चोखोबांचे वारसदार
महाराष्ट्रातील लोकमनावर सर्वाधीक प्रभाव आहे तो साधू संतांचा. संत, महाराज, गोसावी, बुवा, बाबा, मुनी म्हटले की सर्वसामान्य लोक आदराने मान झुकवतात.साडे सातशे वर्षापूर्वी सुरू केलेला माणुसकी शिकवणारा वारकरी धर्म कुठलीही साधने नसताना संत नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत नेवून पोहचवला होता. महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला संतांचे अभंग गुणगुणनारे आणि त्यांचे किस्से सांगणारे लोक भेटतीलच.
राजाश्रय नसताना आणि उच्च जातीयांना, भारतीय सरंजामशाहीला हे साहित्य मान्य नसतानाही ग्रामीण जनतेने सतांचे विचार जगवले, जीवंत ठेवले. काही लोकांनी हा संतांचा समानतेचा, माणुसकीचा विचार जीवंत ठेवण्यासाठी आयुष्य पणाला लावले होते. अत्यंत हालाखीचे जीवन जगत संतांचे साहित्य, त्यांची शिकवण पुढच्या पिढीला कळावी,हा विचारांचा ठेवा जीवंत रहावा म्हणून, अनेक लोक राबलेले आहेत. संत एकनाथ महाराज आणि संत तुकोबारायांच्या समतेसाठी केलेल्या त्याग आणि समर्पनानंतर महाराष्ट्रात त्यांची प्रेरणा घेवुन असंख्य दिग्गज समतेसाठी पुढील काळात पुढे आले होते.
त्यातीललच एक नाव म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे होत.ते वारकरी परंपरेतूनच जाती अंताचे, अस्पृश्यता निर्मूलनाचे काम करण्यास पुढे होते. संत चळवळ त्यांची प्रेरणा होती. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे, संत गाडगे महाराज यांसारखे अनेक महापुरूष संत चळवळीची प्रेरणा घेऊन जाती अंताचे काम करत होते.सत्यशोधक चळवळीचे नेते मुकुंदराव पाटील यांनी " विठोबाची शिकवण" हा ग्रंथ लिहुन आपली वारकरी नाळ आणि सांस्कृतिक परंपरा जगासमोर आनली होती. मुकुंदराव पाटील यांनी सत्यशोधक चळवळीत विधायक प्रबोधनांचा पायांडा पाडला होता.फुले शाहु आंबेडकरी चळवळ आणि सत्यशोधक चळवळ या दोनही चळवळीचा पाया संतांचे विचारच होते.
याच काळाच्या टप्यावर विदर्भातले एक नाव म्हणजे गणपती महाराज होय. "आमरावती जिल्हयातील मंगळुर दस्तगीरचे हे, गणपती महाराज उर्फ हरि महाराज विठोबा अभूतकर होते. दशक १९३० चे तर त्यांचा कार्यकाळ १८८५ ते १९४९ चा होता.गणपती महाराजांनी वारकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन विदर्भात जातीअंताची चळवळ उभी केली होती. नव्हे ती त्याच्या समक्ष अंतरजातीय विवाह सोहळे लावून पूर्णत्वास नेली होती. विदर्भ हा तसा,अत्यंत प्रेमळ आणि माणुसकी जपणारा प्रांत. आपल्या सभोतालची विषमता, जातीभेद बघून गणपती महाराजीनी विरोधकांना न जुमानता अस्पृश्यता निर्मुलनाचे , जातीअंताचे काम त्याकाळी केले होते. पंढरपुरला जाणाऱ्या लोकांसाठी,पंढरपूरहुन त्यांनी डोक्यावर विठ्ठलमूर्ती आजून तिची स्थापना मंगळूर दस्तगीरमध्ये केली होती.त्यांनी विठ्ठल मंदिर बांधुन सार्वांसाठी खुले केले होते. या मंदिरात त्यांनी अस्पृश्यांना सुध्दा प्रवेश दिला होता. बाहेर ताटकळत आर्जव करत उभा असलेला चोखोबा डोळ्यासमोर अनला की गणपती महाराजांनी केलेले काम महत्त्वाचे वाटू लागते. सर्वांना भक्तीचे आधिकार बहाल करणारे गणपती महाराज अस्पृश्यांना मंदिरात आनतात,जातपात मानत नाहीत. म्हणून ते त्याकाळी ब्राम्हणांच्या टिकेचे लक्ष बनले.तेव्हा महाराज म्हणायचे मी आनलेली ती विठ्ठल मुर्ती आहे. तिचे दर्शन कोणाला घेवु द्यायचे हे मीच ठरवणार. नाहीतर त्या मुतींवर मी धुनं धुइल ” पुढे गणपती महाराजांनी प्रबोधन करत जात सांगूं नका, जात पाळु नका हा अग्रह धरला भाणि आपल्या डोळ्यासमोर अनेकांची अंतर जातीय लग्ने लावली.
