वाळलेल्या खोडालाही नवे धुमारे फुटतील .
जगात सर्वाधिक वेगाने भारताचे भांडवलिकरण चालु आहे.अगदीच सेंकद काट्यासारखे #भांडवलशाहीची_मुल्ये समाजमनावर दिवसरात्र फिरवणे चालु आहे.एकदा का ती #मुल्ये समाजस्विकृत झाली की मग सत्याची बाजु घेनारे देशद्रोही, गद्दार वगैरे.
पुर्वीला एखादे मुल्ये समाजात प्रस्थापित व्हायला दोन तिन पिढ्यांचा काळ लागायचा.पण आज मात्र अगदी कमी वेळात , काही तासांच्या आत सबंध देशाचा #माइंड_सेट करायचे प्रयोग भारतात झालेत.होताहेत.
टोकाची व्यवहारीकता आणि व्यक्तिस्वातंत्र्य बहाल करणारी भांडवलशाही #परार्थीकरणासह_परात्मतेची राख प्रत्येकाला पुसत जात आहे, याचे कुनालाही स्वयरसुतक नाही.
माथ्यावर चार गवऱ्या सुद्धा ठेवायला कुणी नसावे , शेवटचे पाणी पाजायला मुलगा असावा म्हणून केलेला उपद्व्याप शेवटी तो ही प्रेत दुरुन बघुन पळ काढनारा निघावा,सोयरीक ठरवताना ,लग्नसमारंभात सतत आडवी येनारी भाऊकी सुतक पाळायलाही असु नये. हे उद्ध्वस्त झालेल्या भारतीय गावड्याचे शेवटचे चित्र आहे.एकमेकांपासून किती तुटावे तर दुरुनच नमस्ते करा इतके.
एकटे पडलेले लोकं जास्तप्रमाणात भांडवली जगताचे ग्रहाक बनतात.
हा काळ जग जवळ येण्याचा आणि माणसे दुर जाण्याचा आहे ..
आम्ही मात्र #फाटलेल्या_आभाळाला पुन्हा उमेदीची #गवसनी_घालु.वाळलेल्या खोडालाही नवे धुमारे फुटतील .
थांबा जरा ..
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment