ll प्रकरण १२ वे ll
संत चोखोबारायांच्या भूमिका
ज्या कारणे वेदश्रृती अनुवादती l तो हा रमापती पंढरीये ll
सुखाचे ठेवणे क्षीरसागर निवासी l तो हा पंढरिसी उभा विटे ll
भाविका कारणे उभवोनी हात l उदारपणे देत भक्ती मुक्ती ll
न पाहे उंच निच याती कुळ l स्त्री शुद्र चांडळा सरते पायी ll
चोखा म्हने ऐसा भावाचा भुकेला l म्हणोनी स्थिरावला भीमातटी ll
- संत चोखोबाराय
गुलामांना स्वताचे विचार आणि भूमिका नसतात.जे तर्क करतात , चिकीत्सा करतात त्यांची स्वयंसंवादाची प्रगल्भ विचारक्षमता विकसित होत जाते.विचारकरणारी व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीबद्दल स्वताची मते नोंदवायला लागते.मते नोंदवणारी व्यक्ती आपल्या भूमिका घेवून पुढे येते आणि यातूनच प्रस्थापित , जुनाट , जुलमी आणि शोषकांच्या परंपरागत मुल्यव्यवस्थेला हदरे बसतात.कारण त्यांचे विषमतावादी तत्वे आणि शोषणाची व्यवस्था नाकारणारा तयार झालेला असतो.
संत चोखोबारायांचेही असेच आहे.संत नामदेवांच्या संत मंडळातून त्यांचे वैचारिक प्रबोधन झाले होते.या संत मंडळात चोखोबाराय तर्क करायला लागतात आणि यातून ते आपल्या भूमिकाही विषद करताना दिसतात.अस्पृश्य जातीतल्या व्यक्तीने स्वतंत्र मत मांडणे त्याकाळी गुन्हाच.त्यामुळे धर्मग्रंथावर स्वताचा अभिप्राय देने महापातक होते.तरी संत चोखोबाराय स्वताची मतेही विषद करतात आणि धर्मग्रंथावर आपला अभिप्रायही नोंदवतात.ते वेद पुराण्यांच्या समिक्षेपर्यंत जातात.१६ व्या शकतकात मराठा कुनब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारांवर तुम्हाला अभंग लिहिण्याचे आधिकार नाहीत आणि धर्मचिकीत्साही करता येनार नाही असे आरोप होते.त्या गुन्हयाची शिक्षा म्हणून संत तुकोबारायांचा गाथाही इंद्रायणीच्या पाण्यात बुडवला गेला होता.येथे तर चोखोबाराय अस्पृश्य आणि तरीही ते निर्भीडपणे आपल्या भूमिका मांडतात.हे मोठे धाडसाचे आणि क्रांतिकारी आहे.
संत चोखोबारायांच्या भूमिका पिडन चित्रीत करणाऱ्या आहेत.शोषण स्पष्टपणे दिसते.शोषणाचे मोजमाप करता येते.पिडन म्हणजे अंतरिक वेदना , जीवाची एक सल , मनाला लागलेली बोचनी होय.अस्पृश्यता , विटाळ आणि त्यावरून आलेली हिनत्वदर्शक वागणूक हे पिडन आहे.आशाप्रकारचे जे पिडन चोखोबांच्या वाट्याला आलेले आहेत ते पिडन चोखोबा चित्रीत करतात.या प्रकारे चित्रण करणाऱ्या संत चोखोबारायांच्या भूमिका पुढीलप्रमाणे आहेत. " इतर माणसांच्या प्रमाणे जगण्याचे आधिकार आम्हाला का नाहीत ? विटाळापासून कोण चुकला आहे.विटाळ सर्वांनाच असतो मग आम्हीच तेवढे अपवित्र का ? माणसाचे शरिर आणि त्याची कातडी बघु नये त्याचे गुण स्वभाव बघावा.जात, कुळ,धर्म बघुन केलेले वर्तन भेदभावाचे ठरते. म्हणून कुनालाही जात, कुळ, वर्णावरुन हिनवु नये.आम्ही काय सदैव तुझ्या पायरीलाच लोळायचे का ? आमचा जन्म उष्टे खाण्यासाठीच आहे का ? वेदांपेक्षाही विठ्ठल जुना आहे.आधिचा आहे.आम्हाला वेदांपेक्षा विठ्ठलच प्रिय आहे.वेद श्रृती पुराणांनी ज्या इश्वराचे गुणगान केलेले आहे तो ईश्वर म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल होय.सुखाचा सागर आणि सागरातील शेषशायी नागवार बसलेला विष्णु म्हणजेच विठ्ठल होय.तो सर्वांच्या कल्याणासाठी विटेवर उभा आहे.तो सर्वकाही देण्यासाठी उदारपणे हात वर करुन भक्ती मुक्ती वाटायला उभा आहे.हा आमचा पांडुरंग जात, कुळ, धर्म ,पंथ बघत नाही.स्त्री असो किंवा शुद्र किंवा चांडाळ असो तो सर्वांशी प्रेमाणे वर्तन करतो.तो भेदभाव करत नाही.कुनालाही हिन लेखत नाही.तो फक्त प्रेमाचा भावाचा भुकेला आहे.वैदिक परंपरेपेक्षा आमची विठ्ठलाची परंपरा समतावादी आहे. " याप्रकारे संत चोखोबाराय आपल्या अनेक अभंगांतून आपल्या भूमिका विषद करतात.
