Saturday, 16 July 2022

कोण हे आहो सुखाचे सांगाती ? संत चोखोबाराय लेखमाला ३०

कोण हे आहो सुखाचे सांगाती ?

जन्मला देह पोशिला सुखाचा l काय भरवसा याचा आहे ll
ऐकलेची यावे ऐकलेची जावे l  हेची अनुभवावे आपणची ll
कोण हे आहो सूखाचे सांगाती। अंतकाळी होती पाठमोरे ll
चोखा म्हणे याचा न धरी भरवसा । शरण जा सर्वेशा विठोबाशी ॥

                             
                           शेवटच्या काळात संत चोखोबाराय अत्यंत एकटे पडले होते. त्यातूनच त्यांना अत्यंत करुणपणे मांडणी करणारा हा अभंग स्फुरला आहे. त्यांनी व्यक्त होने हा गुन्हा ठरला होता. त्यातून त्यांना आनखी एकटे पाडणारी परिस्थीती उद्दभवली होती. मंगळवेढ्याला वेशीच्या बांधकामासाठी त्यांना जावे लागले होते. त्यांच्या सर्व आशा, आकांक्षा स्वप्ने धुळीला मिळाली होती. त्यांचे निकटवर्ती संत मंडळ सोडून त्यांना ईच्छा नसतानाही वेठबिगारीच्या कामावर जाणे भाग पडले होते. या त्यांच्या जीवनात उद्धभवलेल्या या परिस्थीतून त्यांना हा अभंग स्फुरला आहे.
                            शेवटच्या काळात मन मारूण जगणे चोखोबारायांच्या वाट्याला आले होते. एकीकडे बडव्यांची पुरोहीतशाही तर दुसरीकडे वेठबिगारीच्या कामाला बळजबरीने नेनारी बिदरच्या राजाची सरंजामशाही, आशा दोनही व्यवस्थेचे. बळी चोखोबाराय ठरले होते.

