प्रकरण ४ थे
चोखोबारायांचा परिवार
चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा सुखाचा सागर। चोखा भक्तीचा आगर।।
चोखा प्रेमाची माऊली।चोखा कृपेची साऊली।।
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।
- संत बंका महाराज.
प्रस्तुत अभंग संत चोखोबारायांचे मेव्हणे संत बंका महाराजांचा आहे.चोखोबारायांच्या मेव्हन्याने त्यांचा गुणगौरव करावा ही आगळीवेगळी आणि महत्वाची बाब आहे.मेहुनपुरी गावी सुदामा आणि सावित्री यांच्या पोटी चोखोबाराय आणि निर्मळा यांचा जन्म झाला.त्याच गावी कृष्णा आणि भीमाबाई यांना बंका आणि सोयरा ही दोन अपत्ये झाली.या दोन कुटुंबाने एकमेकांशी सोयर संबंध निर्माण केले.बंका यांची बहीण सोयरा चोखोबारायांना देण्यात आली.तर चोखोबारायांच्या निर्मळा या बहिणीचा विवाह बंका यांच्याशी लावून देण्यात आला.पूर्वीच्या काळी साटे लोटे पद्धतीनं आशाप्रकारे विवाह होत असत.
संत चोखोबाराय आणि सोयराबाई यांच्या पोटी कर्ममेळा जन्मले तर बंका आणि निर्मळा यांचा मुलगा हरी होय.हरी बद्दल इतिहासात,संत साहित्यात काहीच उल्लेख सापडत नाहीत.मात्र परिवारातील बाकी सर्वांचे थोडे थोडे का होइना अभंग उपलब्ध आहेत.संत चोखोबाराय पंढरपूरात आल्यानंतर त्यांचा संत नामदेवांशी संपर्क झाला. त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवांचे किर्तन ऐकले.नामदेवांना जावुन ते भेटले आणि किर्तन आवडल्याची प्रतिक्रिया चोखोबारायांनी नामदेवांना दिली. नामदेवांनी चोखोबारायांना कडकडु आलिंगन दिले.गळाभेट घेतली आणि आमच्या संतमंडळात या म्हणून निमंत्रण दिले. संत चोखोबारायांना खुप आनंद झाला. तेंव्हा ही नामदेव-चोखामेळा गळाभेटीची हकीकत संत चोखोबारायांनी घरी आपल्या बायकोला सांगितली.पुढे ही हकीकत संत सोयराबाईंनी माहेरी आपला भाऊ बंका यांना सांगितली.या कृतीमुळे संत चोखामेळा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि बंका निर्मळेसह सर्व जण संत नामदेवांच्या संतमंडळात सामील झाले.नामदेव आणि सर्व संतमेळा भेदाभेद करत नाहीत.ते सर्वजन एका ताटात जेवतात.गोपाळकाला करतात.एकमेकांना जीव लावतात.या भावनेतून संत चोखोबारायांचा परिवारात वारकरी भागवत धर्मात दाखल झाला. संत चोखोबाराय जेंव्हा अभंग राचायला लागले तेंव्हा हे सर्वच कुटुंब साथ द्यायला लागले.आज घडीला संत चोखोबारायांचे ३५८,कर्ममेळा यांचे २७,बंका महाराजांचे ४१,सोयरा यांचे ६२,तर निर्मळा यांचे २४ अभंग उपलब्ध आहेत. या संपूर्ण कुटुंबाला जे आत्मभान निर्माण झाले चोखामेळा यांच्यामुळे होय. स्त्रियांनाही बरोबरीचा दर्जा देऊन आपली बायको आणि बहीण दोघींनाही अभंग निर्मितीच्या कार्यात चोखोबांनी सहभागी करून घेतले होते.आपल्या बायकोचा भाऊ आणि आपला मुलगाही आपल्याला साथ सहयोग देतो आहे हे बघून संत किती सुखावले असतील.संपूर्ण कुटुंब एकसंघ पाहून त्यांना वारंवार अत्यानंद झाला असेल.संत बंका आणि निर्मळा मेहुनपुरी राहत असत तर चोखोबाराय,सोयरा आणि कर्ममेळा पंढरपुरात रहात असत.तरीही हे एवढ्या दूर रहाणारे कुटुंब अभंगाच्या रूपाने एकमेकांच्या हृदयात रहात होते.संत चोखोबारायांच्या कुटुंबाने लिहीलेले अभंग गेले शेकडो वर्षे महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेने पिढीदरपिढीगत गात , गुणगुणत जपुन ठेवले आहेत.संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांची अभीव्यक्ती जपणे , त्यांचे काव्य , लिखान जपणे बे फार मोठे डॉक्युमेंटेंशन आहे.जे इतिहासाने आणि काही इतिहासकारांनी केले आहे.
संत बंका महाराज यांनी चोखोबारायांचा स्वभाव कसा आहे हे वर्णन करणारा प्रस्तुत अभंग दिला आहे.
" चोखोबाराय स्वभावाने अत्यंत निर्मळ स्वभावाचे आहेत.त्यांच्या अंगी (मनात) थोडेही किल्मिस,द्वेष,तिरस्कार नाही.ते मनाने निर्मळ आहेत.त्यांच्या अंगी मळ नाही." पुढे बंका महाराज म्हणतात " की चोखोबाराय सुखाचा सागर आहेत.ईश्वर भक्तीत ही ते सरस आहेत.चोखोबाराय स्वभावाने खूप प्रेमळ आहेत.ते प्रेमाची माऊली आहेत.आम्हा सर्व कुटुंबावरली ते कृपेची सावलीच आहेत." अशा सर्वांच्या मनाला मोहून टाकणाऱ्या चोखोबारायांना बंका महाराज दंडवत घालतात.
महाराष्ट्रातील सर्व संतांनी शिकवणुकीत 'माणुसकी' या मूल्यांना प्रथम प्राधान्य दिलेले आहे.'माणुसकी' प्रस्थापित करण्यासाठी मानुसकीच्या आड येणाऱ्या सर्व वाईट प्रथा,परंपरा,दुर्गुणांचा धिक्कार सर्व संतांनी केलेला आहे.'माणुसकी आणि माणूसपण' सदैव शाबूत रहावे म्हणून सर्वच संत सर्वच प्रकारच्या विषमता,भेदाभेद नाकारतात. म्हणून बंका महाराज जे चोखोबारायांचे प्रेमळ म्हणून वर्णन करतात ते सार्थ,योग्य आहे. सर्वच संत अगदी निर्मळ, प्रेमळ स्वभावाचे होते.सर्वाना सामावून घेणारे होते.त्यावेळी प्रस्थपित धर्म पुरोहितांनी आमच्या धार्मिक,आध्यत्मिक क्षेत्रात तुम्ही शूद्र संत का ढवळाढवळ करताय म्हणून खूप ओरड केली होती.अनेक संतांना त्यांनी छळले,त्रास दिला तरीही निर्मळ, प्रेमळ मनाचे संत डगमगले नाही.त्यांनी धार्मिक क्षेत्रात मानवी मूल्यांचा,माणुसकीचा आग्रह धरणे चालूच ठेवले.त्यासाठी धर्माची चिकित्सा देखील केली.फोलपणा दाखवताना हे जर अमानवी असेल तर असला ग्रंथ, वेद,पुराण धर्म सुद्धा आम्हाला अमान्य आहे.अशी भूमिका संतांनी घेतली.बरोबरीचे समान हक्क अधिकार आणि माणसाला माणसासारखी माणुस म्हणून वागणूक दया, हा अग्रह संतांनी शेवपर्यंत लावून धरला होता.त्यात संत चोखामेळा,संत रविदासांसारखे संत शेवटी शहीदही झाले.
माणुसकीच्या लढाईत,मानव मुक्तीच्या लढाईत चांगलुपणाचा अग्रह धरत संत शहीद झाले.
नितीन सावंत परभणी
9970744142
No comments:
Post a Comment