अस्पृश्य जाती व सवर्ण जातींचा रोटीबेटी व्यवहार त्यांनी सुरु करून दिला. एका पंगतीत सर्वांनी जेवायला बसण्याचे संत सोयराबाईचे स्वप्न गणपती महाराजांनी पुर्ण करून दाखवले. याप्रकारे समतावादी काम करणाऱ्या गणपती महाराजांच्या केलेल्या कार्याचा गौरव व्हायला हवा होता. परंतू प्रस्थापीत उच्चभ्रू जातीव्यवस्थेने यांच्यावर अजात चा शिक्का मारला.अलीकडे अरविंद जोषी यांची शणपती महाराजांच्या कार्यावर अजात नावे डॉक्युमेंटरी झाली आहे. त्यात सुरवातीलाच सदानंद मोरेंचे 'जातीव्यवस्थेच्या विरोधात टोकाची भुमिका घेतली की जातीव्यवस्था तर मोडली जात नाही उलट तुमचीच एक जान बनते " असे बोल्ड आणि व्यवस्थेला पूरक स्टेटमेंट घेवून अत्यंत एकांगी व एकप्रवाही स्वरुपाची ही डॉक्युमेंटरी जोषींनी बनवली आहे.
जोषींनी आणि मोरेला विचारले पाहिजे की जातिव्यवस्थेला टोकाचा विरोध केल्यामुळे जातीव्यवस्था मोडतच नाही म्हणून काय जातीवस्थेला विरोधच करायचा नाही? आपण समाजव्यवस्थेपासून बाहेर फेकले जावू नये म्हणून आपल्या आजुबाजूला काहीही चालुदाद्यायचे का ? अमानवीय -प्रथा परंपरांचा विरोध करायचा नाही का? किती सांगू तरी न ऐकती बटकींचे । पुढे शिंदवीचे रडतील || ही तुकोबारायांची भुमीका कशी होती? मऊ की टोकाची ? गणपती महाराज विदर्भ सोडून इतरत्र जन्माला आले असते तर त्यांची निश्चीत घेतली गेली असती, शिवाय ते पडले दुय्यम शेतकरी जातीतले.ते उच्चजातवर्गीय असले असते तर सावरकरांना भारतरत्न द्या म्हनणार्यांनी गणपती महाराजांनाही भारतरत्न दया म्हणून मागणी केली असती. स्वतंत्र्या नंतर शाळेच्या दाखल्यावर कुठली जात लावायची या समस्येतून प्रस्थापित व्यवस्थेतल्या उच्चभ्रु शिक्षकवर्गाने जातीच्या रकान्यात अजात शब्द लावला म्हणून हे गणपती महाराजांचे भक्त अजात'' बनले. यात दोष गणपती महाराजांचा आहे का? तुमच्या ब्राम्हणी व्यवस्थेचा तो दोष आहे. केरळातील दिड लाख विदयार्थ्यांनी एकाचवेळी जात टाकुन दिल्याचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. हे मोरे-जोषी त्यांना अजात म्हणतील का ? अजात' ही गणपती महाराजांच्या कार्याची ब्राम्हणी व्यवस्थेने केलेली टिंगलटवाळी आहे . तरीही अरविंद जोषांनी एकसुरी का होईना परंतू गणपती महाराजांचे कार्य जगासमोर आनल्या बद्दल त्यांचे अभिनंदन.दलितांचे बुद्धीजीवी म्हणुन या डाक्युमेंटरीत ज.वी पवार, रावसाहेब कसबे, लक्ष्मण गायकवाड़ हवे होते किंवा विदर्भातील जातीअंताचे प्रबोधन करणारे मा. म. देशमुख, डॉ. अशोक राणा, तरी जोषीनी बुध्दीजीवी म्हणून स्विकारायला हवे होते.पर्यंत या बुद्धीजीवींचे मते विचार घेतलेली नाहीत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ॲनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक येण्याच्या अगोदर गणपती महाराज सहभोजन आणि अंतरजातीय विवाह या उपाययोजनांच्याद्वारे जाती अंताचे काम करत होते. त्याबद्दल इतिहास त्यांचे सदैव स्मरण करेल.