                                आंबेडकरी चळवळीतील विद्वान आणि जेष्ठ लेखक ज. वि. पवार म्हणतात " निम्न जातीत जन्मलेल्या चोख्याने समताधिष्टीत समाजव्यवस्थेची अपेक्षा केल्यामुळे त्यांना भिंतीत चिरडून मारण्यात आले. ज. वि. पवारांसारखे अनेक दिग्गज लेखक चोखोबारायांची हत्याच झाली म्हणतात.फुले शाहु आंबेडकरी चळवळीचे लेखक, संघटक शुध्दोधन आहेर म्हणतात. " म्हणुनच चोखा डोंगा परि भाव नाही डोंगा अशी काळीज पिळवडून टाकणारी आर्त वेदना शब्दबध्द करणारा हा बंडखोर  संत मंगळवेढ्याच्या बुरुजात जिवंत गाडला गेला. संत चक्रधरांचे   शिष्यत्व पत्करणाऱ्या एका प्रवचनकार चांभाराला , देखील चुनखडीच्या खड्ड्यात बसवून आणि वरून असाहय्य वेदना, यातना देऊन ठार मारण्याची शिक्षा, देवगिरीच्या राजा रामदेवराय याच्या प्रधानाने, हेमाद्री पंडिताने दिली होती..... पुर्वास्पृश्य  चोखामेळ्याला जिवंत गाडणे सहज शक्य आहे ! आशा तर्हेने या देशातील शुद्रातिशुद्रांनी आध्यात्मिक मुक्तीदेखील रक्त सांडवूनच मिळविली आहे. "
                                आशा पध्दतीने चोखोबारायांच्या अंतकाळी कुणीच जवळ नव्हते. यातून मन मारून चोखोबाराय जंगले आणि मेले. संत चोखोबारायांचे वारसदार म्हणुन पंढरपुरात सर्वगोड यांची घरे आहेत. सर्वगोड हे आडनाव पंढरपुर सोडून अख्या महाराष्ट्रात नाही. त्या काळी चोखोबारायांसारख्या अस्पृश्य  जातींना आडनावे नव्हती. म्हणून त्याकाळी चोखोबारायांना चोखामेळा एवढेच म्हटले जाई. पुढे सर्व संतांनी त्यांचा 'चोखा चोखट निर्मळ'  म्हणून, अभंग लिहुन गौरव केला आहे. चोखोबा भक्ती परंपरेत निर्मळ आहेत. संतांच्या या गोड संबोधनाने चोखोबांच्या नावातील मेळा ( मैला ) जावून चोखोबाराय शुद्ध झाले गोड झाले, असे संतांचे म्हनने होते.संत नामदेवांनी संत चोखोबारायांचे स्मारक बांधुन चोखोबाचा शेवट गोड केला.यातूनही कदाचीत सर्वगोड हे आडनाव पुढे आले असावे. आशाच कुठल्यातरी कारणाने भविष्यात संत चोखोबारायांच्या वारसदारांना' 'सर्वगोड' हे आडनाव मिळाले असावे. सर्वगोड हे अडनाव अत्यंत गौरवशाली आहे. संत चोखोबारायांची परंपरा सांगणारे आहे. "या बाबतीत पंढरपुरतील माजी नगराध्यक्ष सुनिल सर्वगोड म्हणतात
                             "आजवर सनातनी लोकांनी देव आपल्या हातात ठेवला, संतांना छळले. माझे तर असंही म्हणणं आहे की, सनातन्यांनी चोखोबांना मारले आणि त्यांचा मृत्यू, गावकुस पडुन झाला असं सांगितले. हा अन्याय किती दिवस सहनकरायचा. त्यापेक्षा बाबासाहेबांच्या वाटेने आम्ही चाललो आहोत"  या पद्धतीने आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांच्या भुमीका संत चोखोबारायांची वेस ढकलून किवा 'वेसीत गाडून हत्या केली गेली आशा स्वरूपाच्या आहेत.
                             येथील उच्चभ्रृ जातवर्गीय व्यवस्था आजुनही संत चोखोबारायांना न्याय दयायला तयार नाही. संत चोखोबारायांची झोपडी आणि त्यांनी स्वता बांधलेली दिपमाळेची जागा बळकावण्यात आली आहे. त्यांची शेवटची निषाणी सुद्धा सांभाळली गेली नाही. आजच्या पुराव्यानुसार मौजे शेगाव, सर्वे नंबर १० येथील ३० बिघ्याचे शेत चोखोबांचं होत." ती जमीन आज घडीला संत चोखोबारायांच्या वारसदारांकडे हवी होती.ती जमीन बळकावली गेली. ती चोखोबारायांच्या वारसदारांकडे नाही. इतर तिर्थक्षत्रांच्या ठिकाणी संत चोखोबारायाचे मंदिरे नाहीत.असेलच एखादे तर तेही उपेक्षीत दुर्लक्षीत आहे. " काही वारकरी म्हणवणाऱ्या काही फडांमध्ये आजही बहुजन जातीतील संतांचे अभंग घेवुन कीर्तन होत नाहीत. महिलांची प्रवचनं होत नाहीत. विठोबा बाटला म्हणून काही मोठमोठे महाराज आजही पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरात जात नाहीत." ज्या अस्पृश्यतेच्या विरोधात, भेदाभेदाच्या विरोधात चोखोबारायांनी आणि सर्व संतांनी बंड केले ती अस्प्रश्यता,भेदाभेद तशीच चालू आहे.चोखोबारायांना काही न्याय मिळाला नाही.गावखेड्यातील  बरेच जन म्हणतात आता कुठे राहिला आहे जातीवाद. आशांनी गावपातळीवर लक्ष ठेवून पहावे गावात ' एक गाव एक पाणवठा झाला पण आजूनही एक गाव एक मसणवाटा'  होऊ शकलेला नाही, भेदभाव आजुनही तसाच आहे. त्या काळात संत चोखोबारायांना आपल्या सख्या पांडुरंगाची भेट घेता आली नाही. आणि आजही  गाव पातळीवर मातंग, चर्मकारांना पारावर, मंदिरात का आले म्हणून मारले जाते.मंदिराच्या आडोशाला पावसाच्या बचावासाठी उभे असलेल्या परभणी जिल्यातील आंबादास सावणेला मंदिर बाटवले म्हणून जीवे मारले जाते. आजही किर्तनातून वक्ते महाराजांच्या सारखे कीर्तनकार जाहिररित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची टिंगलटवाळी करतात. म्हणजे संत चोखोबाराय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  मानापसून स्विकारायचेच नाहीत असे ठरवूनच टाकले गेले आहे.
                              जग एवढे पुढे गेले आहे, तरिही भारतीयांनी जुनाट, बुरसटलेल्या संकल्पना काही सोडलेल्या नाहीत. आजुनही आम्ही आजुबाजुच्यांकडे माणुस म्हणुन  पहायला तयार नाहीत. आम्ही माणसाला जात, धर्म, वर्गाच्या  चष्म्यातून पहातो. कधी बदलणार आपण? किती चोखोबारायांनी हळहळ व्यक्त करत, निकृष्ठ जीवन जगत मरायचे ? आजही भंगी, वडार, घिसडी, पारधी, ढोर, बेलदार, पथरवट यांसारख्या कितीतरी भटक्या विमुक्त जाती अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत.आशा जातीना गावात प्रवेश सुद्धा दिला जात नाही. "कोण्याही जीवाचा न  घडो मत्सर" ही संतांनी सांगितलेली शिकवण आपण विसरत चाललेलो आहोत का ?
                              आपल्या जगण्याचे मुख्य मूल्य माणुसकी असायला हवे.संतांनी माणुसकीच केंद्रबिंदू मानुन शिकवन दिली आहे. मग नेमकी ती माणुसकी तेवढी आपण सोडली आहे का ?
                               सर्व  संत आणि त्या संतांची शिकवण आपल्याला बरोबरीची असावी. आपला परका भेद किमान संतांमध्ये तरी करू नये. ठरवीक सतांनाच प्रसिद्धी आणि संत चोखोबारायांसारखे मात्र उपेक्षीत, हे अन्यायकारक आहे. त्यांची जातीअंताची शिकवण आपण अंगी बाळगावी. जातीभेद अस्पृश्यता, बंद हावी. त्यासाठी आपण काम केले पाहीजेत. कुणाची घृष्णा करणे, द्वेष करणे, हिंगलटवाळी करणे, हिने लेखने हे थांबले पाहिजे. गोरगरीबांत आजुबाला चोखोबारायच वावरत आहेत , असे आपल्याला वाटले पाहीजे. सर्वांना समान बंधूभावाची वागणुक आपण दिली पाहिजे. हीच खरी संत चोखोबारायांना श्रध्दांजली असेल.

