Monday, 25 March 2019

बसवक्रांतीचा मागोवा ..

बसवक्रांतीचा मागोवा ..

वचन क्रमांक १.
ज्याने आपल्या घामाने
ही काळी माती भिजवली l
कष्ट उपसलेत पोटासाठी
आयुष्यभर अखंड श्रमाने l
ज्याने आपला देह राबविला
ज्याने आपले तन,मन,
श्रमपुर्वक झिजवले l
श्रमाची पुजा करुन ज्याने
शिवाची पुजा केली l
श्रमीकांच्या झोपडीलाच
जो कैलास मानतो l
ज्याची कथणी तसी करणी असे,
कुडलसंगमदेवा तोची जगद्गुरु झाला l

भारतीय कष्टकरी,श्रमकरी भुमीपुत्रांचा सर्वोच्च बहुमान करणारे,श्रमाला महत्व देवुन,श्रमीकांच्या श्रमाला जगद्गुरु बनण्यासाठीच्या अटीत समाविष्ट करणारे हे बसवाण्णांचे क्रांतिकारी वचन आहे.क्रांतिकारी यासाठी की ऐतखाऊ बुद्धीजीवी वर्गाला या देशात प्रचंड बहुमान देण्याची आणि श्रमकरी कष्टकऱ्याना हिन लेखण्याची प्रथा जेव्हा चालु होती तेव्हा बसवाण्णा मात्र बुद्धीजीत्व श्रमावर निर्देशीत करत होते.प्राच्यविद्यापंडित कॉ.शरद पाटील यांनी सुद्धा स्वतंत्र्य,समता आणि मित्रता या त्रईचा शोध शेती करण्यातूनच लागल्याचे अलीकडे सिद्ध केले आहे. त्यासाठी त्यांनी दोन वर्षे खुद्द शेतीही करुन पाहिली.तात्पर्य काय येथे बसवाण्णा म्हणतात की जो शेती करतो,श्रम करतो, गरिबांना आपले मानतो, ज्याचे तन मन प्रामाणिक आहे,ज्याच्या बोलीत आणि वागण्यात काहीही अंतर नाही तोच जगद्गुरु.आर्थात वैदिक धर्माचे शंकराचार्य
,ब्राम्हण पुरोहीत,पोथीपंडीत या व्याख्येत बसत नाहीत.म्हणून ते काही जगद्गुरु नव्हेत.
बसवाण्णांच्या अशा अनेक वचनाकडे गांभीर्याने पहाता असे लक्षात येथे की ते सर्वहरा ( सामाजिक व आर्थीक ) वर्गाचे साहित्य निर्माण करत होते.होऊ घातलेल्या जातवर्गस्त्रीदास्यांतांच्या क्रांतीसाठी ते शस्त्र निर्माण करत होते.

नितीन सावंत परभणी
बसवधर्म महासभा
9970744142

No comments:

Post a Comment