वैदिक - अवैदिक ऐवजी ब्राम्हणी - अब्राम्हणी
अवैदिक म्हणजे कोण? काय? हे समजून घेण्यासाठी वैदिकचा अर्थ समजून घ्यावा लागेल. वैदिकचा अर्थ वेदाचा, वेदासंबंधी असा होतो. वेद म्हणजे श्रुती, पठणाने जीवंत ठेवलेला इतिहास. ऋग्वेदामध्ये कोणत्याही पुरुषसूक्त (जे प्रक्षिप्त आहे) सोडता आजच्या सांस्कृतिक संघर्षासाठी, अस्मितेची लढाई लढण्याचे कोणतेही सूत्र दिसत नाही. हि पहिली गोष्ट.
दुसरी बाब हि कि अाज किंवा वेदपूर्वकाळापासून सांस्कृतिक लढाई लढणारे हे वेगळे होते आणि तो लढा संहिताबंद करणारे वेगळे होते.
वैदिकपूर्वकाळापासून एक संघर्ष दोन गणार्धामध्ये होत आल्याचे काॅ. शपांनी स्पष्ट केले आहे. तो म्हणजे क्षत्र विरूद्ध ब्रम्हन. ज्यांची स्वतःची श्रुती होती, तांत्रिकी. जीला छन्दाम्सी म्हटले गेले आहे.
क्षत्र नियंत्रित व्दैवर्णी, त्रैवर्णी गणसमाजाच्या नंतर चातुर्वर्ण्यापासून म्हणजेच उर्वशी पुरुरव्यापासून ब्राम्हण नियंत्रित परंपरा चालू होते अाणि उर्वशी वरुणापासून अब्राम्हणी प्रवाह जो क्षत्र नियंत्रित राहतो. अगदी शिवकाळापर्यंत.
हे अब्राम्हणी प्रवाहाचे लढा लढणारे क्षत्र म्हणजे स्त्रिसत्ताक समाजाचे वारसदार, कृषक समाजाचे वारसदार, समतावादी गणसमाज होते.
अशा ब्राम्हणी विरूद्ध अब्राम्हणी सांस्कृतिक लढ्याचा स्पष्ट तपशील कवष ऐलूषच्या सांस्कृतिक लढ्याच्या घटनेने ऋग्वेदाने मांडून ठेवला आहे. काॅ. शपानी तो अापल्या ग्रंथात साधार मांडला आहे.
त्यामुळे लढणाऱ्यांचा म्हणजे ब्राम्हणी विरूद्ध अब्राम्हणी हे अस्सल संघर्षसुत्र जे काॅ. शपानी मांडले, ते घ्यावे. जे वैदिकपूर्वकाळापासूनचे आहे.
संहिता लिहणा-यांचा म्हणजे अभिजनांचा - वैदिक विरूद्ध अवैदिक हे प्रतिष्ठित संघर्षसूत्र सांस्कृतिक लढ्यासाठी, अस्मितेच्या लढ्यासाठी वापरु नये.
No comments:
Post a Comment