Wednesday, 9 January 2019

शिवयोगी सिद्धरामेश्वर: वारकरी लिंगायतांच्या महासमन्वयाचा दुवा.


सोलापूरचा भौतिकवादी कार्यक्षेत्रातला इतिहास जसा मोठा आहे तसाच सांस्कृतिक क्षेत्रातही सोलापूर जिल्हा आणि शहर अत्यंत प्रसिद्ध आहे.सोलापूर हा सर्वाधिक संत असलेला जिल्हा मानला जातो.भौतिकवादी अंगाने सोलापूर हे शहर गिरणी कामगारांच्या रुपाने डाव्या चळवळीचे केंद्र राहिलेले आहे.या सोलापूर शहराने डॉ.कोटणीस यांच्यासारखे मानवतावादी डॉक्टर दिल्याने चिनमधील शांगाय तर भरतातील सोलापूर ही दोन शहरे जुळे बंधु मानली गेलीत.चिन देशात जावून रुग्नांची सेवा करता करता आपला देह ठेवल्याबद्दल चिन मधे एका गावाला कोटणीस यांचे नावही दिले आहे.आजही विस्थापित होत चालेल्या ३० ते ४० हजार गिरणी कामगारांना अगदी कमी किमतीत घरे बांधून देनारे डाव्या चळवळीचे आमदार आपल्यात आहेत.
या भौतिकवादी इतिहासाच्या बरोबरच याच सोलापूरात लिंगायत,वारकऱ्यांच्या एकसंघ व्यवहाराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे समाधीस्थळ मानले जाते.सोलापूर शहरात बसस्थानकापासून अगदी दिड दोन किलोमीटरवर शहरातच हे मंदिर आहे.सर्वबाजुंनी तलाव आणि आत मधे शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे समाधीस्थळाचे मंदिर लक्ष वेधून घेनारे आहे.हे मंदिर ४० एक्कर जमीनीच्या  परिसरात वसलेले आहे.या मंदिराभोवती सिद्धरामेश्वर यांनी स्वता खोदकाम करुन तलाव बांधलेला आहे.
या तलावात ११ विहिरी त्या काळातच खोदकाम करुन कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केलेली आहे.या मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांचे आज्जी अज्जोबा जे नाथपंथी होते.त्यांची आणि पंढरीच्या पांडुरंगाची मुर्ती आहे.लिंगायतांच्या केंद्रस्थानी हि विठ्ठलमुर्ती कशी? तर त्याचीही एक लोककथा चालत आलेली आहे.
गहिनाथांकडुन नाथ पंथाची दिक्षा घेतलेले गोविंदपंत आणि निराई हे संत ज्ञानेश्वरांचे आज्जी अज्जोबा पंढरपूरला विठ्ठलाच्या वारीला निघाले होते.सोलापूरात त्यांची सिद्ध रामेश्वरांची भेट झाली.निर्गुण भक्तीचे उपासक असणाऱ्या सिद्ध रामेश्वरांनी पंढरपूरला कशाला जाताय ? ईश्वर तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी असतो  असा प्रश्न केला.थांबा तुमचा पांडुरंग दर्शनासाठी येथेच बोलवतो म्हणून त्यांनी विठ्ठल सोलापूरात बोलावल्याची आख्यायिका आहे.त्यामुळे सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात ही विठ्ठलमुर्ती आपल्याला पाहिला मिळेल.मंदिराच्या आतील परिसरात मंदिरात सिद्ध रामेश्वरांची मुर्ती तर बाहेरील सभागृहात समाधी आहे.या सर्व सांस्कृतिक प्रतिकांची अस्मिता दरवर्षी ताजी होते ती यात्रेच्या काळात.म्हणूनच हि प्रतिके वर्षानुवर्षे मानवी मनावर अधिराज्य गाजवत आहेत.सिद्ध रामेश्वर गेली ९ शे वर्षे झाले आर्ध्या महाराष्ट्राच्या आणि आर्ध्या कर्नाटकाच्या लोकमनावर प्रभाव टाकून आहेत.सिद्धरामेश्वरांची यात्रा मकरसंक्रांतीच्या काळात असते.हि यात्रा पाच दिवस चालते.या यात्रेचे आकर्षण म्हणजे सात नंदिध्वज.हे नंदिध्वज ४० फुट उंची असणाऱ्या बांबुला गोलाकार घुमटाच्या स्वरूपात बनवले जातात.यातला पहिला नंदिध्वज सिद्धेऱामेश्वरांचा असतो.दुसरा नंदिध्वज देशमुखांचा,तिसरा माळी समाजाचा,चौथा सोनार समाजाचा,पाचवा सुतार समाजाचा आणि शेवटचे दोन नंदिध्वज हे मातंग समाजाचे असतात.यात देशमुख घराने,शेटे घराने आणि सिद्धेश्वरांचे पुजारी हिरेअब्बु घराने महत्वाचे मानकरी घरानी मानली जातात.सिद्धरामेश्वरांचा नंदिध्वज विशेष असा सजवला जातो.हे नंदिध्वज पेलावेत म्हणून कमरेला विशिष्ट आकाराचा विनलेला पट्टा तयार केलेला असतो.यात सर्व सेवेकरी बाराबंदी पोशाख परिधान केलेले असतात.पांढऱ्या रंगाचा हा पोशाख शांततेचे प्रतिक मानले गेले आहे.पहिल्या दिवसी हे सर्व नंदिध्वज सिद्धरामेश्वरांचे गुरु मल्लिकार्जुन यांच्या मंदिरातून सिद्धरामेश्वरायांच्या मंदिराकडे निघतात.
