प्रकरण ६ वे
ll धर्माच्या दलालांचा त्रास .. ll
धाव घाली विठु आता चालु नको मंद ।
बडवे मज मारिती काय अपराध ।
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला ।
शिव्या देऊनी म्हारा म्हणती देव कां बाटवला ।
आहोजी महाराज तुमचे द्वारीचा कुतरा
नकाजी मोकलूं चक्रपाणी जीमेदारा ||
जोडोनीया कर चोखा विनवितो देवा ।
बोलिलो उत्तरे परि राग नसावा ।
- संत चोखोबाराय
संत चोखोबाराय नामदेवांच्या वारकरी, भागवत धर्माच्या कार्याने प्रेरीत होऊन पंढरपुरात स्थाईक झाले होते.आपली बहिण निर्मळा आणि मेव्हणा बंका मेहुणपुरीतच ठेवून चोखोबा आपल्या बायकोला म्हणजे सोयराबाई यांना घेऊन पंढरपुरी कायमचे स्थाईक झाले होते. पुढील काळात ते नामदेवांच्या सहवासातून अभंग निर्मिती करू लागले. यातून संत चोखोबारायांना सर्वच वारकरी संतांनी स्विकारले, सामावून घेतले होते. परंतू वारकरी संत मंडळ वगळता इतरांनी मात्र चोखोबारायांची शेवटपर्यंत दैनाच केली. अस्पृश्य आणि महार म्हणून त्यांची मानहानी, टिंगलटवाळी सदैव होत राहिली. चोखोबा अभंग गाताहेत, भजने म्हणत आहेत. ते पांडुरंग भक्ती करत आहेत म्हणुन काही कुणाचेही हृदय समतावादी बनले नाही. नामदेवांचे सहकरी संत मंडळ सोडता बाकीचे लोक चोखोबांना उष्टे खायला भाग पाडत हाते, हे चोखोबारायांच्या एकुण अभंगांवरून समजून येते.त्यांच्याशी भेदभाव आणि जातीवाद शेवटपर्यंत होत राहिल्याचे आपल्याला दिसुन येते.अस्पृश्यतेची दैना , कलंक , महारोग काही मरेपर्यंत चोखोबांचा सुटला नाही.संत मंडळाच्या सहवासात एक आत्मीक सुख मिळाले , गुलामीची जानीव झाले एवढेच ते काय.
नामदेवांच्या शिकवणीतून चोखोबा अस्पृश्यतेविरूध्द मत व्यक्त करायला लागले होते. त्यांनी समतेचा अग्रह धरला होता. ते दररोज विठ्ठल मंदिरासमोर जावून अंगणातून विठ्ठलाला डोळे भरून पाहत असत. त्या विठ्ठल मंदिरातील अंगणातील दिपमाळेसमोरून नामदेवांचा किंवा स्वरचीत एखादा आभंग म्हणत असत. पुर्वी संत चोखामेळा जिथुन उभे राहुन विठ्ठलाला हात जोडत तिथून विठ्ल अगदी स्पष्ट दिसत असे. नंतरच्या काळात पुढचे बांधकाम करुन घेऊन विठ्ठल आनखी बंदिस्त केला गेला.या संदर्भात तशी मांडणी सुध्दा झालेली आहे. शिवाय, चोखामेळा यांनी अंगणात उभे राहुनच विठ्ठलाचे वर्णन केल्याचे अनेक अभंग आहेत. म्हणेजच अंगणातून विठ्ठल सहजरित्या दिसत असे. संत चोखोबाराय विठ्ठल मंदिरात गेले का नही? तर ते स्वतः कुठल्याही अभंगात मी मंदिरात गेलो असे म्हणत नाहीत. ते अनेक अभंगात
"गहिवरुनी, चोखा उभा महाद्वारि ।
विनवी जोडूनि करी विठ्ठोबासी"॥
महाद्वारातच उभे असल्याचे वर्णन करतात. जसे की
म्हणे मज काहीच न कळे |
उगाची मी लोळे महाद्वारि ||
संत चोखाबारायांना मंदिरात प्रवेश नव्हता. "शिंपी या सवर्ण जातीत जन्मलेल्या संत नामदेव महाराजांनाच जर औंढ्याचे (जिल्हा हिंगोली) ब्राम्हण हलक्या जातीच्या म्हणून मंदीरातून बोहर काढत असतील तर चोखोबा जाणून बुजून त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे अस्पश्य". त्यामुळे संत चोखोबाराय स्वता कधीही मंदिरात गेले नाहीत.तसे धाडस करण्याजोगा तो काळही नव्हता.
त्यावेळी विठ्ठल मंदिराचे पुजरी बडवे ब्राम्हण होते. ते ब्राम्हण असल्याने जातीव्यवस्था , अस्पृश्यतेचे कट्टर समर्थक तथा कडवे धर्माभिमानी होते.त्यांनीच वेळोवेळी संत चोखोबारायांना मंदिरात येऊ दिले नाही.आणि काहीही खुसपटे काढुन सतत त्रास दिला.उलट ह्या चोखामेळ्याने परत मंदिरासमोर सुध्दा दिसू नये म्हणून त्यांनी चोखोबारायांवर देव बाटवला म्हणून आळ घातला. आणि त्यांना प्रचंड मारहाण केली.
आधी बदनामी केली.परत येथे दिसु नकोस म्हणून तंबी सुद्धा दिली.एवढ्यावर संत चोखोबाराय ऐकायला तयार नाहीत म्हणून मग विठ्ठलाचा हार संत चोखोबारायांनी चोरला हा आरोप लावून विठ्ठल मंदिरातील ब्राम्हणांनी त्यांना मारहाण केली. एकदा बैलांना जुंपुन फरपटत नेल्याची शिक्षाही ब्राम्हणांनी दिली होती.या शिक्षेचा उल्लेख संत सोयराबाई यांच्या अभंगात सापडतो.
