळवळी पुढे नेण्याएवजी परिवर्तनवादी चळवळीत मसिहागिरीसाठी भांडणे लागली आहेत .चार पुस्तके वाचुन पुस्तकी शानपन आलेल्यांना सर्व खेडुतांनी आमचे मार्गदर्शन घ्यावे असे वाटते . पन तुमच्या अभ्यासक्षेत्रात त्या खेडुताचे जीवन सुखकर करणारे काहीच नसते तर तुम्ही काय ढेकळाचे त्यांचे मार्गदाते मुक्तीदाते होनार आहात .
त्यासाठी जमीनीवर राबावे लागते . लोकांत मिसळावे लागते. आसे न करता तुमच्या चळवळींचे आकलन पुतळे चौक आणि आस्मितांपुरतेच रहाते . भिडे गुरुजींनी परकायाप्रवेशाची कला आत्मसात करुन हजारो तरुणांत प्रवेश केला आहे . एकप्रकारचा संघाचा कार्यकर्ता बदलवता येइल पन भिडे गुरुजींचा कार्यकर्ता बदलवणे मुश्किल . परिवर्तनवादी चळवळीत आसे एखादे उदाहरण देता येइल काय ? जमीनीवर राहून लोक जोडून परकायाप्रवेश करुन हजारो तरुण आपल्याकडे खिचनारा आपल्यात कोणी आहे का ? नसेल तर नुसते भिडे गुरुजींना fb / whatsup ला झोडपून हाती काय लागणार ?
गजहब तर तिथे होती की मूठभर मते असणारा शेडुल्ड कास्टचा वर्ग , त्यातले तरुण निवडनुका जवळ यायच्या आधिच आपल्यातल्या ढीगभर नेत्यांची नावे पुढे करून रिअल हिरो कोन हे विचारत आहेत . तुम्ही सगळेजन एकत्र आलात तरी संपूर्ण सत्ता अशक्य .
#परिवर्तनवादी_चळवळींत नास्तिकवाद्यांचा तर फार उत आला आहे . आस्तिक नास्तिकवादाच्या डिव्हायडेशनमधे लाखो आस्तिक स्वताच्याच विरोधी उभे करण्याचे काम शाहाण्या पुरोगाम्यांनी केले आहे . तुम्हाला सत्तेत येण्यासाठी मते हवीत की आख्खा देश #नास्तिक बनवायचा आहे .?? सत्ता हवी आसेल तर आस्तिक स्विकारावे लागतील . सर्वच देशवासीयांना नास्तिक बनवून सत्ता आनायला तुम्हाला पंन्नास वर्षे तरी लावतील . तुम्ही लोक फुलेंना मानतात ना ? मग ते एकेश्वरवादी होते . ते निर्मीक मानत . सर्व संत एकेश्वरवादी होते . आपल्याला यात काही प्रोब्लेम असण्याचे कारण नाही . पन हे परिवर्तनवाद्यांना सहजासहजी रुचनार नाही . यामुळे स्वताचेच आईबाप आणि कुटुंबीय विरोधात गेलेले सुद्धा चालतील .
आपल्याच जातीतले दलाल आपल्या फसवत आहेत याचे आकलन आजूनही कुठल्याही जातीला आलेले नाही. म्हणून प्रत्येक जातीत उच्चभ्रू वर्गाच्या मांडिला मांडी लावून बसण्यासाठी नवनवे दलाल लॉंच होत आहेत . आणि सर्वहरा ( आर्थिक, सामाजिक ) वर्ग मात्र हा भले करेल का तो भले करेल म्हणून बिचारा डोळे लावून बसला आहे .
आशावेळेला तुम्हाला गरज भासते नव्या आकलनाच्या पद्धतींची . या पद्धती कॉ शरद पाटील यांनी दिलेल्या आहेत. त्याद्वारे आपन टाकलेल्या सापळ्यांत आडकण्यापासुन नक्की वाचू शकतो .
नितीन सावंत परभणी ..
9970744142
No comments:
Post a Comment