अनेकदा ते त्यांची विवंचना जगासमोर मांडतात.मनाला लागलेला घोर , एक हुरहूर ते व्यक्त करतात.ते म्हणतात " आता कुठपर्यंत आम्ही भीड धरायची.अजूनही तुमचे दार राखीत बसलो आहे. देवा ही तुझी रित बरी नाही.तुम्हाला हे साजत नाही.किती तिष्ठत ठेवनार आम्हाला.आमच्या वाट्याला पर्वताएवढे दुख आहे.सुखाचा कवडसाही प्राप्त नाही.असेच तुला वर्तन करायचे होते.आमच्याशी भेदभाव करायचा होता तु आम्हाला जन्म का दिलास.नेमका आमच्या वेळीच कुठे गेला होतास.इतका निष्ठुर कसाकाय वागलास.तु तरी उद्धार करशील म्हणून तुझ्या द्वारी आलो आहे.तुझा महिमा खुप मोठा आहे.तुझे नाव ऐकताच पुराणे रानोमाळ पळतात.तु तर वेदांच्याही आधीचा आहेस.आमचाही उद्धार कर की. तु दुजाभाव करु नकोस.एकाला भिखारी आणि एकाला राजा करु नकोस.काहींना मिष्ठान्न तर काहींना कोरकुटकाही मिळेना.काहीना दारोदार भिख मागावी लागते.ही असमानता का जन्माला घातलीस. "
संत चोखोबारायांचा अभिव्यक्तीचा मार्ग विठ्ठल आहे.विठ्ठलाशी बोलत , त्याला सुखदुःखे सांगत , कधीकधी विनयशील तक्रार करत संत चोखोबाराय आपल्या भूमिका मांडतात.या भुमीकांचे स्वागत करत इतर संत चोखोबारायांना प्रकाशात आनतात. कुटूंबातील सदस्य मेव्हणा , बहिन , बायको आणि मुलगा संत चोखोबारायांच्या भुमीकांच्या समर्थनात उभे रहातात.संत चोखोबारायांचे चिरंजीव कर्ममेळा महाराज तर आनखी कडक भूमिका घेवुन मैदानात येतात.संत चोखोबारायांच्या भुमीकांना जसा ब्राम्हणांचा विरोध झाला तसाच त्यांच्या भुमीकांचे समर्थन करणारा एक मोठा वर्गही त्यांना लाभला.त्यांच्या पश्च्यात पिढीदरपिढीगत लोकांनी संत चोखोबारायांची मांडणी जपून ठेवली.त्यांच्या अभंगांचे संकलन झाले.गाथा निर्माण झाला.त्यांच्या मांडणीला स्विकारत लोकांनी त्यांना संतत्व बहाल केले.संत चोखोबाराय काही चमत्कार दाखवून शिष्यांचा मेळा जमवनारे भोंदूबाबा नव्हते.किंवा ते उच्चजातीय ब्राम्हण वगैरेही नव्हते की लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घालावा आणि त्यांना सहजरीत्या गुरु करावे. संत चोखोबारायांना संतत्व सहजरीत्या मिळालेले नाही.त्यांना अत्यंत खडतर भूमिका घेवुन , सत्याचा अग्रह धरत ही लोकप्रियता शेवटी प्राप्त झालेली आहे. आशा संताला पुन्हा प्रकाशात आनने आपले प्रथम कर्तव्य आहे.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment