Tuesday, 5 July 2022

संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण २१ वे l वारकरी दिंड्यांमधला भेदाभेद.

संत चोखोबाराय जीवनचरित्र - प्रकरण २१ वे 

वारकरी दिंड्यांमधला भेदाभेद.

येणेंची नामे तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजामेळ ॥ १ ॥
गणिका आणि अजामेळ भिल्लणी | गोपाळ गोळणी तारियेल्या ॥ २ ॥
गजेंद्र तो पशु नाडितां जळचर | धावें देव सत्वरे ब्रिदांसाठी || ३ ||
प्रल्हादा संकट पडतां निवारी | चोखियाचे करी बाळंतपणा ॥ ४ ॥
  दामाजीचा महार होऊनियां ठेवा । उणेपण त्याला येवों नेदी ॥ ५ ॥
  एका जनार्दनी भक्तांचा अंकित । उभाचि तीष्ठत विटेवरी ॥६॥
                           - संत एकनाथ महाराज

                                 " पांडुरंग हा सर्वांचा आहे. त्याच्यापुढे कुठलाही भेद नाही. तो भक्तीसाठी कुठलीही कामे करायला तयार असतो. तो भक्तांची जात कुळ वर्ण बघत नाही. गणीका असो, अजामेळा किंवा भिल्लीण असो. अस्पृश्य चोखोबारायांच्या पत्नीचे पाळतपण करणे असो किंवा दामाजी पंतांचा महार चाकर बनुन कर्ज फेडणे असो. विठ्ठल भक्तांसाठी सदैव धावून जातो तो भेदाभेद करत नाही. " हा संत एकनाथ महाराजांच्या वरील अभंगाचा अर्थ आहे.भक्तीपंथात भेदभाव नाही हे सांगुन भौतिकवादी भेदाभेदावर संत एकनाथ महाराज ताशेरे ओढतात.

                             संत एकनाथ महाराज असतील किंवा तुकोबाराय यांनी सर्वच संतांचा एकत्रीत आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. विठू माझा लेकुरवाळा म्हणत सर्व संतांना सामावून 'घेणारी जनाबाई होती. त्यामुळे संतांमध्ये भेद होऊ शकत नाही. तसा भेद करणे चुकच. आध्यात्मीक परिभाषेत महापाप पण असा भेद झाला की नाही ? झाला ना संतांच्या दिड्यांमध्ये भेदाभेद केला गेला. सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी संपादीत केलेल्या 'चोहार चोखोबा' या ग्रंथात प्रशांत जाधव यांचा लेख आहे. त्यात त्यांनी १९७७ साली दिंड्यांमधे झालेल्या भेदभावाच्या संदर्भात प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन पुरावे उभे केले आहेत.
                             आळंदीहून पंढरपुरकडे निघणाऱ्या पालखी सोहळ्यात 'भेदभाव केला जातो." आसा आरोप करून माजी अस्पृश्य जातीतील दिंड्यांनी चक्क ज्ञानेश्वर माउलींच्या प्रस्थानाच्या दिंडीसमोर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व 'बाबा आढाव' यांनी केले होते. संत ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडीतील घोड्याच्या पुढे . महार, मातंग आणि चांभार समाजाच्या दिंड्या असत. कधी कधी या दिंड्या पुढे निघून जात बाकीच्यांना काही 'स्वैर सुतकही नसे. त्यामुळे आपल्याला इथेही अस्पृश्यतेची वागणूक दिल्ली जातेय, अशी या दिड्यांमधील वारकऱ्यांची भावना होती.

                        या माजी अस्पृश्य जातींच्या भुमीकेला पाठींबा देण्याचे काम त्याकाळातील पुणे विद्यापिठाचे कुलगुरू दत्ता दाभोळकर यांनी केले होते. नंतर कोर्टाने निकाल दिला की वारीमध्ये अस्पृश्यता चालणार नाही म्हणून.अस्पृश्य मानलेल्या गेलेल्या समाजाच्या दिड्यांचा विजय झाला. त्यांना सामावून घेण्यात आले.
                          याच लेखात प्रशांत जाधव यांनी या आंदोलनातील प्रमुख जे चर्मकार समाजातील होते, आणि त्यांची 'हरळे वैष्णव दिंडी' नावाने संत रविदास महाराजांची दिंडी होती. त्या दिंडीतील पंढरीनाथ अबनावे यांनी सविस्तर मुलाखत दिली आहे. ७२ वर्षे वय असणाऱ्या पंढरीनाथ अबनावे यांनी सांगितलेले प्रशांत जाधव नोंदवून घेतात ते असे की

