Sunday, 2 January 2022

♦चला आपण आपली पत घालवू ♦

 ♦चला आपण आपली पत घालवू ♦

नितीन सावंत, परभणी 
9970744142

सध्याला ब्राम्हणी बुद्धीजीवी,बनिया भांडवलदार जातवर्ग आणि उच्चभ्रू मिरासदार जातवर्गाचे दिवस आलेले आहेत.त्यांच्याकडूनच शेतकरी,कष्टकरी भिकेला लावने चालू आहे.यात ग्रामीण भागातील शेतकरी अत्यंत बिकट अवस्थेत सापडलेला आहे.पुर्वीचे वाडवडीलांचे वैभव गेलेले आहे.मोठ्या जमीनीचे तुकडे होत होत ही शेतजमीन वाटुन वाटुन गुंठ्यांवर आली आहे.ज्या वाड्यात एक किंवा दोन घरे रहायची ते वाडे मधेच वाटण्या करुन करुन, प्रत्येकाच्या वाट्याला पाच पाच खनाची जोडणी आली आहे.
आशा वेळेला जुना सरंजामी बाज सोडुन,तोरेताठे आणि मिरवणे सोडुन शेतकरी वर्गाने आपल्या प्रगतीचे पहायला हवे. पण नेमके तसे करण्याचा विचार केला की *पत* आडवी येते. 
खेड्यात सर्वात जास्त भिती असते ती चार चौघात *पत* जाण्याची.बापजाद्यांचा एक दरारा होता आपण तो कसा मोडावा.त्यांची कमवलेली *पत*आपन कशी घालवावी.पत गेली म्हणजे राहिलेच काय ? वगैरे. हिंदीत हरिशंकर परसाई यांची दोन नाक वाले लोग ही हस्यव्यंग रचना आहे.ती अशीच पत जाने सारखी रचना आहे.म्हणजे हिंदीत नाक कटते तर मराठीत पत जाते असे म्हनता येइल. 
बरे ही पत जाते तरी कशाने ? तर 
शेतातून डोक्यावर जाळन आनल्याने,स्वत: पाणी भरल्याने, महिला दुकानात गेल्याने,गिरणीत गेल्याने,कोर्टाची पायरी चढल्याने,पोलीसस्टेशनला गेल्याने,घरी चौकशीसाठी पोलीस आल्याने,पोटजात मोडुन विवाह केल्याने,विधवेवा पुनर्विवाह लावुन दिल्याने,गरिबांनी मोठ्यांना उलटून बोलल्याने,हुंडा कमी घेतल्याने किंवा घेतलाच नाही तर, लग्नात खर्च कमी केल्यास म्हणजे लग्न हालके केल्यास,घरच्या महिलांच्या अंगावर दागीने नसल्याने,महिला बाजारात गेल्याने किंवा परगावी एकटी गेल्यास,स्त्री पुरुषांना जास्त सलगीने बोलल्यास,नवऱ्याला चार चौघात बोलल्यास,स्त्रीने कोर्टात साक्ष दिल्यास,निवडणूक हरल्यास,मुलींनी तमाशा पाहिल्यास ,दान धर्म न केल्यास, अखंड हरिनाम सप्ताहची पट्टी न फाडल्यास,वर्गनी न दिल्यास,सण मोठा न केल्यास किंवा साजरा न केल्यास, देव देव न करने,उपास न धरने,नास्तिकता बाळगणे,मटण खाने,ब्राम्हणी व्यवस्थेने हलक्या मानलेल्या जातींच्यांना घरी बोलवल्याने, त्यांच्याशी नेहमी संपर्क ठेवल्याने,त्यांची मदत घेतल्याने,शेजारी पाजारी वाटी घेवून भाजी मागल्याने, पाहुणे आल्यास घरी ट्रे नसने,एकाच रंगाचे किंवा डिझाइनचे कप नसने,घर बांधलेले नसने,अशी पत जाणारी खुप मोठी कारणे आहेत.ज्यामुळे आपली पत जावू शकते . 
आता या पत जाणाऱ्या गोस्टी पाहिल्या तर त्या अगदी किरकोळ आहेत.अगदी शुल्लक,पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा छोट्याशा पत जाण्यामुळेच कित्तेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.काही जन तर सहकुटुंब आत्महत्येचा मार्ग आवलंबतात.पत जाण्यापेक्षाही नाक जाने हा प्रकार तर खुप भयानक आहे.
लक्षदेवून बघा प्रत्येक गावात बाहेरून आलेली चार दोन पाहुण्यांची घरे प्रगती करतात श्रीमंत असतात किंवा खाऊन पिऊन टामटुम असतात.असे का ? तर ते पत नावाच्या प्रकारात जास्त आडकत नाहीत.ते कुनालाही न जुमानता पत बित न पाळता प्रगती करतात.पण ज्यांना मोठी भाऊकी आसते,गोतावळा असतो ते मात्र या पतीत अडकतात.म्हणून पत ही प्रगतीला रोखुन धरते.
म्हणजे पत जाने चांगले असते.एकदा का पत गेली की प्रगतीचा मार्ग खुला होतो. आपल्यावरचे लोकांचे लक्ष ठेवण्याचे ओझे कमी होते.पत गेलीच पाहिजे.ग्रामीण भागाच्या अधोगतीला भावुकी आणि ही पतच जबाबदार आहे. 
चला एकदा आपन ही पत घालवूच.
लोक म्हतात शेतात खत नाही, गावात पत नाही आणि बाजारात ऐपत नाही.
माझे म्हनणे आहे खताचे आणि ऐपतीचे ठिक आहे पन पत काय चाटायचीय का ?

नितीन सावंत 
परभणी 
७/१/ २०१७

No comments:

Post a Comment