Tuesday, 29 March 2022

संत चोखोबाराय चरित्र : प्रकरण ११ वे. विध-अविंध कोणता हा प्रकार ?

 संत चोखोबाराय चरित्र : प्रकरण ११ वे. 

विध-अविंध कोणता हा प्रकार ?

अहो करुणाकरा रुख्मिणीवच्या वरा l उदारा धीरा पांडुरंगा ll 
काय म्या पामारे वानावे जानावे | न कळे कैसे गावे नाम तुमचे ll विध अविंध कोणता प्रकार | न नेनो कळे साचार मजलागी ll
चोखा म्हणे मज काहींच न कळे । उगाची मी लोळे महाद्वारी || 
                   - संत चोखोबाराय               

                            आपल्या इंद्रियांच्या आकलणाच्या मर्यादेत सर्वकाही जानुन असणारे चोखोबाराय ब्राम्हणी क्षेत्रातील वैदिकांच्या स्पर्श- अस्पर्श संकल्पनांना उपरोधीकपणे विंध - अविंध ही काय भनगड आहे असे विचारत आहेत ?  ब्राम्हणी, वैदिक व्यवस्थेने जन्माला घातलेली अस्पृश्यता संत चोखोबाराय चर्चेच्या पटलावर आनु पहात आहेत. मी अस्पृश्य असल्यामुळे मी पामर तुमचे काय गुण गाणार ?  आम्हाला धर्मशास्त्राने ते अधिकारच दिले नाहीत. त्यामुळे यांच्या धर्मसंकल्पना माझ्या आकलनाच्या पलिकडे आहेत. मी अपला विठ्ठला तुझी भक्ती करत महाद्वारातच लोळत आहे. तेवढेच माझ्या हातात आहे.यांचे स्पृश्य अस्पृश्य तत्वज्ञान माझ्या न समजण्यापलिकडे आहे.
                              माणुस म्हणून जगण्या इतपत चोखोबांचे आकलन चांगले होते. त्यांना विटाळ, स्पर्श- अस्पृश्यता कृत्रीम मानवी देन वाटे. म्हणून याद्वारे ते तत्कालीन परिस्थीत विज्ञानवादी होते. विटाळ, अस्पृश्यत देवाची देन असती तर चोखोबरायांनी त्याबद्दल कुरबुर किंवा तक्रार केली नसती. उलट ही तक्रार करण्यासाठीच तर  चोखोबारायांसह सर्व संतांनी विठ्ठल निवडला आहे. चोखोबारायांचे कवित्व माणुसकीचे हक्क अधिकार मागण्यासाठी आहे. भेदभावाच्या विरोधात चोखोबाराय तक्रार घेऊन उभे आहेत.भाषेच्या मर्यादा राखत देवालाही आहो जाहो आदराने बोलत चोखोबाराय नेहमी तत्कालीन समस्यांकडे लक्ष वेधायला भाग पाडतात.चोखोबाराय विज्ञानवादी नसते तर त्यांनी आहे ते निमूटपणे सहन केले असते.परंतू ते विठ्ठलाचा आधार घेवुन विज्ञानाचा अग्रह धरतात आणि भौतिकवादी समस्यांना इश्वरी देन न मानता त्या सोडवल्या जाव्यात म्हणून ते अग्रही रहातात.                          
                              हे धर्मपंडीत ज्या विटाळाच्या अस्पृश्यतेच्या नावे बोंबा मारत असतात त्यांना संत चोखोबारायांनी कोण बिना विटाळावे आहे, सर्वत्रच विटाळ आदिअंती असताना माझाच तेवढा विटाळ का व्हावा , असा सडेतोड प्रश्न त्यांनी केला आहे.
संत चोखोबाराय म्हणतात वेद, शास्त्रे, पुराणे, जीव,शिव, काया, ब्राम्हा  विष्णु, शंकर हे सर्व विटाळग्रस्तच आहेत ना. माणूस जन्मताना आणि मरतानाही विटाळातच असतो ना  मग विटाळ आदिअंती असताना माझाच तेवढा विटाळ का व्हावा ? 
या जगात कोण सोवळे भाणि कोण ओवळे आहे हा प्रश्न संत चोखोबारायांचा आहे. आणि जगात कोणीच सोवळा नाही. हे स्पष्टीकरण सुद्धा चोखोबारायांनीच दिले आहे. 
             एका अभंगात संत चोखोबाराय म्हणतात मला नवल वाटले बिना विटाळाचे कोणी हे का बरे ? 
                      वेद शास्त्रे, पुराणे आणि ब्रम्ह, विष्णु, महेशाची जाहीर चिकीत्सा करणे. धर्मग्रंथां ना विटाळग्रस्त म्हणणे विद्रोहाचे , बंडखोरीचे काम आहे . एवढा विद्रोह करणारा चोखोबा नकारात्मक मांडणी करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील अलिकडच्या लेखक साहितीकांना विद्रोही वाटू नये हे त्यांच्या आकलनाच्या मर्यादा म्हटल्या पाहिजेत. चोखोबा विद्रोही होते. उपलब्ध असणाऱ्या  अगदी थोड्या अभंगातही चोखोबांचा विद्रोह सापडतो. नष्ट केलेला आणि जतन न केला गेलेला अभंगसंग्रह तर नक्कीच विद्रोही असला पाहिजेत.चोखोबा बंडखोर होते.विद्रोही होते.