परत संत चोखोबारायांनी मंदिराच्या परिसरातही दिसू नये. त्यांनी विठ्ठल मंदिरासमोर येऊन भजन म्हणू नये असा यामागचा धर्मपुरोहितांचा उद्देश होता. लोकप्रिय होत चाललेल्या संत जनाबाईंवर सुध्दा विठ्ठलाचे पदक चोरल्याच्या आरोपावरून ४० ब्राह्मणांनी जनाबाईंना घरात जाऊन बाहेर काढले होते. आशाच प्रकारचा चोखोबारायांना बदनाम करणारा चोरिचा आळ घालण्यात आला. या मंदिरासमोर लोक जमवून चोरीच्या आरोपाखाली संत चोखोबारायांना मारहाण करण्यात आली.त्यानंतर तु परत या परिसरात दिसलात तर याद राख अशी तंबीही देण्यात आली. नंतर चोखोबारायांना मुळ पंढरपूरातून हाकलून लावण्यात आले. चोखोबाराय
सोयराबाईंसह चंद्रभागेच्या पलिकडच्या तिरावर जावून
झोपडी बांधून रहायला लागले. तिथुन सतत विठ्ठल मंदिर दिसावे. वाळवंटात होणारे संत मेळावे दिसावेत, त्यात सहभागी होता यावे यामागचा त्यांचा उद्देश होता. संत चोखोबारायांनी चंद्रभागेच्या पलिकडे एक दिपमाळ बांधली होती. हि दिपमाळ १९६९ पर्यंत होती. स. भा. कदम यांनी जी अभंगगाथा प्रकाशीत केली होती त्यात त्या दिपमाळेचा फोटो होता. नंतर जमिनीचा ताबा बदलल्याने चोखोबारायांची शेवटची निशानिही जमीनदोस्त केली गेली .
आशा प्रकारे संत नामदेवांच्या संत मंडळात एकोप्याने , गुण्यागोविंदाने रहाणाऱ्या चोखोबारायांना बडव्यांनी मारले. गावातून हकलून दिले. एका अस्पृश्याने अभंग रचावेत हे त्या काळात न पचनारी गोष्ट होती. म्हणून खोटे आरोप लावून चोखोबारायांची प्रतिमा जनमानसात मलिन करण्याचा प्रयत्न पंढरपुरातील पुरोहित वर्ग करत होता. आणि चोखोबाराय मात्र सहन करत होते. त्यांनी भक्तीचा मार्ग सोडला नाही. राहण्याची जागा मात्र बदलावी लागली.
चोखोबाराय नदीपल्ल्याड रहायला गेल्याने सर्व संत मंडळी त्यांना भेटायला नदीपल्याड जायला - यायला लागले. सर्वांचा चोखोबांशी प्रेमाचा धागा आनखी मजबुत होत गेला. पर्यायाने चोखोबा पंढरपुर परिसरात अणखी लोकप्रिय होत गेले.संत मंडळाच्या सहभोजनाच्या पंगतीच संत चोखोबारायांच्या अंगणात बसायला लागल्या आणि नामदेवादी संत मंडळाने प्रचार सुरु केला ही चोखोबांच्या घरी साक्षात विठ्ठल जेवायला येतो.यातून ब्राम्हणांचा तिळपापड होने साहजिकच होते.आशाप्रकारे अभिव्यक्ती दाबु पहाणाऱ्या चोखोबांना आनखी प्रसिध्दी मिळत गेली.ते पंढरपूरात चर्चेचा विषय बनले.
संत चोखोबाराय स्वभावाने अत्यंत विनयशील होते.ते बोलताना शब्द सांभाळून वापरत असत.वरिल अभंगात ते विठ्ठालाला आपली तक्रार सांगत आहेत.ती तक्रार सांगतानाही त्यांनी विनयशीलता सोडलेली नाही." हे विठ्ठला हे बडवे मला मारत आहेत.तु धाव मला वाचव.यांनी माझ्यावर तुझा हार चोरल्याचा आरोप केलेला आहे.आरे पांडुरंगा माझी किंमत ती किती रे शेवटी आम्ही अस्पृश्य म्हणजे तुमच्या दारातील कुत्रेच.माझ्या तक्रारीचा राग येवु देवु नकोस.माझी विनवनी आहे की या बडव्यांकडे बघ जरा.माझ्यावर खोटा आळ घेत आहेत."
अस्पृश्य आणि कलंकित जीवन वाट्याला आलेल्या समुदायाला त्याकाळी जी जी , व्हाय जी म्हणूनच बोलावे लागत असे.त्यांना विनयशीलता सोडता येत नसे.एखादा शब्दही वाकडा गेला तर भयानक शिक्षेला सामोरे जावे लागे.गावकीत मिळणारी मदत मिळणे बंद होई .वाळीत टाकले जाई , वस्ती जाळली जाई. आजही गावखेड्यात जातींचे नावे घेवू हे माजलेत ते माजलेत जाहिर म्हटले जाते.वाळीत टाकल्याच्या घटना तर नेहमीच घडतात.म्हणून अस्पृश्य आणि भटक्या जातींना आदब विनयशीलता सोडता येत नसे.ही विनयशीलताही गुलामगिरीतून आलेली होती.तीच मुजबुरी आणि काळाच्या मर्यादा वारंवार चोखोबारायांच्या अभंगात दिसत आहेत.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment