Monday, 11 April 2022

जोतीराव फुलेंची जातीअंताची लढाई

 जोतीराव फुलेंची जातीअंताची लढाई 

' शेटजी भटजी लाटजी विरूध्द शुद्रातीशुद्र ' हे राष्ट्रपिता जोतीराव फुलेंचे भारतीय वर्गीय डिव्हायडेशन.तिकडे १८४८ ला मार्क्सचा मेनिफेस्टो तयार झाला इकडे फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली.

फुलेंच्या लढाईत अग्रक्रम कशाला होता वर्गसंघर्ष की जातीसंघर्ष ?

#फुले म्हणतात "जोपर्यंत इंग्रज मायबाप भारतात आहेत तोपर्यंत शुद्रातीशुद्रांनी जल्दी करावी आणि शिकून घ्यावे "

म्हणजे फुले ब्राम्हणी व्यवस्थेने जन्माला घातलेल्या जातीव्यवस्था,अस्पृश्यता आणि स्त्रीदास्यांतासाठी आधी काम करु इच्छितात.म्हणून त्या पध्दतीने ब्राम्हणी सांस्कृतिक अधिपत्यवाद मोडित काढण्यासाठी बिना ब्राम्हणाचे लग्न लावतात,केशवपन प्रथेला विरोध करतात,नाव्ह्यांचा संप घडवून आनतात,सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना करतात.हे फुलेंचे पर्यायी सांस्कृतिक राजकारण.जे जातीअंतला प्राधान्य देनारे आहे.

आर्थात फुले हे सर्व बहुतेकवेळा इंग्रजांच्या मदतीनेच ते करतात...

म्हणून पुढे छत्रपती शाहूराजे,विठ्ठल रामजी शिंदे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कॉ.शरद पाटील यांनी सुद्धा लढाईचा अग्रक्रम जातीअंत हाच ठेवलेला दिसुन येइल ..
*********************************

♦२८ नोव्हेंबर हाच #खरा_शिक्षकदिन ♦

ग्रामीण भागात नेहमी ऐकायला येनारे एक वाक्य आहे, "त्याच्यासाठी इतके केले न मायझ्याने गरम पाणी सुद्धा पाजले नाही"

म्हणजे आपन चांगले काम केल्यावर आपल्याला एक मोबदला अपेक्षित असतो.तो मोबदला सन्माच्या,कौतुकाच्या स्वरुपात का होइना आपल्याला अपेक्षा असते.

#राष्ट्रपिता_जोतीराव_फुलेंनी सुद्धा कुनाच्या गरम पाण्याची सुद्धा अपेक्षा न करता आपले सामाजिक कार्य केले होते.त्यांच्या हयातीत तर त्यांची अवहेलना झालीच,पण मृत्यूनंतररही खुप यातना फुले कुटुंबातील सदस्यांना भोगाव्या लागल्या.घरासमोर घान आनुन टाकणे,मेलेले जनावरे आनुन टाकने,सावित्रीमाईंस शाळेत जाताना शेन दगड मारणे,एवढेच काय रात्री मारेकरी सुद्धा पाठवण्याचे काम पुण्यातील ब्राम्हणांनी केले होते.

फुले गेले,सावित्रीमाई सुद्धा प्लेगची लागण झालेल्या मुलाला पाठीवर दवाखान्यात नेताना त्यांनाही प्लेग झाला,आणि त्या गेल्या.
पुढे या फुले कुटूंबातील फुलेंची सुन आणि नात यांना वाळीत टाकले गेले.सुरुवातीला त्यांनी फुलेंची पुस्तके विकून पोटाची भुक शमवली.नंतर भांडीकुंडी विकली.सावित्रीमाईंचा हात लागलेली भांडी भंगारात गेली.नंतर फुलेंचा वाडा शंभर रुपयाला विकून ह्या दोघी रस्त्यावर आल्या.अन्न अन्न  करत त्यांना देवीच्या मंदिरासमोर भिक मागावी लागली .
तरिही बहिष्कार टाकलेल्या लोकांनी भिकही दिली नाही शेवटी पोटात अन्नाच्या कनही नसलेल्या दोघी मायलेकींनी तडफडुन तडफडुन प्राण सोडले.नगरपालिकेने त्यांना बेवारस म्हणून जाळले .
ही दशा फुले कुटुंबाची झाली .
आणि आज फुलेंचे ढीगभर वारसदार पुढे आलेत म्हणे.
फार मोठा कॉंट्र्याकदाराची फ्यामेली कपाळकरंट्या समाजाने भिकेला लावली.
आम्ही फुलेंना दिले काय ?
त्यांच्या कुटुंबियांना काय दिले ??

किमान त्यांचे अपुरे राहिलेले काम तरी पुर्ण केलेय का ?

नितीन सावंत,परभणी
संस्थापक अध्यक्ष
मानव मुक्ती मिशन
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦

No comments:

Post a Comment