भारतीय सणवार उत्सव आणि पुरोगामी वर्गाची भूमिका
सिंधू सभ्यतेतुन चालत आलेले सणवार उत्सव टिकवून ठेवण्यासाठी चाललेली सर्वहरा वर्गाची धडपड आणि पुरोगाम्यांची नकारात्मक नास्तिकवादी मांडणी यात नेहमी फायदा झाला तो ब्राम्हणी प्रतिगामी छावणीला.
भारतीय पुरोगामी वर्गात इंग्रजांच्या पाश्चात्त्य चिकित्सक वृत्तीने नकारात्मक नास्तिकवाद घुसवून या देशात पुरोगामी वर्गाची हेळसांड झालेली दिसून येइल.भारतीय पुरोगाम्यांनी इंग्रजांच्या प्रमाणेच या देशातील जुण्या सभ्यतेला( कल्चर ऐवजी सभ्यता) हिडीसफिडीपने हिन लेखायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात कधीच पुरोगामी चळवळी दीर्घकाळ टिकु शकली नाही.
एवढेच काय हे जुने सणवार उत्सव इतके भेदक आणि सर्वहरांची नेनीव क्याच केलेले आहेत की त्या सणवार उत्सवाच्या दिवसी तुम्ही सर्वहरांच्या हिताचा एखादा प्रोग्राम ठेवा. त्यांना फायदा मिळवून देनारी एखादी मिटिंग ठेवा. सर्वहरा वर्ग म्हनतो आम्हाला येता येनार नाही, त्यादिवशी आमचा सण आहे.आम्ही मानव मुक्ती मिशनच्या वतीने पंढरपूरला दोन दिवशीय प्रशिक्षण ठेवले होते.आर्धे लोक आले नाही.एक कांचन देवकर ताई म्हनाल्या पोळा असल्याने येता आले नाही.सण,उत्सव टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कष्टकरी,वंचित, शोषीत वर्ग कुठलाही किंमत मोजायला तयार असतो.त्यासाठी तो कर्जबाजारी होनेही स्विकारतो.काही पुरोगामी सुद्धा ते सणवार साजरे करत नसतील मात्र त्या दिवसी गोडधोड तरी करतात.म्हणजे त्यांचा त्या दिवशी त्या सभ्यतेप्रती असलेला आत्मभाव प्रगट झाल्याशिवाय राहात नाही.
म्हणजे येथे ग्रेट कोन ठरते तुमचे पुरोगामी नास्तिकवादी नकारात्मक प्रबोधन की हे सणवारउत्सव ..
यातून आपन बाहेर फेकले जातो.पुरोगाम्यांची हार होते.आणि संस्कृतीचे ठेकेदार सत्ताधीश होतात.
यावर उपाय काय ?
भारतीय चिकित्सक वृतीने त्या सणवार उत्सवांची विधायक मांडणी करण्याची जबाबदारी आपन उचलली पाहिजे.प्रबोधन करावे पन विधायक.
जसे की हे सणवार उत्सव कसे निर्माण झाले?कसे विकास पावले? त्यावेळी लोकांच्या मेंदूंची अकलनक्षमता काय होती ?
त्या सणवार उत्सवाने काय काय नवनिर्माण केले ? नवनिर्मीतीस काय हातभार लावला ? लोकांच्या वेदना पिडन दुर करण्यास त्या सण उत्सवांचे योगदान काय ?
आज त्याची उपयोगीता किती ? कुठला भाग नाकारावा वगैरे ?
यासाठी कॉ शरद पाटील यांच्या काही मेथोड कामी येतील.
१) अब्राम्हणी बहुप्रवाही विधायक ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पध्दती
२) जाणीव नेनीवेचे तर्कशास्त्र ..
पुरोगामी वर्गाने सगळे वेडे आणि आम्ही तेवढे शहाने ही वृत्ती सोडुन.लोकांत मिसळावे.रात्र वैऱ्याची आहे.
नितीन सावंत परभणी
प्रवक्ता मानव मुक्ती मिशन
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment