संत चोखोबाराय जीवनचरित्र प्रकरण २७ वे
ll संत चोखोबारायांच्या साहित्त्यातील घुसखोरी ll 'अबिर गुलाल उधळीत रंग' या अभंगाचा पेटीवर परिचय देने सुरु होते.एक मोठे संगीतकार आपल्या विद्यार्थ्यांना तो अभंग वेगवेगळ्या पद्धतीने गाऊन दाखवत होते.
अबिर गुलाल उधळीत रंग l
नाथा घरी नाचे सखा पांडुरंग ll
एका विद्यार्थ्याने म्हनण्याचा प्रयत्न केला.त्याला थांबवत गुरुजी म्हनाले.अभंग चोखोबांचा आहे.भावविभोर होऊन गायला हवा.अगदी उत्कटता दिसली पाहिजे.उत्कट भाव चेहऱ्यावर आन.
पोरगा चेहऱ्यावर उत्कटता आनु पहात होता आणि मी पयारीला उत्कट भाव घेवुन उभा असलेला चोखोबा डोळ्यासमोर अनत होतो.
उंबरठ्याशी कैसे शिवु आम्ही जातीहीन l
रुप तुझे कैसे पाहु त्यात आम्ही दीन ll
पांडुरंगाच्या पायरीला उभा राहुन चोखोबा आर्जवं करत वास्तवाचे भान करुन देत आहे.सांग पांडुरंगा उंबरठ्याला कसे शिवु ?आम्हाला तु हिन जातीचे केलेस.सांग विठोबा तुझे रुप कसे पाहु? आम्ही दिन आहोत.गरिब आहोत.आम्हाला आत येण्याची परवानगी नाही देवा.
इकडे संगीतकार गुरुजी हरकती काढत होते. आणि हरकत कशी काढावी हे खुबीने सांगत होते.आणि मी विचार करत होतो,काय हरकत होती चोखोबांना मंदिरात घेतले असते तर.जगबुडी येनार होती का ? किती निर्दयी समाजव्यवस्था होती आपली.दारात उभे असलेल्या चोखोबाला यांनी आत घेतले नाही.गुरुजी ओरडले लय सोडु नका लय.त्यांना विद्यार्थ्यांनी लय सोडलेली अवडत नव्हती आणि मला चोखोबाची ती अर्त करुणा सहन होत नव्हती.तो लय मर्यादा बळगत पायरीला उभा होता.
पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग l
आरे वर जा वर,उरचा स्वर घे सर ओरडले.मी ही मनात ओरडलो अरे चोखोबा जा ना वर,वर जा,घे वरची भूमिका.आरे तुझा बंका बरा शिव्या घालतो तो.काय रे ही केलवानी आर्जव.जा की वर पायरी ओलांडून मंदिरात.
वाळवंटी गाऊ आम्ही,वाळवंटी नाचु l
चंद्रभागेच्या पाण्याने आम्ही अंग अंग न्हाऊ ll
याला मंदिरात जा म्हनालो तर हा वाळवंटात गेला. चंद्रभागेच्या तिरी किर्तनाला.बघ ती जनी शिव्या घालते रे चोखोबा.अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या.तुझी रांडरंडकी होवो,तुझे मढे बसो म्हनते ती आणि तु तर हार मानलीस.वाळवंटात गेलास तिकडे.चढ ना पायरी.कर विद्रोह,बंड.
सांगिताचे सरही विद्यार्थ्यांना असेच रागवले लय सोडुन गेले म्हणून.
विठ्ठलाचे नाम घेवु होऊनी निसंग l
या चोखोबाला कोनाचाच संग नाही म्हणून हा म्हनतो होऊनी निसंग.अरे काय हे तुझे जीने.घुस ना त्या संतमंडळात.तुझ्या भक्तीबद्दल आम्हाला काहीही शंका नाही.बघ तिकडे नामदेव आहेत,जनाबाई आहेत,गोरा कुंभार आहेत,कबिर आहेत.आणि नित्संगाची भाषा करतोस.एकटा पडलास का ? खचलास का ? होऊनी निसंग म्हणजे काय ? का निसंग व्हायचेय चोखोबा ?
आषाढी कार्तीकी भक्तजन येती l
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ll
चोखा म्हने नाम घेता भक्त होती दंग l
माझे मन लागेना,मी संगिताच्या क्लासमधुन बाहेर आलो . विचार करु लागलो,वारकरी सांप्रदायात नाथ फक्त एकनाथ महाराजांना म्हणतात.मग या अभंगातले नाथ तेच का ?
नाथाच्या घरी पांडुरंगाने पाणी भरल्याचे,घरची कामे केल्याचे मी आइकलेय.पण तो नाचल्याचे एकले नाही.आणि नाथमहाराजांना हा नाचलेला अवडेल का ? बरे चोखोबांच्या नंतर ३०० शे वर्षांनी हे नाथ महाराज होऊन गेले.चोखोबा आधीच हे कशाला म्हनतील.म्हणजे हे ते नाथ नव्हेत.
मग मी विचार करु लागलो,पांडूरंगाने चोखोबांचे ढोरे ओढले, त्याने जनी सोबत शेनाच्या गवऱ्या लावल्या,त्याने सज्जन कसायासोबत मांस विकले,मग तो नाचला कुणाकडे ?
अरे हो तो नामदेवांच्या किर्तनात नाचला.तो दोन जनांच्या सोबत नाचला एक मिरे सोबत पद घुंगरू बांध के आणि दुसरा नामदेवांच्या किर्तनात.
संत जनाबाईच म्हनतात
नामदेव कीर्तन करी l पुढे देव नाचे पांडुरंग ll
शिवाय चोखोबा नामदेवांचे समकालीन.सोबत राहिलेले.चोखोबांनी नामदेवांची किर्तने एकलेली.म्हणजे चोखोबा नामदेवांच्याच किर्तनाच विठ्ठल नाचला असे म्हनत आहेत.
कोण्यातरी घुसखोराने नामा घरी नाचे सखा पांडुरंग चे नाथा घरी केले. नामा काढुन नाथा घुसवले. कारण चोखोबाराय नामदेवांना नाथ म्हनतच नव्हते.तिथे नामाच.नाथा नव्हे.काय ही दुर्दशा रे चोखोबा तुझी मरण्यापूर्वीही आणि मेल्यानंतरही.
No comments:
Post a Comment