भिमा कोरेगाव रणसंग्राम एक जोडनारा दुवा ....
जय भारत ,
उद्याच्या १ जानेवारीला भिमा कोरेगावच्या रनसंग्रामाला २०१ वर्षे पुर्ण होत आहेत.१ जानेवारी १८१८ रोजी रंगेल पेशवाई बुडवून पाचशे महार बटालियन नी ब्राम्हणी दहशद संपविली होती.हि ब्राम्हणी दहशत पेशवाईच्या रुपाने महाराष्ट्राच्या छाताडावर कित्तेक वर्षे नाचत होती.हि पेशवाई शिवशाहीतील शिवशक बंद करुन फसली शक सुरु करून कार्यरत होती.शिवशाहीतले छत्रपती पद नामधारी बनवून तथा काही छत्रपतींचा खुन करवून तर काही छत्रपतींना वेडे ठरवून पेशवाई पुण्यात घटकंचुकीचे खेळ खेळत होती.आपल्या मस्तिनीच्या पोराला हिंदू करायचा की मुस्लिम करायचा याच्या चिंतेत होमहवन करनारी पेशवाई ब्राम्हणांच्या कल्याणाच्या बाहेर विचार कधी करु शकलेली नव्हती.प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीलेल्या ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास वाचावा ते म्हणतात
*पुण्यात नग्न बायकांच्या धावण्याच्या शर्यती लावल्या जायच्या आणि त्यात प्रथम आलेल्यांना योग्य बक्षीस द्यायला स्वता पेशवे हजर असत*
ज्या शिवरायांनी परस्त्रीला मातेसमान मानले त्या पेशव्यांनी स्त्रीयांची अब्रू वेशीला टांगली.म्हणून शिवप्रेमींनी शिवशाही आणि पेशवाईतला फरक समजून घ्यावा.पेशव्यांच्या रंगेल चाळ्यांबद्दल आजही बाजारपेठेत कित्तेक पुस्तके उपलब्ध आहेत. पायपोस किमतीचे पेशवे पुस्तक तर आवर्जून वाचणीय आहे.पुष्पा भावे यांनी सुद्धा या विषयावर लिहीलेले आहे.
पेशव्यांच्या जुलमाबद्दल तर सर्वांना ज्ञातच आहे की पुण्यात अस्पृश्यांसाठी शिरण्याची वेळ फक्त दुपार होती.त्यात कमरेला झाडू आणि गळ्यात मडके असे ठरलेले होते. अस्पृश्यांचे काय घेवून बसलात,पेशवाई संपल्यानंतर सुद्धा अस्पृश्य नसलेल्या जोतीराव फुलेंना लग्नाच्या वरातीतून हाकलून दिले गेले.म्हणजे यावरून पेशवाई काय होती याचा आंदाज बांधता येइल.देशाचे दुश्मन नावाच्या पुस्तकात दिनकरराव जवळकर यांनी पेशवे माणसांच्या मुडक्याचा चेंडू करून गुलटेकडीच्या मागे खेळत असल्याचाही उल्लेख आहे.
शिवरायांनी मात्र शत्रूच्या उडवलेल्या मुंडक्याची सुद्धा समाधी बांधली.
पेशवाईत तुकोबारायांचे नाव ठेवायला आणि नाव घ्यायला बंदी होती.पुण्या जवळील एका गावातील कीर्तनकाराने किर्तनात तुकोबारायंचा अभंग घेतला म्हणून पेशव्यांनी तिथे जावून चालू किर्तनात किर्तनकारांच्या कानसुल्यात दिली होती.म्हणजे ही पेशवाई काही फक्त अस्पृश्य वर्गालाच जाचक होती असे नव्हे.
शिवरायांनी मात्र किर्तनातून प्रबोधन करनाऱ्या तुकोबारायांना सिक्युरिटी म्हणून दोन चोपदार दिले होते.गुरु मानले होते .
व्यापाऱ्यांसाठी शिवरायांनी गडावर बाजारपेठ वसवली होती याउलट पुण्यात पेशव्यांनी व्यापार करनाऱ्या सोनारांनी आमच्यासारखे धोतरे का नेसली म्हणून त्यांना शिक्षा केल्याचे उदाहरण उपलब्ध आहे.
म्हणून पेशवाई ही फक्त अतिशुद्रांनाच त्रासदायक होती असे कुणी समजू नये. आजचे सवर्ण म्हणजे obc,मराठा, तसेच कीर्तनकार सोनार ,माळी सर्वजण पेशव्यांच्या उत्पाताला कंटाळलेले होते.म्हणून शिवशाही नव्हे पेशवाई बुडाली आणि ही पेशवाई बुडाल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केलेला आहे.फुले पेशवाई बुडवून आलेल्या इंग्रजांच्या राज्याचे स्वागत करतात ते म्हणतात.
जोपर्यंत इंग्रज मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत शुद्रातीशुद्रांनी जल्दी करावी आणि शिकून घ्यावे.
जेधे जवळकर सुद्धा पेशवाई बुडाल्याचे स्वागत करत असत.म्हणून विनाकारण आज पेशवाईत कुनाचा जीव असण्याचे कारण नाही.ज्यांना पेशवाई हवी आहे त्यांना ती लखलाभ ...
ब्राम्हणेतर वर्गाने भिमाकोरेगावचा रणसंग्राम इंग्रज विरूध्द मराठे असा समजू नये.तो संघर्ष पेशवे विरूध्द पाचशे महार बटालियन असाच आहे.आणि ते वास्तव आहे.
म्हणून भिमा कोरेगावाच्या रनसंग्रामाच्या दोनशे एक वर्षाच्या निमीत्ताने होत असलेल्या सोहळ्याच्या सर्वांना शुभेच्छा.या भिमा कोरेगावला बाबासाहेबांनी सुद्धा आपली हजेरी लावलेली आहे.म्हणून
आर्थिक सर्वहरा आणि सामाजिक सर्वहरा यांना जोडनारा हा सोहळा बनायला हवा.
वढू बुद्रूक येथील ज्या समाधीचे विद्रूपीकरण केले गेले आहे,ते गोविंद गायकवाड होत.प्राच्यविद्यापंडित कॉ शरद पाटील त्यांची नोंद गोविंद गोपाळ नावे करतात. ते ढगोजी मंगोजी या सांप्रदायाचे असल्याचे सांगतात.त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केल्याचे ते नमूद करतात. म्हणजे हा भिमा कोरेगावचा रणसंग्राम छत्रपती संभाजी महाराजांच्या आपमानाचा आणि हत्येचा बदला घेनारा प्रेरणादायी इतिहास म्हणून आम्ही बघतो ......
सर्वांना भिमाकोरेगाव शौर्यदिनाच्या शुभेच्छा ...
नितीन सावंत,परभणी
राष्ट्रीय संसदप्रमुख
मानव मुक्ती मिशन
9970744142
♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment