हल्ली बरेच जन आपल्या आवडीच्या नेत्याच्या बद्दल उर्जा खर्च करताना नेता सामान्यांचा म्हणून त्या नेत्याची खोटी दिखावू वृत्ती मांडताना दिसत आहेत .त्यांच्या दृष्टीने सर्वसामान्यत्व म्हणजे श्रीमंताने फक्त एक दिवस गरिबी बद्दल कनव दाखवने . कृती न करने .
गडगंज संपत्ती कमावेला त्यांचा नेता जेवनाच्या पंगतील जमीवर बसल्यास , सरकारी दवाखान्यात पेशंटला भेटायला आल्यास , लहान मुलांच्यात बसुन गुजगोष्टी करताना दिसल्यास , चटणी भाकरी खाताना , कुणाच्या शेतावर गेल्यास , एखाद्या पिकात उभे राहुन फोटो काढल्यास. नेता सामान्यांचा म्हणून लोकांत भ्रम निर्माण करुन देण्याचे काम हे चेले करत असतात . एक महिला नेता अगदी साध्या राहुन दरवर्षी पंढरपूरच्या वारित डोक्यावर तुळस घेवुन मोठ्ठा मेडिया घेवुन मिरवत असतात . प्रॉपर्टी आब्जावधी रुपयांची आणि रोडवर येण्याची नाटके .
आरे यांचे आज्जेपंजे जमीनीवरच जेवनारे गरिबच होते ना , यांच्या पुर्वजांच्यात कोनीत सरकारी दवाखान्यात गेलेले नव्हते का ? लहान मुलांना बोलने पंगतीत जेवायला बसने लय मोठेपणा ठरतो का ??
विदेशी नेते त्यांच्या देशात इतक्या लोकांत मिसळतात की गर्दित नेताही गडेल गुप असतो . ओळखायलाही येत नाही .
आणि येथे मात्र त्यांचे चेले चपाटे नेते जे नाहीत ते उगीच दाखवत असतात .
एक दिवस गरिबांच्यात गेल्याने तुमचे साधेपणा सिद्ध होते का ?
एक दिवस पंगतीत जेवायला बसल्यामुळे तुम्ही सर्वसामान्य ठरतात का ?
रोजच हजारो रुपायाची महागडी दारु पिता , लाखोंचे महागडे कपडे ,सुट, बुट, चष्मे ,मोबाईल वापरतात . त्यांच्या एका दिवसाच्या सहानुभूतीने काय फरक पडनार बरे ... आमच्या गरिबीत .
तुम्ही एवढे सामान्यांचे नेते आहात तर बच्चू कडु व्हा !
चित्र स्पष्टच आहे सध्या महाराष्ट्राभर दोन शेतकरी संघर्ष यात्रा चालू आहेत . एक श्रीमंत भांडवलदांची शेतकरी कर्जमाफी यात्रा ( पहा नाशिकचे फोटो ) आणि दुसरे बच्चू कडुचा शेतकरी दौरा .
ते करोडो रुपायाचे स्टेज लावुन अगदी महागड्या खुर्च्या बसायाला देवुन संपूर्ण मेडियाचे कव्हरेज वापरुन नाटके करताना दिसतील आणि वर म्हणवून घेनार आम्ही सर्वसामान्यांचे नेते .बच्चू कडू हा माणुस मात्र विहिरीत पोहत , बैलगाडीने ,जमेल त्या वहानानेने लोकांच्या शेतात राहात आपली शेतकरी जत्राच घेवुन निघाला आहे सर्वसामान्यांच्या भल्यासाठी . कुठलेही नाटक नाही की सोंग नाही .
बच्चु कडु एक उदाहरण म्हणून दिले .
त्रिपुरात माणिक सरकार बघा , मुख्यमंत्री असुन एकच पोलीसवाला सोबत ठेवतात ,रेल्वेने प्रवास करतात , सायकलवर्र सुद्धा फिरतात . केरळचे आमदार खाजदार बघा किंवा वेस्ट बेंगोलचे सध्याचे खाजदार मुहम्मद सलिम बघा ,अगदी साधे जगातात . साधे रहाने आणि साधे जगणे यात फरक आहे .
कॉ चंद्रगुप्त चौधरी यांची औरंगाबाद शहारतील दिडशे एक्कर जमीन गरिबांना वाटली होती . प्रकाश आंबेडकर सुद्धा साधे जगतात .सर्वत्र रेल्वेने प्रवास करतात . मुंबाईला लोकलने फिरतात .
आरे यड्यानो तुमचे तुमचे नेते सामान्यांचे आहेत तर वाटा की म्हनावे कमावलेली गडगंज संपत्ती . स्वताला लागेल तेवढी ठेवा बाकी द्या लुटलेली गरिबांची गरिबांना .
खरच सर्वसामान्यांचे व्हा डुप्लिकेट नको . तुमचे कॉलेजस फुकट करा आमच्या शिक्षणासाठी.चेल्यांनो तुमच्या वतीने जोहार घाला आणि म्हना ..
करा की एवढी दया .. मायबाप .
मागे आमच्या परभणीत एक कम्युनिस्ट वृद्ध व्यक्ती वरली. अंत्यविधीला कमी लोक होते .शिवाय अंत्यविधी रात्रीला असल्याने खेड्यातून जास्त लोक येवू शकले नाहीत . मी म्हनालो काय दशा आहे चांगले कामे करुन मरणार्यांची .जास्त लोक पन नाहीत अंत्यविधीला . एक कॉम्रेड म्हनाले लोक किती आहेत, यापेक्षा कोन आहेत ते बघा .मघाशी गर्दिच्या बसमधून उतरलेला धोतरावाला माणुस बाजुलाच उभा होता . मी म्हनालो कितीपेक्षा कोन आहेत बघा म्हनत आहात तर मग हे कोन आहेत ??
ते म्हनाले गंगाखेडचे माजी आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड .
मी आवाक होत बघत होतो ..
हा माणुस बसनेच आला आणि बसनेच गेला .
आणि नेता सामन्यांचा म्हननार्यांच्या पक्षात तर ग्राम शाखाध्यक्षालाही स्कार्पिओ दिली जाते....
खरेखोटेपना ओळखा ..
नितीन सावंत परभणी .
प्रवक्ता मानव मुक्ती मिशन
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment