♦️माझे माहेर पांढरी....
पंढरपूर,विठ्ठल आणि चंद्रभागा हे महाराष्ट्रातील लोकमानाचा अविभाज्य भाग बनलेली नावे आहेत.शतकानुशतके लोटत आली आहेत,तरी या नावांची क्रेझ काही कमी होत नाहीए,उलट दिवसेंदिवस वाढत आहे.चंद्रभागेच्या तिरी, पंढरपूरनगरी उभ्या असलेल्या पांडुरंगाचे वेड इतके का लागले असावे ? अजूनही ही पंढरी एवढी का जवळची वाटत असेल ? संतांनी नेमकी कोनती जादू केलेली असेल एवढ्या मोठ्या लोकमनावर ?
होय पंढरपूरचे महत्व वाढवले ते संतांनीच. हे महत्व वाढवताना प्रचाराची मोठी साधने नाहीत की राजाश्रय नाही तरी या संतांनी लोकमनाचा ठाव कसा घेतला असेल ?
सर्व संत मंडळी जेव्हा पंढरपूर,विठ्ठल,चंद्रभागा हे नाममहात्म्य वाढवत होती तेव्हा त्यांनी लोकमनावर प्रभाव गाजवनारी भौतिकवादी सर्व विशेषणे वापरलेली तुम्हाला दिसतील.सर्व उपमा,मिथकांचा त्यांनी वापर केलेला दिसून येइल.एकमेव हा भागवत धर्म असा आहे की त्यातील प्रचारकांनी सर्वप्रकारच्या तत्वज्ञानाचा , मिथकांचा , रुपकांचा , अलंकार आणि शृंगारांचा एकत्र मिलाफ घातलेला आहे. वैदिकांच्या परक्या यज्ञ,कर्मकांडी संस्कृतीला नाकारून सर्वांना जवळचा वाटावा असा भागवत धर्माचा पर्याय देताना हे वारकरी संत सर्वसामान्यांच्या जीवनातील अवतीभवतीचे विषेशने वापरतात.सर्वांच्या जीवनातील लोकप्रिय उपमांचा ते वापर विठ्ठल इस्ट्याब्लिश करण्यासाठी करतात.त्यातील लोकप्रिय संकल्पना म्हणजे माहेर होय.विवाहित स्त्रीला आयुष्यातले सर्वात हवेहवेसे वाटनारे,ओढ लावणारे ठिक कोणते असेल तर ते माहेर.सासुरवाशीणीला सदैव आवडनारे तीर्थक्षेत्र म्हणजे तिचे माहेर.
म्हणून या माहेरसारख्या स्त्रीवादी उपमा पंढरपूरचे महत्त्व वाढवण्यासाठी संतांनी वापरलेल्या दिसतील.
संत कान्होपात्रा महाराज आपल्या अभंगात स्त्री अभिव्यक्तितून अभिव्यक्त होताना म्हणतात.
माझे माहेर पांढरी l सुखे नांदो भिमातिरी ll तेथे आहे मायबाप l हरेताप कौतुके ll निवारली तळमळ l चिंता गेली याता अंतरिची l कैसी विटेवरी शोभली l पाहोनी कान्होपात्रा घाली ll
स्त्रीने स्त्रीअंगाची उपमा वापरणे साहजिकच आहे.पण पुरुष म्हणून जन्माला आलेले संतही स्त्रीपुरुष या भेदाभेदाच्या पलीकडे गेलेले दिसतील.ते सुद्धा स्त्रीवादी भूमिका घेत संत साहित्यात माहेर म्हणून पंढरपूर केंद्रबिंदू बनवतात.
संत एकनाथ महाराज म्हणतात.
माझे माहेर पांढरी l आहे भिवरेच्या तिरी ll बाप आणि आई l माझी विठ्ठल रुखमाई ll पुंडरीक राहे बंधू l त्याची ख्याती काय सांगू ll बहीण माझी चंद्रभागा l करितसे पाप भंगा ll एका जनार्दनी शरण l करी माहेरची आठवण ll
एका सासुरवाशीण स्त्रीला माहेरची आठवण झाल्यानंतर तिला काय आठवते तर आई,वडिल,बंधू,बहीण.अगदी हेच माहेरचे नाते एकनाथ महाराज विठ्लाशी जोडु पहातात.हा संत एकनाथ महाराजांचा स्त्रीवादी दृष्टीकोण लोकमनाची पकड घेतो.आणि विठ्ठल भक्ती पंढरपूर महत्व वेगाने वाढु लागते.