दुसऱ्या दिवशी असतो सम्मती कट्ट्यावर कुंभार कन्येचा आणि सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाचा विवाह होतो.सिद्धरामेश्वर यांच्याकडे एक कुंभार कन्येने विवाहाची मागणी केली.होती तेव्हा त्यांनी मी शिवयोगी आहे.लग्न नाही करु शकत.तेव्हा तुला विवाह करायचा असेल तर तु या योगदंडाशी विवाह कर असे स्वामी म्हटल्याची एक लोककथा प्रचलित आहे.त्याद्वारे दुसऱ्या दिवशी हा विवाह संपन्न होतो.
तिसऱ्या दिवशी नंदिध्वजांवर रोषणाई केली जाते.रात्रीला हे नंदिध्वज होमकुंडाकडे येतात.या होम कुंडात कुंभारकन्या सती गेल्याचे प्रतिकात्मक अवशेष आपल्याला दिसतात.त्या आधारेच तिथे हा होम होतो.या होमानंतर एक भाकणूक विधी होतो.देशमुख घराण्याकडे असलेल्या वासरा समोर काही कडधान्ये ठेवली जातात.ते वासरू ज्या कडधान्याला आधी तोंड लावेल ते कडधान्य महागणार असे मानले जाते.या दरम्यान वासराने मलमूत्र विसर्जीत केले तर पाऊसपाणी ही यंदा जास्त होइल असे भाकीत काढले जाते.याद्वारे ही जत्रा संपते.
कर्नाटकातील श्रीपर्वतावरील मल्लिकार्जुन जर सिद्धरामेश्वर यांचे गुरु असतील तर त्यांचे वास्तव्य श्रीपर्वतावर दीर्घकाळ असल्याचे आपन अंदाज बांधु शकतो.हे शिवयोगी सिध्दरामेश्वर बसवाण्णांच्या अनुभव मंडपाचे तिसरे अध्यक्ष होते.म्हणजे लिंगायत धर्मात त्यांचे किती महत्वाचे स्थान आहे हे आपल्या लक्षात येइल.
आशा पध्दतीने चालत आलेली ही जत्रा आणि या परंपरा जुण्या इतिहासाचे पट उलगडून सांगत असतात.यातली मिथके संशोधकांना खुनावत असतात.तिथे आपन न पोहंचल्याने ब्राम्हणी छावणी या अब्राम्हणी जत्रा,उत्सवांचा उपयोग त्यांची कल्चरल हिजीमणी स्ट्रॉंग करण्यासाठी करत आली आहे.मुळ उत्सवात पुर्जाअर्चा आणि अलौकिकत्व ओतून ब्राम्हणी कल्चरल हिजीमनी स्ट्रॉंग केली जाते.भौतिकवादी,वास्तववादी असणाऱ्या प्रेरक महापुरुषांना ब्राम्हणी छावणी अलौकिकत्व बहाल करुन त्यांचे ब्राम्हणीकरण करते.खरे तर हे अब्राम्हणी जत्रा,सण,उत्सव आपली अब्राम्हणी कल्चरल हिजीमनी बनायला हवेत.त्यासाठी मिथकांचा उलगडा करुन,डिब्राम्हणायझेशनची प्रक्रिया राबवली पाहिजे.
ब्राम्हणी डाव्यांकडे कल्चरल हेजोमणीचा अग्रह धरनारा ग्रामसी आहे.परंतू त्याच्याकडे अब्राम्हणी बहुप्रवाही विधायक एतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पध्दती नसल्याने ते या सण उत्सवांकडे ते नकारात्मकतेने बघतात.
कॉम्रेड शरद पाटलांच्या विविध मेथोड,मिथकांचे शास्त्र,अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र याद्वारे आपन या अब्राम्हणी सण,उत्सव,जत्रांचा नव्या सांस्कृतिक अंगाने विचार केला तर आपल्या हाती बरेच काही लागेल.ज्या काळात जातीय अस्मिता टोकदार होत चाललेल्या आहेत,आशा काळात ही जत्रा एकात्मतेचे केंद्र,जातीअंतक भूमिका घेणाऱ्या वर्गासाठी एक शस्त्र,नवे प्रतिक बनेल.ज्यांच्या पारावर मातंगाचा नवरदेव आल्याने बाट होतो तेच लोक येथे मात्र दोन नंदिध्वजाचा मान मातंगांना देतात.नव्हे पाया पडतात.हे विचारात घेण्याजोगे आहे.ज्याकाळात जातीव्यवस्था तिव्र बनत चाललेली होती त्या काळात हे लिंगायत आणि वारकरी जतीअंतांचे दुवे आणि शस्त्रे बनवत होती.याचे हजारो पुरावे आपल्याला देता येतील ......

नितीन सावंत परभणी
राष्ट्रीय संसदप्रमुख
मानव मुक्ती मिशन
9970744142

No comments:

Post a Comment