" ७७ च्या सत्याग्रहाची ठिणगी ही १९७६ च्याच वारीत पडली होती. "चांदोबाची लिंब' येथे माउलीच्या पालखीचे पहिलं रिंगण होतं, त्यावेळी माऊलीचा रथ मध्यभागी, रथापुढ २६ दिंड्या आणि रथामागे मानाच्या दिंडया ओळीने रस्त्याच्या दुतर्फा उभ्या होत्या. या दिंड्या माउलींच्या आश्वाला धाव, घेण्यासाठी रस्त्यावर जागा मोकळी ठेवतात. या वेळी माउलींचा अश्व रथापासून पुढे धावायला लागला त्यावेळी तो २४ क्रमांकाच्या संत रोहिदास दिंडीच्या अगोदरच रोखण्यात आला आणि पुन्हा रथाकडे वळविण्यात आला." पुढे त्यांनी ही घटना सांगून पुढे लिहीले आहे की

.....तर चांदोबाचा लिंब या ठिकाणी आमच्याशी मुद्दाम दुजाभाव केल्याचं आमचं मत झालं"

"आबनावेंचे सांगणं संपलं नव्हतं. ते पुढे म्हणाले, 'हे झालं दिडींत चालण्याबाबद इतरही अनेक प्रकार होते दलित दिड्यांमधील किर्तनकारांना फडावर किर्तनाचा आधिकार नव्हता..."

समतेची शिकवण देणाऱ्या संतांच्या वारकरी सांप्रदायात एवढा भेदाभेद चालू रहावा आश्चर्यकारक आहे. लेखात मांडणी करणारे प्रशांत जाधव आबनावे यांच्याकडून जी माहीती मिळवतात ती अशी

"याच दरम्यान वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या हरिजनांच्या काही विदयार्थ्यांना अस्पृश्यतेची वागणुक दिली जात असल्याचे समोर आलं. तिथ सवर्ण विद्यार्थी व्यासपीठाजवळ कीर्तन करायचे . पण हरिजन (अस्प्रश्य) विदयार्थ्यांना ज्या, ठिकाणी चपला-बुट ठेवले जायचे तिथं उभं राहून किर्तन सेवा करावी लागायची. हा जातिभेद अगदीच स्पष्ट होता. हे समाजाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पत्रकार, लेखक अनिल अवचट यांना आम्ही निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बाब जगासमोर आनली. "

                          पुढे प्रशांत जाधव यांनी मातंग समाजाच्या आजमेळा दिंडीचे प्रमुख निवृत्तीबुवा गायकवाड यांचीही मुलाखत घेतलेले तपशील दिले आहेत.

दिडी प्रमुख निवृत्तीबुवा गायकवाड यांनी मांडलेला महत्त्वाचा मुद्दा असा की

" समाज आरतीच्या वेळीही सर्व सोहळ्यातून या दिड्यांना बाहेर काढले जायचं. उभं रहायला जागा होत नाही, असं त्यासाठी कारण सांगितलं जायचं."

                         या पद्धतीने समतेची परंपरा मिरवणाऱ्या वारकरी सांप्रदायात बहुतांश फडकरी अस्पृश्यता भेद जाहीररित्या पाळत असतं. दिंड्यांमध्येही भेदभाव केला जाई. यातील अंतर्गत वाद हा काही उच्चजातीयांनी उदार अंतकरणाने मिटवला नाही, तर अस्पृश्य जातींना कोर्टातून न्याय मिळवून आनवा लागला.

                    चोखोबाराय, रवीदास महाराज हे अस्प्रश्य जातीतून आलेले संत आहेत.आणि त्यांना महत्व देण्याची गरज नाही ही स्पष्ट जातीवादी भूमिका काही फडांनी आणि किर्तनकारांनी घेतलेली आहे. याच ब्राम्हणी, सनातणी मंडळींनी अनेक संत अदखलपात्र ठरवले आहेत. या संतांची मंदिरेही उभारायची नाहीत की यांचे साहित्य चर्चेलाही घ्यायचे नाही. माणुस म्हणुन अजुनही या संताना न्याय मिळाला नाही.

                      ज्या गोष्टीसाठी संतांनी आयुष्य पनाला लावले, त्याविरोधी कृत्ये करून संतांचा विचार भिरकावून टाकण्यात आला. संत राहिले फक्त अभांगापूर्तेच. या अंतर्गत द्वंद्वावर बोलायचेच नाही असे काहींनी ठरवलेले आहे. आणि दुसऱ्यालाही न बोलू देणारी सनातनी मंडळी कार्यरत झाली आहे.

              दिंड्यामद्ये आणि वारकरी सांप्रदयायात जर जाहिररित्या जातीभेद केला जात असेल तर संतांच्या शिकवणूकीतून ही मंडळी  काय शिकली हा प्रश्न पडतो. बाह्य अवडंबरावर भर देणारे अजूनही मनामनातून बदलले दिसत नाहीत. आपल्याला परवडेल तेवढे सोईने स्विकारायचे हि प्रवृत्ती हल्ली खूप वाढली आहे. तरीही काही चांगली मंडळी संत चोखोबारायाचा वारसा पुढे चालवण्यासाठी कार्यरत आहे. हे नसे थोडके.

नितीन सावंत परभणी
9970744142

No comments:

Post a Comment