या पध्दतीने संत चोखोबारायांना प्रेरणा मानून विदार्भात आनखी एक महान माणुन महानतेचे काम करत होता. या मानसाचे नाव म्हणजे किसन फागुजी बनसोड होय. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी रोजी नागपुर पासून २४ किलोमीटर अंतरावर असणानार्या मोहपा या गावी झाला. त्यांनी जातीव्यवस्था, अस्पृश्यतेचा कसून अभ्यास करून अस्पृश्यांमधे जागृतीचे काम केले होते. त्यासाठी त्यांनी अस्पृश्य जातींमधे प्रेरणा उभी करण्यासाठी संत चोखोबारायांना चर्चेच्या कार्यक्षेत्रात आनले होते.संत चोखोबारायांना त्यांनी प्रेरणा मानले होते.यातून त्यांनी नागपुरच्याच पाचपावली भागात १९०७ साली 'चोखामेळा मुलींची शाळा काढली.त्यांच्या कार्याचा कल लोकजागृती करणे व अस्पृश्यांना हक्क अधिकार मिळवून देणारा त्यांना सन्मानाचे जीवन जगायला शिकवणारा होता. त्यांनी संत चोखोबारायांचे अभंग गोळा केले होते.त्यांनी महार लोकांना धैर्य मिळावे म्हणून चोखोबांवर कविताही लिहीली होती. १९४२ साली प्रकाशित झालेले संत चोखामेळा चरित्र, सत्यशोधकी जलसा आणि चोखामेळा दर्शन ही त्यांची साहित्य संपदा होय. किसन फागुजी बनसोड यांनी प्रस्थापीत ब्राम्हणी धर्मव्यवस्थेला धारदार शब्दात प्रश्न विचारले आहेत. १८०९ साली त्यांनी 'मुंबई वैभव' मधे लेख लिहीला होता. त्या लेखात त्यांनी अस्पृश्यता का पाळता या मुद्द्यावर भर देत विविध उदाहरणांच्याद्वारे सर्वण जातींना प्रश्न विचारले आहेत. गणपती महाराजांप्रमाणेच, बनसोड यांना फारसी प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही.गणपती महाराज, किसन फाराजी बनसोड हे संत चळवळीतून प्रेरणा घेऊन थेट जातीअंताचे, अस्पृश्यता निर्मूलनाचे काम करत होते. सोईची भुमीका घेणाऱ्या भटाळलेल्या वारकऱ्यांनी या चोखोबांच्या वैचारिक वारसदारांकनाही अंधारात ठेवले आहे.चोखोबारायांप्रमाणेच अस्पृश्यतेचे सवाल उपस्थित करणारेच अस्प्रश्य ठरवले गेले आहेत. गणपती महाराज, किसन, फागुजी बनसोड यांच्याप्रमाणेच विदर्भातून जातीअंताचे प्रबोधनात्मक काम करणार्यांमध्ये संत गाडगे महाराजांचे नाव टाळताच येणारे नाही. एकवेळचे जेवणाचे ताट मोडा परंतू शिका असे म्हणानारे गाडगे महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही किर्तनातून उल्लेख करत असत.१९१७ साली संत गाडगे महाराजांनी पंढरपूरला एक धर्मशाळा बांधली होती. ती धर्मशाळा संत चोखोबारांच्या स्मरणार्थ अस्पृश्यांसाठी बांधली होती. गाडगे महाराजांनी आपला धागा चोखोबारायांशी तर जोडून दिलाच परंतू त्यांनी आपल्या शेवटच्या काळात अनेक धर्मशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे करून दिल्या.माणुसकी, समानता यासाठी संत गाडगे महाराजांनी आयुष्य पणाला लावले होते.यामुळे ते लोकमनावर ते कायमस्वरूपी अजरामर झाले.
