ll जोडनारे दुवे नष्ट करनारे रब्बुल मुसलमीन ll
भारतात इस्लाम आला तो साहाबा लोकांच्याद्वारे केरळा मार्गे.साहाबा म्हणजे रसुल्लला सल्लल्लाहू वल्लेही अस्सलम आर्थात पैगंबर साहेबांच्या सोबत राहिलेले,त्यांना पाहिलेले आणि माणुसकीचा प्रचार प्रसार करनारे लोक.आणि या साहाबांच्या द्वारे तयार होऊन सर्वस्वाचा त्याग करून अजीवन समतेचा शांततेचा प्रचार करनारे ते सुफी संत होत. साहाबा लोकांच्या द्वारे इस्लाम केरळच्या किनारपट्टीला लागला पन तो वाढला,बहरला फुलला तो सुफी संतांच्यामुळे.कित्तेक सुफींनी आपले प्राण गमावले पन त्यांनी समतेची लढाई मात्र सोडलेली नाही.भारतात ही समतेची लढाई जाती अंतांने लढली जानार होती ही गोष्ट लक्षात घेवून आनेक सुफींनी डायरेक्ट जातीअंताला हात घातला होता.ख्वाजा मैनुद्दिन चिस्ती ( ख्वाजा गरिब नवाज ) यांच्यासारख्या सुफी संतांच्यामुळे तर कित्तेक गोरगरीब जातीव्यवस्थेला कंटाळून इस्लामात दाखल झाले.या सुफींमधे आपल्याला अगदी जवळचे नाव सांगायचे तर संत कबीर होत.संत रवीदासांवरही हा प्रभाव होता.म्हणून इस्लामला जी जातीव्यवस्था अमान्य होती तिच्या शिकवणुकीनुसार संत रवीदास म्हनत होते
जाती जाती मे जात है जैसे केलन के पात l
ऱैदास मणुष न जुड सके जब तक जाती न जात ll
असो सुफी आणि त्यांची शिकवन हा विषय वेगळा.
विषय आहे स्वताला वर्गबंद करनाऱ्या सध्याच्या जमातवादी मुस्लिमांचा.
या सुफी संतांनी लोक जोडण्यासाठी काही उत्सव सुरु केले होते.काही उत्सव त्या सुफींच्या आदरापोटीही निर्माण झाले. जसे पिराची जत्रा,उरुस,दर्गे,संदली,फकीर ही इस्लाम मधे जायज नसलेली गोस्ट पन हेच पिर ,दर्गे मात्र मुस्लिम आणि गैर मुस्लिम यांना जवळ आणणारे ठिकाणे आहेत.एकाच पिरासमोर एकाच दर्ग्यात मुसलमान आणि मुसलमानेत्तर एकत्र बसत असत.या पिरांच्या जत्रांमधे म्हणजे उरुसात सगळे जन भरलेल्या गर्दितुन धक्काबुक्की करत खरेदी करत असत.प्रेमाने एकत्रीत येत असत.असेच अगदी संदल मधे मुसलमांचे तरुण आणि बाकी इतर जाती जमातींचेही सगळे एकत्र नाचत असत.भेदभाव नाही,जातीवाद नाही,भांडण तंटा नाही की अगदी बनायेंगे मंदिरवाले धंदे सुद्धा नाही. सगळे कसे अंतरिक प्रेमाने.
म्हणजे काय तर हे पिर,दर्गे,उरुस,संदली,फकीर हे लोकजोडनारे दुवे आहेत.सर्वांनी एकत्रित यावे यासाठीचा तो उत्सव आहेत.याद्वारेच लोक जोडले जातात.
पन आमच्यात हे नाही.इस्लामात हे नाही म्हणून काही जामातवादी मुसलमान आणि मौलाना लोक या गोष्टींचा द्वेष करताना दिसत आहेत.या पिरांना,दर्ग्यांना दुष्ट नेनीवेत लोटण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे.हे स्वताला जातीवादी बनवाण्याचा एककलमी कार्यक्रम चालू आहे. मुसलमान सुद्धा ही एक जात बनत चाललेली आहे . नॉन मुस्लिम लोकांना जोडणारा,त्यांच्या जवळ जाणारा,एकत्र येणारा कुठलाही आजेंडा सांप्रत मुस्लिमांकडे नाही.इद मिलनच्या प्रोग्रामद्वारे हे थोड्याबहुत प्रमाणात होते ही गोस्ट निराळी.पन हे एकात्मतेचे ठिकाणे,सुफी,फकीर झोडपून साध्य काय करनार आहात ?? आजही फकिराच्या हातातली मोरपंखाची पेंढी डोक्यावर आदळली की आंगातले सर्व रोग,दुख,कष्ट दुर गेल्यासारखे वाटते.ही मोरपंखाची पेंढी डोक्यावर मारून घेण्याचा कार्यक्रम आज्जीपासुन नातवापर्यांत चालू असतो.हे किती सुखदायी आहे.या फकिरांना संपवून हाती काय लागणार आहे ??? एकीकडे या ग्रेट प्रवाहाला नाकारणारे ब्राम्हणी अंधश्रद्धा निर्मूलन समीतीवाले तर दुसरीकडे कट्टर धर्मांध मौल्ला मौल्लवी ...
म्हणजे रब्बुल आलमीन ला रब्बुल मुसलमीन बनवण्याचा हा कार्यक्रम आहे.हे सुफीसंत,दर्गे,उरुस,संदली,फकिर भविष्यातील जातीअंतक शस्त्रे बननार आहेत.लोकांच्या समतावादी नेनिवेला हेच स्थळे,प्रवाह हात घालतील. त्यांच्यापासून पळ काढणे,त्यांना नाकारणे शुद्ध मूर्खपणा आहे.
नितीन सावंत , परभणी
प्रवक्ता मानव मुक्ती मिशन
9970744142
No comments:
Post a Comment