संत तुकोबाराय एकेठिकाणी म्हणतात
आपल्या माहेरा जाईन मी आता l
निरोप या संताहाती आला ll
सुख दुख माझे एकीले कानी l
कळवळा मनी करुनेचा ll
करुनी सिद्ध मुळ साऊले भातुके l
येथी दिसे एके न्यावयासी ll
त्याची पंथे माझे लागलेसे चित्त l
वाट पाहे नित्य माहेराची l
तुका म्हने आता येतील न्यावया l
अंगी आपलिया मायबाप ll
एका सासुरवाशीण स्त्रीच्या भुमीकेत संत तुकोबाराय म्हणतात, " मला संतांच्याकडुन निरोप आला आहे.मी माझ्या माहेरा जाइल.माझे सुख दुख त्यांनी जानुन घेतले आहे.त्यांच्या मनात करुणेचा कळवळा आहे.माला माझ्या माहेराची आस लागलेली आहे.मला न्यायला येतील याची मी नित्य वाट पहात आहे." एवढी अर्त भावना स्त्रीवादी अंगाने टिपने खरच जीकरिचे काम आहे.आपल्या अभिव्यक्तीत एवढा सखोल स्त्रीभाव ओतने साधे काम नव्हे.एवढे काय स्त्री माहेरासाठी किती व्याकुळ असते याबद्दल अनखी एका ठिकाणी संत तुकोबाराय म्हणतात.
माहेरीचा काय येइल निरोप l
म्हनवुनी झोप नाही डोळा ll
वाटपाहे आस धरुनिया जीवी l
निडळा हे ठेवी वरी बाहे l
बोटावरी माप लेखीतो दिवस ll
होतो कासावीस धीरनाही l
कायनेनो संता पडेल विसर l
की नव्हे सादर मायबाप ll
तुका म्हने तेथे होइल दाटणी l
कोण माझे आनी मना तेथे ll
माहेरी जाण्यासाठी बोटावर दिवस मोजणार्या व्याकुळ स्त्रीचे चित्रण संतांच्या वतीने तुकोबाराय करतात.तिची कासावीसता तुकोबाराय अभंगात घेतात अगदी भन्नाट आहे हे.
हे पंढरपूर सर्व संतांचे माहेर असल्याची घोषणा संत नामदेव यांनीच केली होती.पुढे ही कबुली सर्वांनीच दिली.नंतर हे पंढरपूर आमचे माहेर आहे हे सर्वांनी एकमताने स्विकारले.संत नामदेव महाराज म्हणतात.
झळझळीत सोनसळा l कळस दिसतो सोजळा ll बरवे बरवे पंढरपूर l विठोबा रायाचे नगर ll माहेर संताचे l नामयास्वामी केशवाचे ll
संत नामदेवांचे हेच बोल संत ज्ञानेश्वर महाराजही आपुल्या मुखी व्यक्त होतात.ते म्हणतात
आवघाची संसार सुखाचा करिण l आनंदे भरीन तिन्ही लोकी l जाईन गे माये तया पंढरपूरा l भेटेन माहेर आपुलीया l सर्व सुकृतीचे फळ मी लावीन l क्षम मी देइल पांडुरंगा l
बापरखुमा देवीवर विठ्ठलाचे भेटी l आपुल्या संसाठी करुनी ठेला ll
संत मालिकेतील सर्वच संतांनी पंढरपूरसाठी माहेर ही उपमा वापरलेली आहे.त्यामुळे त्याकाळातील स्त्रीमनावर याचा प्रचंड प्रभाव पडला असेल, यात शंका नाही.अनेक स्त्रीयांना स्वताचे दुख या संतांच्या अभंगांच्या रुपाने गावोगाव व्यक्त होता आले असेल.कारण आजही संतांच्या वारसा आपल्या सुमधुर आवाजातून सांगणाऱ्या गोदावरीताई मुंढे जेव्हा बाई बाई जाते ग माहेराला l माझ्या मुळच्या घराला l हा संत मुक्ताबाईंचा अभंग गातात तेव्हाच खरी माहेरची अनुभूती येते.
म्हणून सर्व संतांना त्यांचे हक्काचे माहेर मिळाले आनखी काय हवेय.
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
शेवट तो भला l माझा बहुगोड झाला ll
आलो निजाचा माहेरा l भेटो रखुमाईच्या वरा l
किंवा आपले माहेर भेटल्यानंतर,माहेरी आल्यानंतर संतांना काय वाटते याबद्दल तुकोबाराय म्हणतात.
आजी बरवे झाले l माझे माहेर भेटले ll
डोळा देखीले सज्जन l निवारला भागसीण ll
धन्य झालो आता l क्षेम देवुनिया संता ll
इच्छेंचे पावलो l तुका म्हने धन्य झालो ll
आशा पध्दतीने सर्वाधिक लोकप्रिय उपमा वापरून संत विठ्ठल माहात्म्य वाढवतात.विठ्ठलाचा ते प्रचार करतात.त्यात ते प्रचंड यशस्वी होतात.लोकप्रिय होतात.
पुरोगामी , आंबेडकरवादी , डाव्या , समाजवादी पक्ष संघटनांना आशा लोकप्रिय मिथके , उपमा , दृष्टांत , अलंकार वापरून लोकमनाचा ठाव घेता आला असता.पण त्यांचे कर्मठतेचे सुतक फिटलेले नसल्यामुळे, सध्या प्रतिगामी , ब्राम्हणी धर्मांध छावणीच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमात ते आनंद मानत आहेत.
ह.भ. प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर 9970744142
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
No comments:
Post a Comment