                                 प्रस्तूत अभंगात संत चोखोबाराय म्हणतात " माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे. माणुस कुठल्याही कारणाने ताबडतोब मरू शकतो. जगणे क्षणीक आहे. मृत्यू नग्न सत्य आहे.वास्तव आहे. माणुस जन्माला आल्यापासुन देहाचे भरणपोषण करत असतो. शरीराला सुख मिळावे म्हणून नाना प्रकार माणूस करत असतो. पण जीवनाची निश्चीती कुणाकडेच नाही."  संत चोखोबाराय हे सत्य सांगताना म्हणतात

                       "  की माणुस एकटाच येतो आणि एकटाच जातो. हे सदैव आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या वाईट प्रसंगी कुणीही साथ देत नाही अंतकाळी सर्वजन पाठमोरे उभे रहातात. लोक सुखाचे सांगाती असतात. दुख वाटुन घ्यायला कुणी नसते. म्हणुन कशाचाच आणि कुणाचाच भरोसा धुरु नये. देहाचा किंवा नातेवाईकांचा खात्रीशिर विश्वास धरू नये. सर्वांनी विठ्ठलाला शरण जावे."

                               संत चोखोबाराय वारकरी परंपरेबद्दल म्हणतात की आमचा समतेचा , माणुसकीचा हा प्रवाह आहे.कुनीही या आणि शुद्ध होऊन जा.

खटनट यावे शुद्ध होऊनी जावे l
दवंडी पिटी भावे चोखामेळा ll

नितीन सावंत परभणी
9970744142

No comments:

Post a Comment