                  अस्पृश्याने तोंड उघडणे, अभंग लिहीणे, काव्य तयार करणे, संत मंडळात सहभागी होणे, धर्मग्रंथांवर प्रश्न निर्माण करणे, आपल्या बायकोला अभंग बनवायला शिकविणे, पोराला विद्रोही लिहू देने , गावची कामे करण्याऐवजी उच्चजातीयांच्या सांस्कृतिक राजकारणात हस्तक्षेप करणे , हा संत चोखोबारायांचा विद्रोह नव्हे काय ?  चोखोबा विद्रोही नसले असते तर ब्राह्मणांनी त्यांचा छळ  केला असता  का ? ते विद्रोही होते, म्हणूनच तर त्यांचा छळ झाला. त्यांना नदीपलीकडे का हकलून दिले गेले मग ? विद्रोही होते म्हणूनच ना.
     संत चोखोबारायांचा विद्रोह मांडला तो शंकरराव खरात यांनी. १४ एप्रिल २००२ ला त्यांनी 'चोखोबाचा विद्रोह'  नावाचे पुस्तक लिहून संत चोखोबारायांना न्याय दिला. त्यांनी लिहिलेल्या 'चोखोबाचा विद्रोह' या पुस्तकात ६ व्या क्रमांकाचे प्रकरण चोखोबाचा धर्मशास्त्राशी विद्रोह म्हणून लिहीले आहे.त्यांनी संत चोखोबांनी घेतलेल्या विद्रोही भूमिका विषद केलेल्या आहेत. 
                          धर्मशास्त्राला, पुराणाला, ब्रम्हाज्ञान्याला 'धिष्क' म्हणणारा अस्प्रश्यातला पहिला विद्रोही,  पहिला बंडखोर संत, संत चाखोबरायच होते.
                ज्यांच्यापोटी दया, क्षमा. शांती, नाही अशा ब्राम्हणांच्या तोंडुन आलेल्या ब्रम्हज्ञानाच्या गोष्टी फालतूच्या आहेत. मोठे ब्रम्हज्ञानाच्या गोष्टी सांगणारे अनुभवांत शुन्य असतात. असल्यांचे जगणे धिक्कारणीय आहे. 'थू' तुमच्या जिंदगाणीवर, हे विठ्ठला आता कोठवर तुझी आम्ही भिड धरायची ? माझ्याच वेळी नेमका तु कुठे गेलास, या आणि आशा अनेक शब्दांत चोखोबाराय आपला विद्रोह प्रगट करतात.
                   म्हणून संत चोखोबारायांकडे आणि त्यांच्या साहीत्त्याकडे पाहताना त्या काळातील परिस्थिती, वातावरण पहिल्यांदा आपण  समजुन घेतले पाहिजे. जाती व्यवस्थेच्या गावगाड्यात हिन मानलेल्या जातीतल्या व्यक्तीने गावकीची कामे नाकारून स्वतंत्र अभिव्यक्त होणे, कवित्व करणे निश्चीतच त्या काळाच्या मानाने मोठे काम आहे.आणि धाडसी भूमिका आहे.आजही गावगाड्यात लोकं जाहीररीत्या महारं माजलीत म्हणतात.गावचे महारवाडे मांगवाडे पेटवतात.त्या काळात किती धाडसी भूमिका संत चोखोबाराय घेत होते याचा आंदाज आपण बांधु शकतोत. 
                  चोखोबरायांचा स्वभाव विनयशील होता आणि करुणही होता, पण त्यांनी प्रस्थापित ब्राम्हणशहीतल्या कुठल्याही अमानवीय प्रथा परंपरेचा गौरव केला नाही की समर्थन केले नही. धर्मग्रंथ पुरोहीतशाही आणि देव सुध्दा त्यांनी चिकित्सेच्या कटघरात उभे केले होते. वैदिकांचा, शोषकांचा त्यांनी प्रचारही केला नाही की समर्थन सुद्धा केले नाही. चोखोबांनी बाजू घेतली ती उपेक्षितांची, वांचीतांची. त्यांनी नामदेवांचा विद्रोही बंडखोरीचा मार्ग निवडला. या विद्रोही बंडखोरीच्या मार्गवर त्यांचे अतोनात हाल झाले. धर्मग्रंथावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची किंमत त्यांना मोजावी लागली.कुटुंबाला सतत अपमानाला सामोरे जावे लागले.चोरीचे आळ घेतले गेले.तरिही संत चोखोबाराय आणि त्यांचे कुटुंब डगमगले नाही. 
                      चोखोबारांचा विद्रोह मुक्याचा टाहो आहे.या मुक्या व्यक्तिमत्वाची दखल फारसी कुनी घेतलेली नाही.त्यांना फार मोठा न्याय मिळाला असेही नाही.येथून पुढे तरी हा संत काळात गुडुप होनार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.चोखोबांचे साहित्य , त्यांचे काव्य समाजापुढे आनले पाहिजे. म्हणून गोरगरिबांच्या,सर्वहरांच्या, हिन दिन श्रमीकांच्या , बाजुने उभ्या असलेल्या महापुरूषांत चोखोबरायांचे नाव आदराने, अग्रहाने घ्यावे लागेल.माजी अस्पृश्य जातींचा पहिला विद्रोही नेता, सामाजीक सर्वहरांचे पहिले प्रेरणा प्रतिक म्हणुन चोखोबाराय अजरामर रहातील. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment