Friday, 9 December 2022

ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवींचा तोरा - भाग एक

 ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवींचा तोरा - भाग एक 

                      काळाच्या पटलावर समस्या जोखून त्यासाठी उपाययोजना देनारा खाऱ्या अर्थाने बुद्धीजीवी असतो.त्यालाच विचारवंत , तत्वज्ञही म्हणता येइल. तो जनसमुदायात वावरतो , समाजात जातो. तिथे समस्यांचा क्रम लक्षात घेतो.प्रथम प्राधान्याच्या समस्येला तो केंद्र बनवतो आणि त्यावर क्रांतीशस्त्रे तयार करतो.
                      
                           बुद्ध भारतभर फिरले आणि त्यांनी वर्णांतांच्या क्रांतीचे तत्वज्ञान दिले.शाळेसाठी लेकरे आणण्यासाठी फुले अस्पृश्य वास्त्यांत फिरले त्यातून त्यांनी जात्यान्तक क्रांतीचा शस्त्रागार तयार करायला सुरुवात केली.डॉ बाबासाहेब आंबेडकर लढे,मोर्चे उभे करत करत अस्पृश्यता ही प्रथम प्राधान्याची समस्या जागतिक पटलावर नेताना दिसतात. म्हणजे हे महापुरुष जनतेत जावुन समस्या जोखतात आणि त्या समस्येला धरुन क्रांतीशस्त्रे तयार करतात.म्हणून ते मुक्तीदाते ठरतात.                    
                             आजचे सांप्रत पुस्तकी विचारवंत स्वताला सर्वहरांचे बुद्धीजीवी म्हणून घेवुन घोर फसवणूक करताना दिसत आहेत.यांचे पुस्तकी ज्ञान हे जातवर्गीय समाजव्यवस्थेत केवळ आणि केवळ भागीदारी मिळवण्यासाठी, काहीतरी पदरात पाडुन घेण्यासाठी असते.पुस्तकी विचारवंत हे एकांगी बनले आहेत.त्यांनी आधिक प्रगल्भ आणि व्यापक बनण्याऐवजी ते तुसडे ,साचेबद्ध बनले आहेत. ते कधीही समाजव्यवस्थेत गेलेले नाहीत , किंवा जायला तयार नसल्यामुळे त्यांना आजच्या समस्या चर्चेच्या पटलावर आनता आलेल्या नाहीत.समाजव्यवस्थेला त्यांना निट समजून न घेता आल्याने त्यांच्या कलासाहित्यात सर्वहरांच्या समाजव्यवस्थेचे प्रतिबिंबही आपल्याला दिसत नाही .                   
                            यांची साहित्यकृती आणि बुद्धीमत्ता जर सर्वहारांच्या मुक्तीचा मार्ग देऊ शकत नसेल. त्यांचे संघर्षमय जीवन सुखकर करु शकत नसेल तर हे बुद्धीजीवी ब्राम्हणी (परंपरागत) बुद्धीजीवी आहेत.

                          आज घडीला सर्वहारांच्या शोषण पिडणाच्या , गुलामीच्या बेड्या आधिकाधिक घट्ट होत आहेत.देश रसातळाला जात आहे. आशावेळेला विचारवंत , बुद्धीजीवी म्हणवून घेनारे केवळ साहित्तिक कंड शमवत असतील तर ते ब्राम्हणी बुद्धीजीवी ठरतात, परंपरागत बुद्धिजीवी ठरतात.

गरज आहे जैविक बुद्धिजीवीची, चळवळीच्या लढ्यातून निर्माण बुद्धिजीवीची. 

नितीन सावंत परभणी 
9970744142

No comments:

Post a Comment