आलिकडच्या काळात संत चोखोबारायांचा 'विस्तारीत चरीत्रासह अभंगगाथा छापण्याचे श्रेय स.भा. कदम यांना जाते. त्याच्या पश्चात हा गाथा संपादीत करून उजेडात आणण्याचे काम भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे. अंधारात लुप्त होत जानारा चोखोबा न मिटु देणारे, न संपु देणारे हे दोन दिग्गज स.भा.कदम , भालचंद्र नेमाडे होत. चोखोबाराय विद्रोही नाहीत. परंपरेला शरण जाणारे आहेत, असा एक आरोप त्यांच्यावर झाला होता. अति कर्मठ पुरोगाम्यांनी आजच्या मोजपट्या त्या काळातील चोखोबारायांना लावल्या होत्या. तरी या प्रश्नाला समर्पक उत्तर देणारे पुस्तक शंकरराव खरात यांनी लिहीले आहे. पुस्तकाचे नाव 'चोखोबाचा विद्रोह' आहे.अत्यंत महत्वपूर्ण मांडणी या पुस्तकात शंकरराव खरात यांनी केली आहे.
त्याच बरोबर अत्यंत सखोलपणे अभ्यासु मांडणी करणारे आनखी एक पुस्तक म्हणजे ' संत चोखामेळा आणि मी ' लेखकाचे नाव भि. शि. शिंदे होय.यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या पटलावर संत चोखोबाराय पुन्हा चर्चेत राहिले.
संत चोखोबारायांच्या साठी प्राचार्य पदाचा राजीनामा देवून महाष्ट्रभर फिरून त्यांचे साहित्य गोळा करुन सर्वव्यापक संत चोखोबाराय सर्वांच्या समोर ठेवणारे एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य डॉ आप्पासाहेब पुजारी होत.संत चोखोबारायांच्या इतिहासात यांचे नाव टाळता येनारे नाही. मंगळवेढ्याचे निवासी अप्पासाहेव पुजारी हे मुळचे कर्नाटकातील होत. परंतू वारकरी परंपरेतील उपेक्षित संत चोखोबाराय आणि कान्होपात्रा या दोन संतांना प्रकाशझोतात आणण्यासाठी त्यांनी अफाट कष्ट घेतलेले आहेत.त्यांनी चोखोबारायांच्या चरित्रासह,विविध दिग्गज लेखकांच्या लेखासह चोखोबांचा अभंग गाथा त्यांनी प्रकाशीत केला आहे.हे काम करताना त्यांना खुप अडथळे आले तरी त्यांनी हे काम शेवटाला नेलेच. त्यांनी चोखोबांचा २८६ पानांचा ग्रंथ संपादीत केला आहे. या ग्रंथाचे नाव आहे " श्रीसंत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र". नुकतीच २०२० ला या ग्रंथाची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशीत केली आहे.
आशा पध्दतीने साहित्तीक, लेखक, संपादक खऱ्या आर्थाने चोखोबारायांचे वैचारिक वारसदार आहेत.याप्रकारे चांगले काम करणाऱ्या लोकांमुळेच चोखोबांच्या इतिहासाचे डॉक्युमेंटेशन होऊ शकले. अनंतभट ते महिपतीबुवा आणि नामदेव ते गणपती महाराज. आणि किसन फागुजी बनसोड से सभा क़दम , भालचंद्र नेमाडे हा चोखोबारायांच्या इतिहासाचे डॉक्युमेंटेशन करणारा वर्ग कायमस्वरूपी अजरामर राहील. पुढील पिढ्या त्यांच्याप्रती ऋणी रहातील.
ज्यात आनखी महत्त्वाचे एक नाव घ्यावे लागते ते, एलिनॉर झेलियट या फॉरेनच्या लेखीकेचे. त्यांनी संत चोखोबारायांवर अत्यंत सखोल, संशोधन करून ग्रंथ लिहीला आहे.काही लेख संपादीत केले आहेत. संत चोखोबारायांवरील त्यांचा ग्रंथ " संत चोखामेळा विविध दर्शन " या नावे प्रसिद्ध आहे. सुगावा प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या या ग्रंथात अनेक दिग्गज लेखक संशोधकांचे लेखही आहेत.एक विदेशी लेखीका चोखोबांच्यासाठी आयुष्यातील महत्वाचा वेळ देते,खरच गौरवाचे आहे.
खच्चा अर्थाने ही सर्व मंडळी संत 'चोखोबारायांची वारसदार आहेत.कोण्यान कोण्या मार्गाने संत चोखोबाराय जीवंत ठेवल्याबद्द याही महान हस्तींचे सदैव स्मरण होत राहिल.
No comments:
Post a Comment